Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची
    ललित

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीAugust 2, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, चिकनी चमेली, चिकनी चमेली आणि रोहन, रोहन आणि चिकनी चमेली मैत्री, तृतीयपंथी चिकनी चमेली, राजाला रोहनची चिंता, रोहनची माणुसकी, चिकनी चमेलीचा रोहनबद्दल आपलेपणा, चिकनी चमेलीची कहाणी, चिकनी चमेलीची पिळवणूक, चिकनी चमेलीचा मृत्यू
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    रोहन सधन घरचा. वडिलांचा छोटासाच, पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. पण या वेड्याला मुंबईची ओढ लागलेली. वडिलांच्या मागे लागून त्याने मुंबईत कॉलेजला प्रवेश घेतला होता.  कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी ओळख झालेल्या राजेश जगतापने त्याला आपली रूम (आणि भाडेही अर्थातच) शेअर करण्याची ऑफर दिली आणि त्याने ती सहज स्वीकारली. गेले सहा महिने राजा त्याचा सभ्यपणा अनुभवत होता.

    त्यांच्याच क्लासमधली कल्याणी देशमुख, भावी कॉलेज क्वीन हात धुवून रोहनच्या मागे लागली होती. पण रोहन काही तिला दाद द्यायला तयार नव्हता. त्या पार्श्वभूमीवर रोहनची चमेलीशी असलेली मैत्री जवळच्या सगळ्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय होऊ पाहत होती. राजाला एकच भीती वाटत होती, ती म्हणजे हे जर कॉलेजमध्ये पसरले तर, त्याचा रोहनच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता होती. राजाने निर्वाणीने हा प्रश्न विचारला, ““शब्दांचे खेळ नको खेळू माझ्यासोबत. तुझ्या चमेलीसोबतच्या नात्याला कसलेही ऑब्जेक्शन नाहीये माझे, तो तुझा व्यक्तिगत मामला आहे. पण एक मित्र म्हणून फक्त ते संबंध कशा स्वरुपाचे आहेत, हे जाणून घ्यायची इच्छा आहे मला.”

    आणि स्वतःच्याही नकळत रोहन परत भूतकाळात शिरला…

    एकदा विरारहून अंधेरीला परतत असताना ट्रेनमध्ये दोन-तीन तृतीयपंथी मिळून आपल्यातल्याच एका तृतीयपंथीयाला मारहाण करत होते. रोहनने माणुसकीच्या नात्याने मधे पडत त्या तृतीयपंथीयाची सुटका केली… तीच चमेली! त्यादिवशीच्या लोकलमधील भेटीनंतर बर्‍याच वेळा चमेलीची आणि त्याची भेट कुठे ना कुठे होत राहिली होती. कधी बस स्टॉपवर, कधी रेल्वे स्टेशनवर… कधी असेच बाजारात फिरताना. अंधेरी ईस्ट हा चमेलीचा व्यवसायाचा इलाखा होता. सुरुवातीला थोडा टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्याच्या कायम काही तरी हटके शोधण्याचा आणि मग स्वतःला झोकून देण्याचा स्वभाव त्याला चमेलीच्या बिनधास्त आणि बेफिकीर वागण्याकडे आकर्षित होण्यापासून रोखू शकला नव्हता. कुठल्यातरी क्षणी त्याच्या मनाने स्वीकारले होते की, चमेली एक चांगली मित्र होऊ शकते आणि त्याच्यासाठी ते पुरेसे होते.

    हेही वाचा – चिकनी चमेली अन् रोहन

    “तू प्रॉपर कुठली आहेस?”

    “क्या करेगा जानकर? शादी बनायेगा मेरेसे? बच्चे तो हो नही पायेंगे.”

    आपल्या नेहमीच्या बेफिकीर स्टाईलमध्ये चमेलीने उलट विचारले आणि रोहन एकदम कावराबावरा झाला. काय उत्तर द्यावे तेच सुचेना त्याला.

    “ए चिकणे, डर मत… मै तो ऐसेइच मजाक कर रैली थी! मै जानती है रे… आमच्या नशिबात हे शादी-बिदी काय नसतं राजा. गंमत म्हणजे, नशीब पण आपलं आणि जिंदगी पण आपली, पण तरीही दोघापैकी कुणावरच आपला हक्क नाही राहिलेला. तेरे को मालुम चार साल पैले एक ‘इन्सान’ मिला था…”

    “इन्सान? ते तर रोजच भेटत असतील तुला चमेली.”

