Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…
    ललित

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 6, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, पीए गरिमा पांडे, पार्थ आणि गरिमा पांडे, अग्रवाल इंडस्ट्रीतील लव्हस्टोरी, गरिमा पार्थ प्रेमकथा, पार्थ गरिमा लव्हस्टोरी, शार्वीचे पार्थवर प्रेम, शार्वीच्या प्रेमभावना, अग्रवाल इंडस्ट्रीत प्रेमत्रिकोण, अग्रवाल इंडस्ट्रीत लव्ह ट्रँगल, पल्लवी खरोसे आंबेकर, लेखिका पल्लवी आंबेकर, पार्थचा शार्वीला नकार, शार्वी पार्थवर नाराज,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पल्लवी खरोसे आंबेकर

    भाग – 9

    शार्वी मॅमसंदर्भात गरिमा जे बोलली त्याचाच विचार पार्थ करत होता. त्यांच विचारात तो घरी पोहोचला. त्याने आईशी बोलायचं ठरवलं. फ्रेश होऊन त्याने जेवण आवरलं आणि आईजवळ जाऊन बसला. पण आईशी कसं आणि काय बोलावं, हेच त्याला समजत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचे चित्रविचित्र एक्सप्रेशन बघून विभाच त्याला म्हणाल्या, “पार्थ, काही बोलायचं आहे का तुला?”

    “हो आई, ते म्हणजे… मी आणि गरिमा एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे, तेही लवकरात लवकर…” तो एका श्वासात बोलून मोकळा झाला.

    त्या फक्त त्याच्याकडे पाहत होत्या… रागाने की आश्चर्याने?

    त्याने आपल्या आईकडे बघितले. आईचा चेहरा एकदम शांत दिसत होता. त्यावर कोणतेच एक्स्प्रेशन नव्हते. त्याला हे समजायला कठीण जात होते की, त्यांच्या मनात सध्या काय सुरू आहे? त्याला एकक्षण तर भीती वाटली… कदाचित आई नकार देते की काय! पण त्याने ते चेहऱ्यावर दिसू दिले नाही. त्याने धीर करून विचारले, “आई तुला काही प्रॉब्लेम आहे का आमच्या लग्नाबद्दल? तसं असेल तर सांग.”

    “काय रे लबाडा! तुमच सगळं ठरल्यावर मला विचारत आहेस हं?” म्हणत त्यांनी खोटं रागवत त्याचा कान पकडला.

    “काहीच नाही करणार… तुझ्या होकाराची वाट बघणार…” तो विश्वासाने म्हणाला.

    “…आणि मी कधीच होकार नाही दिला तर?” त्यांनी भुवया उंचावत विचारलं.

    “तरीही मी तुझ्या होकाराचीच वाट बघेन,” तो आईचा हात हातात घेत म्हणाला.

    हे ऐकून त्यांच्या डोळयांत किंचित पाणी आलं. पण हे पाणी आनंदाचं आणि मुलाप्रती असलेल्या प्रेमापोटीच होतं. एक क्षण तर त्यांना स्वतःचाच हेवा वाटला, खरंच आपण किती नशीबवान आहोत की, आपल्याला पार्थसारखा मुलगा मिळाला. कदाचित, त्याचे वडील आज असते तर… या विचारानेच त्यांना भरून आलं.

    हेही वाचा – कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    त्यांनी स्वतःच्या मनावर आवर घातला आणि म्हणाल्या, “मला तर ती कधीच माझी सून म्हणून पसंद आहे… आणि लवकरात लवकर घरी घेऊन तिला.”

    त्याने खूश होऊन आईला मिठी मारली.

    “जा आता जाऊन झोप,” त्या त्याला बाजूला करत म्हणाल्या. त्याने आईला स्माइल दिली आणि झोपायला निघून गेला. उद्याची स्वप्ने बघत तो लगेचच झोपूनही गेला. पण त्याला हे माहिती नव्हतं की, उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ घडवणार आहे…

    इन ऑफिस…

    शार्वी आज ऑफिसला नेहमीपेक्षा लवकर आली होती. कधी एकदा पार्थला मनातलं सांगते, असं तिला झालं होतं. ती केबिनमध्ये बसून त्याच्या येण्याची वाट बघत होती. पण तो काही आज लवकर येत नव्हता! तिला एक एक सेकंद खूप मोठा वाटत होता. काही वेळाने तो त्याच्या नेहमीच्याच टाइमवर ऑफिसमध्ये आला. गरिमा आधीच आली होती. त्याने तिला एक स्माइल दिली आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. मधूनच ती त्यालाच बघत होती. आज तिला तो खूप हँडसम दिसत होता आणि आज खरंच गरिमाला सरप्राइज देण्यासाठी तो खास तयार होऊन आला होता. व्हाईट शर्ट त्याला खूप शोभून दिसत होता. स्लीव्हज फोल्ड केल्यामुळे त्याची चेस्ट आणि मसल्स उठून दिसत होते. त्यात त्याची ती खोल नजर एखाद्याला घायाळ करायला पुरेशी होती. त्याला बघून, स्वतःवरचा कंट्रोल सुटतो की काय, असं तिला वाटत होतं. मग तिने कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला, जे तिच्यासाठी शक्य नव्हतं. मन फिरून फिरून तिथेच… पार्थवर येऊन अडकत होतं.

