Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तुळस माझी भाग्याची!
    अवांतर

    तुळस माझी भाग्याची!

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, आषाढी एकादशी, पंढरीची वारी, पंढरपूरची वारी, आषाढीची वारी, आषाढी एकादशीची वारी, वारकऱ्यांची भक्ती, विठ्ठल दर्शनाची आस, पंढरीच्या कळसाचे दर्शन, ज्ञानोबा तुकाराम गजर, नीता चंद्रकांत कुलकर्णी, वारीत तुळशी वृंदावन, सखूच्या डोक्यावरील तुळशी वृंदावन, वारीत तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सखूबरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखूने लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून तुळशीची पूजा केली. हार घातला. भक्तीभावाने नमस्कार केला…

    बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल

    श्री ज्ञानदेव तुकाराम

    पंढरीनाथ महाराज की जय!

    असा गजर करून सखूने तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलं आणि म्हणाली,

    “तुळशीबाई चला निघूया वारीला…”

    हा सोहळा इतर झाडं कौतुकाने बघत होती.

    “किती गं भाग्यवान दरवर्षी तुला वारी घडते.”

    “ये गं बाई जाऊन…”

    “विठुरायाला, रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग…” असं म्हणून झाडांनी तिला हात जोडले.

    “मी कुठली जाते! सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते, म्हणून घडतं बघा. येते हं जाऊन…” असं म्हणत, झाडांचा निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला…

    हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा. ती या दिवसाची वाट पाहत असायची. दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा… अभंग, गौळणी, हरीपाठ, ओव्या कानी पडायच्या… फुगड्या खेळणाऱ्या साध्याभोळ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं. आनंदाने ती हरखून जायची.

    वरूणराजा बरसायचा… पावसाच पाणी अंगावर पडलं की, तिला कृतार्थ झालो, असं वाटायचं. रिंगणाचा सोहळा सुरू झाला की, पळणाऱ्या आश्वाकडे ती आश्चर्याने बघायची. दिंडीत चालताना एकदा शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग-रुक्मिणी होते; तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या! त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती .

    सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याच ओझं सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तुळशीकडे बघायची. तुळशीबाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची…

    “किती प्रेम करतेस गं” म्हणून सखूची आलाबला घ्यावी, असं तिला वाटायचं.

    मुक्कामी पोहोचल्यावर खाली ठेवलं तरी, येता जाता वारकरी श्रद्धेने वाकून नमस्कार करायचे. सखू तुळशी, मंजिऱ्या पालखीतल्या पादुकांना अर्पण करायची, तेव्हा तर तुळशीबाईला अपार आनंद व्हायचा. देवाच्या पायी जाऊन आपला जीव सार्थकी लागला, असं तिला वाटायचं…

    वारकऱ्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.

    लांबवर पालखी दिसायची… तो अनुपम  सोहळा किती बघू आणि किती नको, असं तिला होऊन जायचं… आपल्या भाग्याचा तिला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं…

    “तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला

    कसा बाई तिनी गोविंद वश केला…”

    तेव्हा डोळ्यासमोर श्रीकृष्णाचं मोहक रूप दिसायचं…

    वारी पंढरपूरला पोहोचल्यावर सखू चंद्रभागेच्या पाण्याने तिला स्नान घालायची… त्यावेळी तिचे पान न् पान थरथरायचे…

    एक मनातलं सांगू का?

    मला वाटतं वारीला निघालेल्या प्रत्येक तुळशीबाईची हीच भावना असेल… तिला शब्दांत व्यक्त करता येत नाही म्हणून मी शब्द रूप दिलेले आहे…

    वारी पंढरपूरला चालली आहे… तुळशीबाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या ताई, माईंचे मला अपार कौतुक वाटतं. अगदी सहजपणे डोक्यावर वृंदावन घेऊन या बायका लगबगीने चालत असतात. त्यांना बघायला मी वारीत जात असते… त्यांच्यातला साधा, निरागस भाव, गोडवा बघण्यासारखा असतो…

    हेही वाचा – आठवण आषाढी वारीची

    आपण काही विशेष करत आहोत, हे या बायकांच्या गावी पण नसतं! पायात साध्या चपला, नाहीतर स्लीपर असतात… आनंदाने भराभर चालत असतात. त्यांच्या तुळसप्रेमाचे मला फार अप्रूप वाटते. त्यांना माझा साष्टांग दंडवत.

    त्यांच्यासाठी हात जोडून देवाला विनवते…

    वारीत वाहता तुम्ही डोक्यावर तुळस…

    म्हणूनच दिसतो तुम्हा विठुरायाचा कळस…

    रुक्मिणी मातेला करते नवस…

    सुखी ठेव माझ्या या आया बहिणीस…

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    आठवण आषाढी वारीची

    July 10, 2026 अवांतर

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026 अवांतर

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    आठवण आषाढी वारीची

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 10, 2026

    श्रीयुत जनार्दन महाराजांच्या दिंडीबरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली. त्या…

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026

    बेबी स्वामीचरणी रुजू झाली…

    June 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 357
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 486
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 775
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.