Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…
    ललित

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    तृप्ती देवBy तृप्ती देवJuly 23, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, तृप्ती देव, लेखिका तृप्ती देव, कौतुकाची जादू, कौतुकाची गरज, कौतुक म्हणजे नवा श्वास, जगणं बदलणारं कौतुक, थकल्या जीवाला उभारी, कौतुकाचे शब्द,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    A few words of appreciation uplift the other person’s spirits

    ‘कौतुक’… एक जादुई शब्द

    तृप्ती देव

    “अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे, कालचा भात उरलाय अजून,” सासूबाई म्हणाल्या, “ओट्यावर भांडी आहेत, ती पण लावून ठेव.”

    “हो आई, लक्षात ठेवलंय…” सुनबाईने सौम्यपणे हसून उत्तर दिलं.

    ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती.

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी,  सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण, नवऱ्याची तयारी… सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची.

    पण या सगळ्यात एक गोष्ट कायम जाणवत राहायची — कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं!

    नवीन जवाबदाऱ्या. नवीन घर सगळं व्यवस्थित सांभाळाचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळं नवीन…

    त्या दिवशी सकाळी चहा करताना, गॅसजवळ उभी असताना, तिला आईच्या शब्दांची आठवण झाली —

    “मुली, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं. स्वतःचं समाधान महत्त्वाचं.”

    ती हसली. पण मनात काही तरी चुटपुटत राहिलीच. तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या,

    “सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती… मी म्हटलं, सांगावं जरा.”

    सुनबाईचे डोळे क्षणभर विस्फारले… “म्हणजे… खरंच?”

    “हो गं! हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती. तुझ्या हाताला चव आहे. तुझी आई सुगरणच आहे ना?”

    ती काही बोलली नाही, फक्त गालातलं हसू लपवत राहिली.

    पहिल्यांदा… एवढ्या दिवसांत पहिल्यांदा, कुणीतरी तिने केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं. त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं…

    “माझं काम कुणीच ओळखत नाही,” ही तक्रार एका क्षणात विरून गेली. कारण, आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं, हे तिला जाणवलं.

    त्या दिवशी दुपारी, सासूबाई घराच्या ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांची पाठ थोडी वाकली होती, सुनबाईने लगेच धावत येऊन त्या पाण्याचे घागर स्वतः उचलली.

    “आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता! माझी तर दमछाक होते, पण तुमचे हात अजून सरावल्यासारखे चाललेत बघा, हे खरंच कौतुकास्पद आहे.”

    सासूबाई एक क्षण स्तब्ध झाल्या. मग त्या हसल्या,

    “अगं, मी ते काय विशेष करते, इतकी वर्षं केलंय म्हणून सवय झालीय.”

    “सवय म्हणून केली तरी, त्यात मेहनत आहे ना, आई? मी दररोज पाहते तुम्हाला – तुम्ही थकत नाहीत, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावं वाटतं.”

    सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसली.

    त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला, “घे गं, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या नजरेनं दाखवलंस.”

    कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला. सुनबाईने एक दिवस शेजारच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,

    “इतकं संयम ठेऊन शिकवतोस तू… खरंच, माझ्यासारखं घाईघाईनं ओरडून काही झालं नसतं. मुलाच्या आयुष्यात तू शिक्षकासारखं वागतोस!”

    तो थोडा गोंधळला. पण हसला… आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती.

    हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    दुसऱ्याच दिवशी, सासूबाईंनी सुनबाईच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या. मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलं होतं. ते भांडं हातात घेत सासूबाई म्हणाल्या,

    “तुझ्या हातात जादू आहे गं! माझ्या आईसारखी नक्षी आहे या रंगांत.”

    ते ऐकून सुनबाईचं मन फुलून आलं. ती एक क्षण मागे गेली — लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची, “तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं, असं आहे!”

    आणि एक संध्याकाळ… सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते. अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं… सुनबाईच्या एका वाक्याने ते भानावर आले — “बाबा, तुमची कविता किती गोड आहे! शेवट पूर्ण केलात, तर ती खरंच सुंदर वाटेल!”

