Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 6, 2026Updated:August 6, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 15 श्रावण शके 1948; तिथि : अष्टमी 18:52; नक्षत्र : भरणी 20:13;
    • योग : गंड 15:00; करण : बालव 07:50, तैतिल 29:47;
    • सूर्य : कर्क; चंद्र : मेष 25:52; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    लेखिका, कवयित्री, अभिनेत्री, गायिका योगिनी जोगळेकर

    टीम अवांतर

    लेखिका, कवयित्री, नाटककार, अभिनेत्री, गायिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म 6 ऑगस्ट 1925 रोजी पुणे येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांची पहिली कविता शाळेच्या “बालिका-दर्शन’मध्ये छापून आली. शालेय जीवनात “निशिकांतची नवरी’ या नाटकात त्यांनी भूमिका केली होती. शिक्षण घेत असताना संगीत, लेखन, अभिनय, वक्‍तृत्व, चित्रकला अशा अनेक विषयांत त्यांनी प्राविण्य मिळविले होते.

    योगिनी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शंकरबुवा अष्टेकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. याशिवाय राम मराठे यांचे शिष्यत्वदेखील त्यांनी पत्करले. पुढे त्या गाण्याचे स्वतंत्र कार्यक्रमही करू लागल्या. एचएमव्हीने त्यांच्या ध्वनिमुद्रिकादेखील  काढल्या. पुढे योगिनी जोगळेकर यांनी “पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी पार्श्‍वगायनदेखील केले. आकाशवाणीवर पहिल्यांदा ज्यावेळी गीतरामायणाचे प्रसारण झाले, त्यावेळी ‘विरूप झाली शूर्पणखा’ हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी गायले होते.

    हेही वाचा – पोट सहनशील, पण…

    संस्कृत आणि मराठी हे दोन विषय घेऊन त्या सर परशुराम महाविद्यालयातून बीएच्या अंतिम वर्षी पहिल्या आल्या. त्या वेळी त्यांना विद्यापीठाकडून “यशोदा चिंतामणी’, “कुसुम वाघ’, “विंझे’ ही तीन मानाची पारितोषिके तसेच तंबोरा बक्षीस म्हणून मिळाला. त्यानंतर 1948 ते 1953 या काळात पुण्यातील सरस्वती मंदिरात शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे सामाजिक कार्यही केले.

    त्यांच्या नावावर 116 पुस्तके आहेत, ज्यात 50 कादंबऱ्या, 39 कथासंग्रह आणि कवितासंग्रह, बाल कविता इत्यादी अनेक पुस्तकांचा समावेश आहे. भास्करबुवा बाखले यांच्यावरील त्यांची ‘या सम हा’ आणि राम मराठे यांच्यावरील ‘राम प्रहार’ या कादंबऱ्या विशेष गाजल्या आणि त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

    त्यांचे लेखन बहुविध असले तरी मुख्यत्वे करून कौटुंबिक नाते-संबंधांतील ताण-तणाव, संघर्ष यांवर आधारित असायचे. बदलत्या आधुनिक जगातील उच्चभ्रू वर्गाची सामान्य माणसासोबत असणारी वर्तणूक याचा त्यांनी आपल्या लेखांतून समाचार घेतला, त्यामुळेच त्यांचे लेखन वाचकांना कायम आवडले. जोगळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार तसेच 2002 मध्ये 75व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महिला लेखिकांचा सन्मान करणारा अमृत महोत्सवी पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले. 1 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आत्मविश्वास आणि नवीन संधींनी भरलेला दिवस असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल. सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल असेल. आरोग्य चांगले राहील, मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित दिनचर्या राखणे आवश्यक असेल.

    वृषभ – उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येणारा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल, तुमचे वरिष्ठ देखील प्रभावित होतील. आर्थिक बाबींसंदर्भात आधी विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान यांचा जीवनशैलीत समावेश करा. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. कठोर परिश्रमांनीच सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

    मिथुन – आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा असेल. तुमचे बोलणे आणि वागणूक इतरांना प्रभावित करेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. याशिवाय तुमचे सामाजिक वर्तुळही विस्तारेल. आपले विचार आत्मविश्वासाने व्यक्त करा. नकारात्मक विचार टाळण्यासाठी ध्यानधारणेची मदत घ्या.

    कर्क – ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला दिवस असेल. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय यश मिळवून देऊ शकतात. आपल्या वेळेचा सदुपयोग करा, ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्य सामान्य राहील, परंतु संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल.

    सिंह – या राशीच्या जातकांची सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्ये उद्या सर्वांना प्रभावित करतील. कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थितीतही तुम्ही चांगली कामगिरी कराल. नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल असेल. इतरांच्या मतांना महत्त्व दिल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

    कन्या – आजचा दिवस तुमच्या योजना पूर्ण करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. कुटुंबासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्य सामान्य राहील, अर्थात, तुमचा दिनक्रम नियमित ठेवा. कठोर परिश्रम आणि शिस्त तुम्हाला यशाकडे घेऊन जातील.

    तुळ – सहकार्य आणि संवादाचा असा दिवस असेल. तुमची संभाषणशैली लोकांना प्रभावित करेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. जुने संबंधही अधिक सलोख्याचे होतील. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि आपले विचार स्पष्टपणे मांडा. तुमच्याबद्दलचा सामाजिक आदर वाढू शकतो.

    वृश्चिक – नवीन आव्हाने आज जशी समोर येतील तशाच काही संधीही मिळतील. तुमची प्रबळ इच्छाशक्ती कठीण परिस्थिती सोपी करेल. सामाजिक जीवनात संयम बाळगा आणि गैरसमज टाळा. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या. आराम करण्यासाठी थोडा जास्त वेळ काढा.

    हेही वाचा – नात्यांमधील फ्रेंडशिप!

    धनु – आजचा दिवस नवीन यशाचे संकेत घेऊन येणारा आहे. सामाजिक जीवनात नवीन लोकांना भेटणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे उत्साही राहाल. आत्मविश्वासाने पुढे जा, ज्याने यशाची शक्यता वाढेल.

    मकर – आजचा दिवस उत्साह आणि प्रेरणेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. मीटिंगमध्ये तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि कठोर परिश्रम करत राहा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल.

    कुंभ – सर्जनशीलता आणि नवीन संधी घेऊन येणारा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंध अधिक दृढ होतील. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे नवीन ओळखी होतील. स्वतःचे आरोग्य आणि मानसिक संतुलन टिकवण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.

    मीन – आत्मपरीक्षण आणि सर्जनशील कामाचा असा आजचा दिवस असेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक संतुलन राखा. आध्यात्मिक कार्यांमधील आवड वाढू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 सप्टेंबर 2026

    September 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 20 ते 26 सप्टेंबर 2026

    September 20, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरSeptember 21, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे – 53) कोणत्याही वयात – सर्जनशील अडथळे ज्योतिषीय सिद्धांत…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 सप्टेंबर 2026

    September 21, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 20 ते 26 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 20 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026

    एकटं टाकून…

    September 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची

    September 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 सप्टेंबर 2026

    September 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 442
    • अवांतर 208
    • आरोग्य 149
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 592
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 934
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.