Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    September 18, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 18, 2026

    तीन पिढ्या आणि ज्येष्ठा गौरी

    September 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : विकल्प जेणें जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : विकल्प जेणें जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    तेथ अंतरबाह्य गेले । निर्मळत्व एक जाहलें । किंबहुना उरलें । शुचित्वचि ॥474॥ म्हणोनि सद्भाव जीवगत । बाहेरि दिसती फांकत । जे स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे ॥475॥ विकल्प जेणें जेणें उपजे । नाथिली विकृति निपजे । अप्रवृत्तीचीं बीजें । अंकुर घेती ॥476॥ तें आइके देखे अथवा भेटे । परि मनीं कांहींचि नुमटे । मेघरंगें न कांटे । व्योम जैसें ॥477॥ एऱ्हवीं इंद्रियांचेनि मेळें । विषयांवरी तरी लोळे । परि विकाराचेनि विटाळें । लिंपिजेना ॥478॥ भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी । तेथ नातळें तियापरी । राहाटों जाणें ॥479॥ कां पतिपुत्रांतें आलिंगी । एकचि ते तरुणांगी । तेथ पुत्रभावाचां अंगीं । न लगेचि कामु ॥480॥ तैसें हृदय चोख । संकल्पविकल्पीं सनोळख । कृत्याकृत्य विशेख । फुडें जाणें ॥481॥ पाणियें हिरा न भिजे । आधणीं हरळु न शिजे । तैसी विकल्पजातें न लिंपिजे । मनोवृत्ती ॥482॥ तया नांव शुचित्वपण । पार्था गा संपूर्ण । हें देखसी तेथ जाण । ज्ञान आहे ॥483॥ आणि स्थिरता साचें । घर रिगाली जयाचें । तो पुरुष ज्ञानाचें । आयुष्य गा ॥484॥ देह तरी वरीलीकडे । आपुलिया परि हिंडे । परि बैसका न मोडे । मानसींची ॥485॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    अर्थ

    त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली, फार काय सांगावे! केवळ एक शुचित्व मात्र राहिले. ॥474॥ म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालतांना जसे बाहेरून दिसतात, तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर (इंद्रियद्वारा) प्रगट झालेल्या दिसतात. ॥475॥ ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्मांची बीजे अंकुर घेतात (ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ति होते) ॥476॥ अशा ज्या गोष्टी, त्या ऐकल्या, पाहिल्या किंवा भेटल्या, तरी त्या योगाने, ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामधे काही विकार उत्पन्न होत नाहीत. ॥477॥ एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विटाळाच्या विकाराने लिप्त होत नाही. ॥478॥ वाटेवरून ब्राह्मणाची स्त्री अथवा महाराची स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही अथवा दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोघींपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याचे त्यास ठाऊक असते. ॥479॥ एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते; परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो. ॥480॥ त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प, या दोघांची त्या अंत:करणास ओळख असते, विशेषत: कृत्य आणि अकृत्य काय आहे, हे ते अंत:करण पक्के जाणते. ॥481॥ जसा हिरा पाण्याने भिजत नाही, आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्या वृत्ति लिप्त होत नाहीत. ॥482॥ अर्जुना, यास पुरे शुचित्व म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पहाशील, तेथे ज्ञान आहे असे समज. ॥483॥ आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे. ॥484॥ त्या पुरुषाचा देह तर वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो, परंतु मनातील विचारांची स्थिरता बिघडत नाही. ॥485॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026 अध्यात्म

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    September 17, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    By Team AvaantarSeptember 18, 2026

    अध्याय तेरावा समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥28॥…

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    September 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    September 18, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 18, 2026

    तीन पिढ्या आणि ज्येष्ठा गौरी

    September 18, 2026

    ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?

    September 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 439
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 587
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 30
    • ललित 928
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    September 18, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 18, 2026

    तीन पिढ्या आणि ज्येष्ठा गौरी

    September 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.