मागील लेखात आपण थायराइड विकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण हर्निया विकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात.
हर्निया (आंत्रवृध्दी) विषयी थोडक्यात
हर्निया विकारात पोटाचे स्नायू शिथिल झाल्याने आतड्याचा भाग स्नायूबंधनातून बाहेर येतो. आता आपण हर्निया विकारासाठी उपयुक्त योगाभ्यास मार्गदर्शन घेऊयात.
योगासने अभ्यास
शयनस्थितीतील आसने
- उत्तानपादासन
- परिपूर्ण नावासन / द्रोणासन
- सर्वांगासन
- मत्स्यासन
- अनंतासन
- शवासन
बैठक स्थितीतील आसने
- उष्ट्रासन
- सुप्त वज्रासन
- उग्रासन
- भद्रासन
- शवासन
योगाभ्यास करताना शवासन हे विश्रांतीदायक आसन अवश्य घ्यावे.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन…
प्राणायाम अभ्यास
- कपालभाती
- अनुलोम-विलोम प्राणायाम
हस्त मुद्रा
- प्राण मुद्रा
आता आपण हर्निया विकारासाठी आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेऊयात.
आहार मार्गदर्शन – काय खावे?
- मेथी
- शेपू
- सफरचंद
अपथ्याहार – काय खाऊ नये?
- रात्रीच्या आहारात बटाटे, आंबट पदार्थ, पापड, लोणचे, बेसन इत्यादी घेऊ नये.
घरगुती उपाय
- बद्धकोष्ठता टाळण्यासाठी एरंडेल तेल घ्यावे.
- हर्निया झालेल्या रुग्णाने वजन उचलणे, उड्या मारणे, धावपळ करणे टाळावे.
- मलमूत्र विसर्जनावेळी जोर लावू नये.
अशा रितीने आपण हर्निया विकारासाठी योगाभ्यासातील उपयुक्त योगासने, प्राणायाम आणि हस्त मुद्रा तसेच आहार आणि घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकात वरील सर्व अभ्यासाची कृती आणि आरोग्य लाभ याबाबत सविस्तररीत्या मार्गदर्शन केले आहे. शिवाय, वरील सर्व अभ्यासाची प्रत्यक्ष कृती माझ्या यूट्युब चॅनेलवरील Yoga for Hernia या व्हिडीओत पाहता येतील आणि यामुळे योगाभ्यास मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. सदर व्हिडीओची लिंक लेखाअंती दिली आहे. तसेच माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात सदर विषयावर सविस्तररीत्या मार्गदर्शन केलेले आहे.
हेही वाचा – वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
हर्निया विकारासाठी नियमित योगाभ्यास नक्कीच उपयुक्त आहे. तसेच नियमित सात्त्विक आहार सेवन देखील अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