    शेवटी तिने कसंतरी काम सुरू केलं. काहीवेळाने तिला एक फोन आला त्यावरचं बोलणं ऐकून ती खूश झाली. तिने गरिमाला बोलावून सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला सांगितल्या.

    काहीवेळाने तिने पार्थला केबिनमध्ये बोलावून घेतलं. तो आल्यानंतर तिने त्याला तिच्यासोबत मीटिंगमध्ये चलण्यास सांगितले आणि लंचही तिथेच करणार, हेही सांगितले.

    पर्सनल सेक्रेटरी असल्यामुळे गरिमाही तिच्यासोबत जायला निघाली. पण शार्वीने तिला थांबवलं. गरिमाला थोडस वेगळं वाटलं, पण काहीही झालं तरी, ती तिची बॉस होती. त्यामुळे ती शांत बसली. पण पार्थला काळजी घेण्यासही सांगितलं.

    पार्थ आणि शार्वी त्यांच्या ठरलेल्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहचले. त्याची पाहिलीच वेळ होती, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येण्याची. ती त्याला घेऊन एका व्हीआयपी एरियाकडे गेली. त्याने पाहिलं तर तो एरिया खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेला होता.

    तिने त्याला बसायला सांगितलं. काही वेळाने एक वेटर आला ऑर्डर घेण्यासाठी, तिने त्यालाच ऑर्डर करायला सांगितलं. त्याने त्याची ऑर्डर दिली. ऑर्डर आली तसं दोघांनी जेवण केलं. सगळं झाल्यावर त्याने तिला मीटिंगबाबत विचारलं. तर, तिने मीटिंग कॅन्सल झाल्याचं सांगितलं.

    थोडावेळ शांततेत गेला. शेवटी तिनेच शब्दांची जुळवाजुळव करून बोलायला सुरुवात केली…

    “पार्थ, मला तुझ्याशी थोडं बोलायच होत…” ती त्याच्याकडे बघत म्हणाली.

    “हं… बोला ना मॅम…” तो अदबीने म्हणाला.

    “पार्थ, खरंतर मला समजतं नाही की, तुला कसं सांगू… पण I Love You (मी प्रेम करते तुझ्यावर)… माहिती नाही, मी कधी आणि कशी तुझ्या प्रेमात पडले. पण आता असं वाटतंय की, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत…” ती त्याच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली.

    हेही वाचा – शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    त्याच्या चेहऱ्यावर शॉक लागलेले एक्स्प्रेशन होते. त्याला माहिती होतं की, तिला बहुतेक तो आवडतो… पण त्याला वाटलं नव्हतं की, हे सगळं असं अचानक होईल आणि ती त्याला असं डायरेक्ट विचारेल!

    “बोल ना पार्थ… माझ्याशी लग्न करशील?” ती त्याचा हात पकडत म्हणाली.

    “हे… हे… काय बोलत आहात मॅडम. तुम्हाला समजतं आहे का? तुमची आणि माझी काहीच बरोबरी नाही… आणि तसंही माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच फीलिंग्स नाहीत. पण एक बॉस आणि एक स्त्री म्हणून मी तुमचा खूप रिस्पेक्ट करतो. मी आधीच दुसरं कोणावर तरी प्रेम करतो आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत, त्यामुळे तुमच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे, ते प्लीज काढून टाका. तुम्हाला माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला मुलगा मिळेल. प्लीज हे सगळं इथंच थांबवा. मी आशा करतो की, आपल्यामध्ये बॉस आणि एम्प्लॉयीचंच नातं असेल…” त्याने तिच्यापुढे आपल मत मांडलं आणि शार्वीचं पुढचं काही ऐकून न घेता तो निघून गेला.

    शार्वी तो गेला त्या दिशेला शॉक होऊन बघत होती… “असा कसा हा मला नाही म्हणू शकतो? कितीतरी मुलं माझ्या पाठी आहेत. पण मी स्वतःहून तुला विचारलं आणि तू काय केलं माझा अपमान! This is not fair Mr. Parth (हे काही ठीक नाही मिस्टर पार्थ)…” ती रागाने म्हणाली.

    तिने आपली पर्स घेतली आणि रागात पाय आपटत निघून गेली. पण तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती…

    क्रमश:
    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026 ललित

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026 ललित

    वास्तव… जुईला कळली स्वप्नीलची तडजोड!

    August 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    उमाच्या मनात नवी शंका

    By हेमा पाटीलAugust 6, 2026

    भाग – 7 दोन दिवस माहेरी जा, असे पारूबाई म्हणाल्या खऱ्या, पण उमाला आपल्या सासूबाईंच्या…

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026

    वास्तव… जुईला कळली स्वप्नीलची तडजोड!

    August 5, 2026

    विकेट

    August 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं

    August 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 386
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 521
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 245
    • मैत्रीण 24
    • ललित 832
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.