    “कहाँ यार…., चार साल पैले एक मिला था होर उसके बाद अब जाके तू मिला है! आमच्यासारख्यांच्या किस्मतमध्ये साले जानवरच ज्यादा होते है! इन्सान होते कहां है हमारे लिये?”

    हसत हसत बोलणार्‍या चमेलीच्या आवाजातला दर्द अगदी सहजपणे रोहनच्या मनाला स्पर्शून गेला. आपली असहायता जाणवली आणि तो अजूनच अबोल झाला.

    “अरे रोहन, तू तो एकदम वो क्या बोलते है, सेंटिमेंटल हो गया यार! मैं तो ऐसेही मजाक कर रही थी…”

    आपल्या शब्दातला काटेरीपणा कमी करण्याचा प्रयत्न करत चमेलीने रोहनची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत काटा रुतायचा तो रुतला होताच. त्यानंतरच्या भेटींमधून कधीतरी रोहनला तिच्याबद्दल कळले होते –

    बिहारमधल्या कुठल्यातरी एका खेड्यातून ती मुंबईत आली होती, नव्हे आणली गेली होती. एका अतिशय परंपरावादी घराण्यात ती जन्माला आली होती. जन्मल्यानंतर काही काळातच तिच्यातला वेगळेपणा तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आला आणि त्या खेडेगावातील जुनाट परंपरा आणि रिती रिवाजांमध्ये अडकलेले कुटुंबीय साहजिकच तिच्यापासून दुरावत गेले होते. तिला तृतीयपंथी असण्याचा शाप मिळालेला असला तरी, तिचं शरीर मात्र एखाद्या स्त्रीप्रमाणेच डौलदार आणि आकर्षक होतं. लाजेकाजेस्तव घरच्यांनी जगापासून ही बाब लपवून ठेवली होती. पण सोळावं ओलांडलं आणि नियतीने दावा साधला…

    युपी-बिहारच्या अजूनही सरंजामशाही मिरवणार्‍या खेड्यातून जे होतं, तेच तिच्या बाबतीत झालं. गावच्या मुखियाची नजर पडली आणि वयाच्या सतराव्या वर्षी सर्वात पहिल्यांदा तिचं अपहरण झालं. मुखियाने मजा तर लुटलीच पण इतके दिवस लपवून ठेवलेलं गुपीत आता जगजाहीर झालं. लोकांच्या तिच्याकडे बघण्याच्या नजरा बदलल्या. गावातल्या रिकामटेकड्या टोळभैरवांना तर ‘ती’ म्हणजे हक्काची सोय वाटू लागली. घरच्यांनी तर नावच टाकलं होतं. आपल्या माणसांपासून तुटलेल्या चमेलीला चार वर्षांपूर्वी पहिला आधार मिळाला, तो ‘चमन’चा. तिच्या आयुष्यात आलेला पहिला ‘इन्सान’. चमनने तिला आपल्याबरोबर मुंबईला आणलं.

    “तू यकीन नै करेगा रोहन, पर चमन मेरे साथ ब्याह रचानेवाला था!”

    “काय सांगतेस काय चमेली?” रोहनसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. पण लगेच त्याच्या आवाजात संशय आला, “तुम्हें पक्का यकीन है?”

    “वो यहा गोदीमें वर्कर था! हमारे मुंबई आने के बाद दुसरेही हप्तेमें एक कंटेनर के नीचे दब गया, मै फिरसे अकेली हो गयी! लेकीन रोहन, वो एक हप्ता मैने जिंदगीके सारे सुख भोग लिये थे……! हम पुरी बंबई घुमे, कभी लोकल ट्रेन, कभी बस, कभी पैदल….. बहोत खुश थी मै, लेकीन हसते रहना शायद मेरी किस्मतमें नही था!”

    “फिर…?”

    “फिर क्या, कोशिश तो बहुत की कुछ काम करने की, मेहनत करने की! पर लोगों की नजरें होर नियते फिसलते देर नही लगती! मुझे तो ऊपर वालेने बला का हुस्न दिया था! बदकिस्मती से, किसी तरहा जमनामौसी को मेरे बारे में पता चलही गया! उसके बाद मुझे इनके गिरोह का मेंबर बनाया गया जबरन. दस दिन तक कमसे कम पच्चीस लोग मेरे को रोंदते रहे, किसी अनजान पलमें सारे अहसास मर गये, वही मेरेको यें नया नाम मिला – ‘चमेली’!

