नीलिमा विजय खडतकर
साहित्य
- गावरान हरभरे (चणे) – 1 कप
- कांदे – 2 मध्यम आकाराचे
- लसूण पाकळ्या – 10-12
- आलं – 1 इंच
- हिंग – अर्धा चमचा टीस्पून
- सुक्या खोबऱ्याचे काप किंवा किस – पान कप
- बटाटे – 3 मध्यम आकाराचे (उकडलेले)
- धणे – 1 टीस्पून
- लाल तिखट – 1 टेबलस्पून
- जिरे – 1 टीस्पून
- हळद – 1 टीस्पून
- हिरव्या मिरच्या – 2
- कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
- कढीपत्ता – 5-6 पाने
- बेसन – पाऊण कप
- काळा मसाला – 1 टीस्पून
- ओवा – अर्धा टीस्पून
- खायचा सोडा – चिमूटभर
- मीठ – चवीनुसार
- तेल – फोडणी आणि तळणासाठी
फोडणीसाठी
- मोहरी – अर्धा टीस्पून
- कमाल पत्र – 1
- लवंगा – 2
- काळे मिरे – 2-3
कृती
लज्जतदार रस्सा
- रात्रभरात किंवा 7-8 तास चणे भिजत घालावेत.
- सकाळी भिजलेले चणे कूकरमध्ये छान मऊ शिजवून घ्यावे. (3-4 शिट्ट्या घ्याव्यात).
- रश्श्यासाठी एक कांदा कापून घ्यावा.
- आता कढईत एक टीस्पून तेल घालून कापलेला कांदा लालसर परतून घ्यावा.
- कांदा लाल झाल्यावर खोबरेकाप, धणे, जिरं घालून परत छान लालसर परतून घ्यावे आणि काढून थंड होऊ द्यावे.
- थंड मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालावे, त्यातच पाच-सहा लसूण पाकळ्या आणि आलं घालावे. त्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यावी.
- गॅसवर कढईत एक मोठा चमचा तेल घालावे. तेल गरम झाल्यावर एक कमाल पत्र, दोन लवंगा, 2-3 मिरे घालावे.
- मग हिंग घालून त्यात तयार पेस्ट घालावी. सोबतच, लाल तिखट, हळद, मीठ घालावे आणि तेल सुटेपर्यंत परतावे.
- तेल सुटल्यावर बेसन घालून परत परतावे.
- नंतर त्यात दोन टीस्पून ओवा, नतंर चणे आणि काळा मसाला घालावा.
- मग पाणी घालून दोन-तीन मिनिटं उकळू द्यावे.
- वरून कोथिंबीर घालावी. झाला रस्सा तयार
आलू बोंडा
- प्रथम उकडलेले बटाटे छान बारीक कुस्करून घ्यावे. त्यात लसूण ठेचून घालावा.
- फोडणीसाठी कढईत तेल घालावे. तेल गरम झाल्यावर मोहरी घालावी, मोहरी तडतडल्यावर जीरे, लसूण घालावा.
- लसूण लालसर झाल्यावर हिरवी मिरची, कढीपत्ता, अर्धा टीस्पून लाल तिखट, हळद, मीठ, बटाटे घालून परतून घ्यावे. त्यात कोथिंबीर घालावी आणि एक वाफ येऊ द्यावी.
- झाला आलूबोंड्याचा मसाला तयार.
- तयार मसाल्याचे छोटे छोटे गोळे करावे.
- आता एका भांड्यात बेसन घ्यावे आणि त्यात चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून ओवा, चिमूटभर खायचा सोडा घालावा.
- नंतर पाणी घालून पातळसर पीठ करून घ्यावे (खूप पातळ नसावे).
- कढईत तेल गरम करावे, बटाट्याचा गोळा बेसन पिठात बुडवून तेलात सोडावा.
- मध्यम आचेवर सर्व आलूबोंडे तळून घ्यावे.
- सर्व्ह करताना डिशमध्ये आलूबोंडे ठेवावे आणि त्यावर भरपूर गरम रस्सा घालावा, वरून बारीक चिरलेला कांदा, शेव घालावी.
पुरवठा संख्या – 3-4 व्यक्तींसाठी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


