मेष
- या आठवड्यात विसराळूपणावर मात करा, सतर्क रहा. नोकरदारांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन जोडधंदा सुरू करायचा असल्यास योग्य नियोजन केल्यास भविष्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक वर्गाला कामानिमित्त परदेशात जाण्याचा योग आहे. व्यवसायविषयक प्रदर्शन आणि उत्सव यशस्वी होतील. महिलांनी आप्तेष्ट आणि नातेवाईकांशी वादविवाद टाळावेत; शांत राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा.
वृषभ
- या आठवड्यात अति आत्मविश्वास टाळा. नोकरदारांनी सरकारी नोकरीत प्रलोभनांपासून दूर राहावे. नोकरीतील राजकारण आणि गटबाजीपासून सावध रहा. बदलीची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने शेअर मार्केटमध्ये नवीन गुंतवणूक करू नये. कोणाच्याही बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका. नवीन प्रकल्प स्वीकारताना सर्व बाजूंनी बारकाईने विचार करा. महिलांनी आर्थिक निर्णय शांतपणे घ्यावेत. विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. पण त्यासाठी मोठा धोका पत्करू नका.
मिथुन
- या आठवड्यात कामे वेगाने पूर्ण करू शकाल. नोकरदारांसाठी नोकरीत सर्वसामान्य परिस्थिती राहील. तथापि, नव्या घडामोडींबाबत, तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत रहा. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक वर्गाकडून हातातील कामे वेळेत पूर्ण केली जातील. त्यासाठी छोटे प्रवास होतील आणि प्रवासात लाभदायक ओळखी होतील. महिलांचा काळ आरामदायी राहील, मात्र खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.
कर्क
- या आठवड्यात तरुणांचे प्रश्न सुटतील. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वादविवाद मिटतील. व्यावसायिक वर्ग चांगली प्रगती करेल. उत्पन्न वाढून आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यवसायवाढीचे नियोजन करता येईल. महिलांनी परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. माहेरी जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
- या आठवड्यात स्वप्ने साकार होतील. नोकरदारांनी आपल्या अधिकाराच्या कार्यकक्षा ओळखून काम करावे. प्रलोभनांपासून दूर रहा. कुटुंबातील तरुणांची प्रगती होईल. व्यावसायिक वर्गाच्या जीवनात काही कडू-गोड घटना घडतील. कामात उत्साह राहील. निर्णय पूर्ण विचाराअंती सावधगिरीने घ्या. महिलांच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात. अशाने स्वतःचे खच्चीकरण होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि कुसंगतीपासून दूर रहावे.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती
कन्या
- हा आठवडा गतिमान कालावधीचा राहील. नोकरदारांवर कामाचा ताण राहील. कोणालाही पैसे उधार देऊ नका. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधाल. त्यामुळे सरकारी कामे लवकर होतील. व्यावसायिक वर्गासाठी परिस्थिती सामान्य राहील. काही काळापासून अडकलेले पैसे मिळतील. जुनी येणी वसूल होतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. घरी पाहुणे येतील, त्यामुळे महिलांची लगबग राहील. तसेच, एखादी चिंता सतत लागून राहील. विद्यार्थी आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करू शकतील.
तुळ
- या आठवड्यात विशिष्ट मान-सन्मान मिळतील. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यावसायिक वर्गाला लांबचे प्रवास करावे लागू शकतात. शत्रू आणि हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. आधी केलेल्या गुंतवणुकीवर भरघोस लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक मार्गांनी पैसे येतील. महिलांच्या बाबतीत घरातील तरुण-तरुणींचे विवाह ठरल्याने उत्साही वातावरण राहील. त्यानिमित्त छोटे प्रवास होतील. विद्यार्थ्यांनी जवळच्या मित्र-मैत्रिणींवर अतिविश्वास ठेवू नये आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगू नयेत.
वृश्चिक
- या आठवड्यात अडथळे येतील; मात्र त्यावर मात कराल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या नोकरदारांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. व्यावसायिक वर्गाच्या व्यापारात वाढ होईल. नफा मिळेल. नियोजनात आणि व्यावसायिक धोरणात सकारात्मक बदल करता येतील. महिलांची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची मदत मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रवासात महत्त्वाची कागदपत्रे आणि पाकीट सांभाळावे.
धनु
- या आठवड्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरदारांच्या कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पुढाकार घेऊन, शांततेत चर्चा करून प्रश्न सोडवा. कामाच्या ठिकाणी सामान्य परिस्थिती राहील. व्यावसायिक वर्गाला सामाजिक स्तरावर मान-सन्मान मिळेल. शत्रू आणि स्पर्धकांवर विजय मिळवाल. महिलांना स्वतःच्या कामासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल आणि ती वेळोवेळी मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळेल.
मकर
- या आठवड्यात आशावादी राहा. नोकरदारांच्या बाबतीत कामात अडचणी येऊ शकतात; मात्र त्यावर मात करून पुढे जा. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. व्यावसायिक वर्गाचे नियोजन यशस्वी होईल. तथापि, नवीन गुंतवणूक करू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्पर्धकांवर विजय मिळवू शकाल. महिलांनी जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. कार्यक्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांना मित्रवर्गाची आणि कुटुंबाची मदत मिळेल.
कुंभ
- या आठवड्यात घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या दृष्टीने अपेक्षित घटना घडतील. तथापि, घाईघाईत निर्णय घेऊ नका. शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणलाही उधार पैसे देऊ नका. व्यावसायिक वर्गाची वसुली होईल; मात्र त्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा वापर करू नका. जमीन-संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांमध्ये समज-गैरसमज होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मतभेद टाळा. विद्यार्थ्यांमधील कलाकार आणि खेळाडूंसाठी अनुकूल काळ आहे.
हेही वाचा – थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन
मीन
- या आठवड्यात स्पर्धकांवर मात कराल. नोकरीच्या शोधात असतील तर नवीन संधी उपलब्ध होतील. दैनंदिन जीवनात शिस्त आणि सूत्रबद्धता येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिक वर्ग प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस कामगिरी करतील. काही वादग्रस्त येणी वसूल होतील. राजकारणात असाल तर तुमचे वर्चस्व वाढेल. महिलांच्या बाबतीत वाहन खरेदीचा योग आहे. भौतिक सुखांची प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम जॉब मिळू शकतो. पूर्वी दिलेल्या मुलाखतींचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.