    शुरु शुरु में भोत रोती थी मैं, कई रातें जाग के निकाली हैं मैने उसकी याद में! लेकीन अब तो बस, यही साली हराम की जिंदगी है! साले इतने जानवर भरे हुये हैं यहां कि, तेरे जैसे इन्सान कमही मिलते है! तू यकीन नई करेगा रोहन, लेकीन तेरा वो दोस्त, राजेश भी दो बार मेरे साथ ‘बैठ’ चुका है!”

    चमेलीच्या डोळ्यात पाणी होते आणि रोहनच्या डोळ्यात प्रचंड आश्चर्य!

    “राजेश?”

    “यकीन नहीं होता ना? कभी पूंछ के देख उसको!… भोत सपने देखे थे मैने भी. तब कुछ समझता नहीं था. पास पडौस की औरते जब उनके शोहर के बारे में, बच्चों के बारे में बातें करती थी, तो मैं भी सोचती थी कि, कभी मेरी भी शादी होगी, प्यार करनेवाला शोहर होगा, बच्चे होगे. जब समझ आयी तो जाना कि, ये सपने मेरे बारे में तो कभी पूरे नहीं होने वाले. भोत रोयी थी उस वक्त… उसके बाद तो जैसे आँसू ही सुख गये.”

    चमेलीने एक शुष्क नि:श्वास सोडला!

    त्यानंतरच काही दिवसांनी ‘कल्याणी’ने रोहनला प्रपोज केले होते. खरेतर रोहनलाही कल्याणी आवडायला लागली होती. पण का कोण जाणे त्याने कल्याणीला स्पष्टपणे नकार देवून टाकला. तो स्वतःच प्रचंड गोंधळलेला होता. नक्की काय चाललंय आपल्या मनात… हे कसलं द्वंद्व आहे… कल्याणी की…?

    छे छे… काही तरीच! पण मग आपण कल्याणीला नकार का दिला? कमॉन रोहन, स्वतःलाच फसवण्याचा प्रयत्न करू नकोस रे… त्याने तुलाच त्रास होणार आहे. पण चमेली..? मग आई-बाबा? कस्सं शक्य आहे हे? एक गोष्ट मात्र नक्की, चमेलीने मनात घर केलय हे पक्कं!

    0000

    “रोहन, रोहन्या… फोन वाजतोय तुझा. कोण पेटलाय बघ तरी जरा.”

    राजाचा आवाज ऐकला आणि रोहन वर्तमानात परत खेचला गेला. त्याने खिशातून मोबाइल काढून कानाला लावला…

    “हॅलो, रोहन जागीरदार बोलतोय.”

    हेही वाचा – प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    “मी हवालदार डोइफोडे बोलतोय, डी.एन. नगर पोलीस चौकीतून. तुम्हाला लगेच इथं चौकीवर यावं लागेल.”

    “पण कशासाठी? मी काय केलंय आणि फोन नंबर कुठे मिळाला तुम्हाला?”

    “साहेब, एका डेडबॉडीच्या खिशात मोबाइल सापडलाय. एक चिठ्ठीपण आहे, चिठ्ठीवरच मागे तुमचा नंबर लिहिलेला होता नावासकट… म्हणून तुम्हाला फोन लावलाय.”

    “डेडबॉडी?”

    ”एका तृतीयपंथीयाची डेडबॉडी आहे साहेब. तुमच्या नावाने एक चिठ्ठीसुद्धा आहे.”

    रोहनच्या हातातला फोन पडता पडता वाचला. तेवढ्या बस कुठल्यातरी स्टॉपला थांबली. तसा रोहन धडपडत उठला आणि बसमधून उतरला. ‘अरे-अरे’ करत राजाही त्याच्या मागे उतरला…

    “रोहन, काय झालं? कुणाचा फोन होता? तू एवढा घाबरल्यासारखा का वाटतोयस?”

    रोहनने काही न बोलता एक रिक्षा पकडली, तसा राजाही त्याच्यामागोमाग रिक्षात शिरला.

    रोहन गप्पच होता.

    डी. एन. नगर पोलीस चौकीसमोर रिक्षा थांबली, रिक्षावाल्याच्या अंगावर 100ची एक नोट टाकत रोहन चौकीच्या आत धावला. चेंज परत घेण्यासाठी थांबावे की, नको याचा विचार करण्याची पाळी राजाची होती. पण रोहनला इतका घाबरलेला पाहून तोही तसाच त्याच्यामागे चौकीत पळाला.

