Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » घराच्या आकाशगंगेतील ग्रह…
    ललित

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेJuly 13, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, लेखक सतीश बर्वे, भावाबहिणीचे नाते, भाऊ बहिणीचे नाते, भाऊ बहीण स्नेहबंध, नीताचे लग्न, नीता राघवची कहाणी, राघवची उदासी, नात्याची कोजागरी, राघवची बेचैनी, घराच्या आकाशगंगेतील ग्रह, नीता दिदीचं लग्न
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    परवा रात्री नीताच्या, म्हणजे राघवच्या मोठ्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला होता. आवराआवरी करायला एक वाजून गेला होता. राघवने मला गेल्याच आठवड्यात निक्षून सांगितले होते की, हळदीचा कार्यक्रम संपल्यावर त्याला माझ्या आणि त्याचा आणखी एक जवळचा मित्र, चैतन्यसोबत रात्रभर गप्पा मारायच्या आहेत. त्याप्रमाणे राघवच्या बंगल्याच्या गच्चीवर आम्ही निवांतपणे बसलो होतो…

    “काका, आजवर एकही दिवस असा नसेल गेला की, मी आणि दिदी भांडलो नसू. खूप भांडायचो आम्ही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते विसरून देखील जायचो! आम्ही कॉलेजला गेल्यावर आमची भांडणं कमी झाली. पण आता दोन दिवसांनी दिदी नसेल भांडायला… खूप कठीण जाणार आहे मला हे सगळं पचवायला,” असं म्हणून राघव भावूक झाला होता.

    त्याच्या मांडीवर थोपटत मी म्हणालो, “राघव, अरे बहीण भावाच्या नात्याची स्ट्रॉबेरी अशीच आंबटगोड असते कायम. एकत्र असतात तेव्हा पटत नाही आणि लांब असतात तेव्हा करमत नाही! जरी दिवसभर भांडणं झाली असली तरी, ती वरवरची असतात कारण, रोज सकाळी या नात्याला रात्रीच्या आठवणी नसतात. शाळा संपून जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता, तेव्हा तुमच्या जगाच्या कक्षा रुंदावतात आणि तुम्ही एकत्र घालवलेले क्षण आपोआप कमी होतात. तू न सांगता उशिरा आल्यावर तिचा ओरडा तुला खटकतो, पण त्याचवेळी त्या ओरड्यामागची काळजी तुम्ही मुलं सोयीस्करपणे विसरता. तुमच्या रिझल्टच्या दिवशी तुमच्या इतकंच टेन्शन तिला पण आलेलं असतं आणि तुझ्या चेहऱ्यावरील आनंद बघायला ती देखील उत्सुक असते…”

    हेही वाचा – बेसनाचे लाडू… माँची आठवण

    “रक्षाबंधनच्या दिवशी तुझ्या हातावर राखी बांधताना आणि भाऊबीजेला तुला ओवाळताना तिच्या डोळ्यांत दिसणारं आनंद, हा कधीही न विसरता येणारा असतो…! आपल्या घराच्या आकाशगंगेतील आपण सारे ग्रह आहोत, जे देवाने ठरवून दिलेल्या नात्यांच्या कक्षेत फिरत असतात. सुरुवातीला जवळपास असणाऱ्या या कक्षा कालांतराने रूंदावत जातात, कारण एक घररूपी आकाशगंगा सोडून लग्न झाल्यावर मुलींचा सासरच्या आकाशगंगेत प्रवेश होतो… अगदी अलगदपणे! अशावेळी आपल्या आकाशगंगेच्या कक्षेत राहूनच आपल्यापासून दूर गेलेल्या बहिणीला भेटायला आता आधुनिक संदेशवहनाची साधनं उपलब्ध आहेत. शिवाय, त्या नात्याची पोकळी भरून काढण्यासाठी काही वर्षांत तू तुझी सहचारिणी आणणारच आहेस…” मी म्हणालो.

    “शेवटी काय नात्याच्या प्रत्येक ग्रहाचा आपल्यापर्यंत पोहोचणारा प्रकाश कालपरत्वे कमी अधिक होतच असतो आणि कालांतराने तो ग्रहच नवीन ग्रहांसाठी आपलं अस्तित्व गमावून बसतो,” असं सांगून मी त्याला म्हणालो, “जरी नीता दिदी तुझ्या सोबत नसली तरी, तुम्हा बहीण भावाच्या नात्याची कोजागरी पौर्णिमा मात्र प्रकाशमान राहून तुम्हा दोघांचीही आयुष्य कायम उजळवत रहातील… याची मुख्य जबाबदारी मात्र तुझी आहे आणि ती तुला शेवटपर्यंत यशस्वीपणे पार पाडायची आहे, हे मात्र कधीच विसरू नको…”

    इतका वेळ गप्प बसून माझं बोलणं शांतपणे ऐकणाऱ्या चैतन्यला देखील मी सांगितले की, “चैतन्य मी आत्ताच जे राघवला सांगितले, ते तुला देखील लागू होते हे लक्षात ठेव!”

    हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

    “राघव, नीताची अनुपस्थिती थोडे दिवस तुला नक्कीच बैचेन करेल. हीच बेचैनी म्हणजे तुमच्यात असलेलं घट्ट प्रेम, जे व्यक्ती जवळ नसताना आपल्याला त्या नात्याची जाणीव करून देत असतं… मला खात्री आहे की, तू लवकरात लवकर या बेचैनीतून सावरशील आणि तिच्या नसण्याची सवय तुला होईल… आणि जेव्हा जेव्हा तुझी बेचैनी वाढेल, तेव्हा नीता एका फोनच्या अंतरावर असेल, कायम तुझ्यासाठी. तेव्हा जास्त विचार न करता लग्नाच्या दिवसाच्या तयारीला लाग. मला शंभर टक्के खात्री आहे की, नीताच्या वरातीत तू आनंदाने तिला निरोप देशील…”

    आणि आज अपेक्षेप्रमाणेच झाले.

    आत्ता थोड्या वेळापूर्वी नीताची वरात निघाली आणि डीजेच्या तालावर राघवला चैतन्य आणि इतर मित्रांच्या सोबतीने दणक्यात नाचताना पाहून समाधान वाटलं…

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    अट

    August 31, 2026 ललित

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026 ललित

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अट

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 31, 2026

    “श्रावणी अगं झालीस का तयार? चल बाई, येतीलच आता मुलाकडचे इतक्यात.” श्रावणीची आई वसुधाताई हाका…

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026

    अरे देवा…

    August 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 415
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 559
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 890
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.