Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 30, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥413॥ म्हणे गुरूचें भुवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें ॥414॥ निर्गमागमीं दातारें । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि द्वारें । द्वारपाल ॥415॥ पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । बारीपण ॥416॥ मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता । स्वामीपुढें खोलता । होईन मी ॥417॥ मीचि होईन सागळा । करूं सुईन गुळळां । सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥418॥ हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन । उळिग मी करीन । आंघोळीचें ॥419॥ होईन गुरूचें आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥420॥ मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु । आपणपेनि श्रीगुरु । वोंवाळीन ॥421॥ जे वेळीं देवो आरोगिती । तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं । मीचि होईन पुडती । देईन विडा ॥422॥ ताट मी काढीन । सेज मी झाडीन । चरणसंवाहन । करीन मीचि ॥423॥ सिंहासन होईन आपण । वरि श्रीगुरु करिती आरोहण । होईन पुरेपण । वोळगेचें ॥424॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें

    अर्थ

    गुरूच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे तो मनोरथांच्या अनंत सृष्टि तयार करतो. ॥413॥ तो म्हणतो, गुरूंचे राहते घर, मी स्वत: होईन व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी (मीच) करीन. ॥414॥ श्रीगुरु बाहेर जातेवेळी व घरात येतेवेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मी होईन. आणि घराची दारे व दारांवरील राखण करणारे गडी मीच होईन. ॥415॥ श्रीगुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्यांचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन. ॥416॥ श्रीगुरूंना खड्डा, उंचवटा जाणविणारा (चोपदार) मीच होईन, त्यांच्यावर चवरी धरणारा मीच होईन, त्यांना हात देणारा मीच होईन व श्रीगुरूपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन. ॥417॥ श्रीगुरूंची झारी धरणारा शागीर्द मीच होईन व त्यांना चूळ भरण्याकरिता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. ॥418॥ श्रीगुरूंना विडा देण्याची सेवा मीच करीन, त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. ॥419॥ गुरूंचे आसन मी होईन, त्यांच्या अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादि उपचार मीच होईन. ॥420॥ श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूस ओवाळीन. ॥421॥ श्रीगुरु जेव्हा भोजन करतील, तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व (भोजन झाल्यानंतर त्यांच्या) पुढे मीच होईन आणि विडा देईन. ॥422॥ श्रीगुरूंचे भोजन केलेले पान मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय मीच चेपीन. ॥423॥ मी स्वत: सिंहासन होईन, त्यावर गुरु बसतील व मी त्यांची संपूर्ण सेवा करीन ॥424॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    July 29, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें

    July 28, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    By डॉ. शिरीष कुलकर्णीJuly 30, 2026

    आपल्या आत्मिक आनंदासाठी ‘हनुमान चालीसा’ गायन ही खरोखरच एक अद्भुत पर्वणी असते. गोस्वामी तुलसीदास यांनी…

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    July 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें

    July 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हृदयशुद्धीचां आवारीं, आराध्यु तो धुरु करी

    July 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026

    बिघाड

    July 30, 2026

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    July 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 378
    • अवांतर 200
    • आरोग्य 134
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 512
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 243
    • मैत्रीण 24
    • ललित 816
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.