    “साहेब, मी रोहन जागीरदार!”

    हवालदाराने त्याच्याकडे एकवार खालपासून वरपर्यंत पाहिले.

    “हं… चांगल्या घरातले दिसता?”

    “हवालदार साहेब, घरे सगळी चांगलीच असतात. त्यातली माणसे बरी-वाईट असतात. तुम्ही मुद्द्याचे बोला. चमेली कुठे आहे?”

    “म्हणजे तुम्ही त्या तृतीयपंथीयाला ओळखताय तर…”

    “ती चिठ्ठी?”

    हवालदाराने ती चिठ्ठी त्याच्या हातात सरकवली आणि एक रजिस्टर पुढे केले…

    “इथे सही करा. चिठ्ठी अर्धवटच आहे. सुरुवात केली असावी, पण नंतर बहुदा विचार बदलला असावा म्हणून अर्धवटच सोडून दिलीय. किमान चार दिवसांपूर्वीची आहे. मघाशी समोरच्या चौकात एका ट्रकने उडवले, जागच्या जागी खल्लास. बॉडी क्लेम करायची असेल तर उद्या संध्याकाळी या हॉस्पिटलमध्ये.”

    हवालदाराने अतिशय कोरड्या स्वरात सांगितले. खरेतर, त्याने एवढेही श्रम घेतले नसते, पण चमेलीकडे सापडलेली ती चिठ्ठी त्याने वाचली असावी बहुदा…

    “रोहन,

    प्यारे या शब्दावर काट मारलीय, क्युंकी मैं उस काबिल नहीं. जब भी तुम्हे देखेती हूं, मुझे मेरे चमन की याद आती है! दो ही तो ‘इन्सान’ मिले थे जिंदगी में… एक ‘वो’ होर एक ‘तू’! कभी कभी लगता है, कही मेरेको तुमसे प्यार तो नही हो गया! साला ये दिलभी अजीब हिमाकती है, इतनी ठोकरे खायी, फिरभी आस नही मिटती! लिख तो रही हूं लेकीन मुझे नही लगता कभी ये चिठ्ठी तुम्हें देने की हिंमत भी कर पाऊंगी या नही? काश, तुम्हारी तरह मैं भी नॉर्मल इन्सान होती!

    दिल तो बहुत करता है की शादी होती, बच्चे होते तो कितना मजा आता जिंदगी में! लेकीन साली अपनी जिंदगी भी खाली बोतल की तरह…

    एक बात बताऊं…”

    इथून पुढे काहीच लिहिलेले नव्हते, आणि आता कधीही लिहिले जाणार नव्हते.

    रोहनचा चेहरा वेदनेने पिळवटून गेल्यासारखा दिसत होता. डोळे भरून आले होते. हवालदार आश्चर्याने एकदा रोहनकडे तर, एकदा राजाकडे पाहात होता. एका लावारिस तृतीयपंथीयासाठी डोळ्यांत पाणी आणणारा तरुण त्याने प्रथमच पाहिला होता. रोहनचे डोळे सारखे सारखे त्याच ओळींवरुन फिरत होते.

    “दिल तो बहुत करता है की शादी होती, बच्चे होते तो कितना मजा आता जिंदगी में! लेकीन साली अपनी जिंदगी भी खाली बोतल की तरह…”

    त्याने मनाशी काहीतरी निश्चय केला…

    “राजा, खिशात किती पैसे आहेत तुझ्या? माझ्याकडे अडीच-तीन हजार आहेत.”

    राजाने खिसा चाचपला, हजारभर निघाले त्याच्याही खिशात.

    “यात सोन्याच्या दोन वाट्या आणि काळे मणी नक्कीच येतील! चल…”

    रोहन उत्साहात बाहेर पडला, काहीच न कळल्याने राजाही त्याच्यामागे बाहेर पडला.

    चमेली आयुष्यभर एक तृतीयपंथी म्हणून जगली होती, पण मेल्यानंतर का होइना ‘सौ. चमेली रोहन जागीरदार’ म्हणून सुखाने सरणावर चढणार होती.

    समाप्त
    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026 ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    फ्रेंडशिप डे

    By सतीश बर्वेAugust 2, 2026

    ‘‘फ्रेंडशिप डे’पर्यंत तरी माझा श्वास चालू रहाण्यासाठी प्लीज प्रार्थना करा देवाजवळ सगळ्यांनी!’ रविवारी सकाळी वैजूचा…

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 381
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 516
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 823
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.