    त्यांनी खळखळून हसत पेन उचललं, ती कविता त्यांनी त्या रात्री पूर्ण केली… हळूहळू घरात एक नवीन वळण आलं होतं…. जिथं टीका नव्हे, तर प्रोत्साहन ऐकू येत होतं… जिथं चुकांवर नाही, तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं.

    जिथं प्रत्येक वाक्यात “मी सांगितलं होतं” ऐवजी, “मस्त केलं!” असं ऐकायला यायचं. घरात एक नवीन वळण आलं होतं. घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं. एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या. सायंकाळचं गुलाबी ऊन आणि गार वारा…

    सासूबाई म्हणाल्या, “सुनबाई, मी तुला एक गोष्ट सांगू का?”

    “सांगा ना आई!”

    “मी लग्न होऊन या घरात आले, तेव्हा माझ्या सासूबाई, फार कठोर होत्या. मी काहीही केलं, ते कधीच योग्य वाटलं नाही त्यांना. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सणाला सजले… पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचा नाही म्हटला.”

    “मग तुम्ही काही बोललात नाही त्यांना?”

    “नाही गं. तेव्हा असं वाटायचं – ‘हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको…’ पण आताशा वाटतं, एकदाच म्हटलं असतं – ‘छान केलंय गं’ – तर माझ्या थकव्यात जरा जीव मिळाला असता.”

    सुनबाई शांत झाली. सासूबाई पुढे म्हणाल्या, “म्हणून मी ठरवलं, मी माझ्या सुनेचं कौतुक करणार. कारण ‘कौतुक’ हा शब्द नाही… तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं की, जास्त गोड लागतं.”

    त्या रात्री, सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं :

    “कौतुक ही भावना नसून ती संस्कृती आहे! ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे.”

    काही दिवसांनी, शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या… “ताई, माझ्या गोजिरीने कॉलेजात पहिल्यांदाच कविता लिहिलीय. ऐका ना.”

    गोजिरी थोडीशी घाबरत होती. पण सुनबाई हसून म्हणाली, “अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहेस.”

    मग गोजिरीने कविता वाचली, थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली… सुनबाईने तिला जवळ घेतलं…

    “अगदी मनापासून लिहिलंयस गं! शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोहोचते. खरंच, छान वाटली.”

    गोजिरीचे डोळे चमकले… सासूबाई आतून हसत बाहेर आल्या –

    “बघ, आता तुझं कौतुक… दुसऱ्यांचं आयुष्य उजळवतंय.”

    त्या घरात आता रोज काही तरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं –

    “तू छान केलंस”

    “अगदी बरोबर वेळेवर आलास…”

    “आजच्या जेवणात प्रेमाची चव होती…”

    “तू हसलीस, म्हणून दिवस उजळला…”

    कौतुकाचं ते वातावरण…

    कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची. कारण त्या घरात आता ‘कौतुक’ ही नित्यनेमाची परंपरा झाली होती.

    कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामावरची स्तुती नाही. कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना, आणि एक हलकंसं थोपटणं.

    हेही वाचा – साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    एक साधं “वा!”, “छान केलं!”, “तुझ्यामुळे जमलं!” असं म्हणणंही, कधी कधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं. ते शब्द नसतात… त्यात आश्वासकता असते — म्हणून जमलं तर कौतुक करा. कौतुक करायला पैसे लागत नाही. फक्त दोन शब्द लागतात… ते दोनच शब्द जगणं बदलतं… माणूस फुलतो.

    कौतुकाचा तो क्षण, कुणाच्या आयुष्यात वळण घेतो — हलकासा, पण खोलवर उमटणारा क्षण असतो.

    Avatar photo
    तृप्ती देव

    मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

    Related Posts

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026 ललित

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026 ललित

    बदला

    September 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सुधाकररावांची प्रस्तावना

    By दीपक तांबोळीSeptember 16, 2026

    पूर्वार्ध “सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय,” दारात उभा असलेला तरुण…

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 923
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.