मागील दोन लेखांमधून आपण वातविकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण मधुमेह या विषयावर मार्गदर्शन घेऊयात.
मधुमेहाविषयी थोडक्यात…
मधुमेह या आजारात रक्तातील साखरेचे (Glucose) प्रमाण खूप जास्त वाढते. इन्सुलिन हे रक्तातील साखर ऊर्जा म्हणून शरीरातील पेशींपर्यंत पोहोचण्याचे कार्य करत असते. जेव्हा स्वादुपिंड आवश्यकतेनुसार इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा मधुमेह ही समस्या भेडसावते. थोडक्यात, इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील पेशींना ग्लुकोज मिळत नाही आणि त्यांचे कार्य मंदावते आणि यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
मधुमेहाची लक्षणे
- सतत तहान लागणे.
- थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
- अचानक वजन कमी होणे.
- डोळ्यांना अस्पष्ट किंवा धूसर दिसणे.
- त्वचेचे संसर्ग होणे.
- वारंवार लघवी होणे.
मधुमेहाची कारणे
- व्यायामाचा अभाव
- बैठे काम
- जंक फूडचे अतिसेवन
- मानसिक ताणतणाव
थोडक्यात, अयोग्य जीवनशैली मधुमेहास कारणीभूत ठरते. तसेच अनुवंशिकतेमुळे देखील मधुमेह उद्भवू शकतो.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
आता आपण मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन घेणार आहोत.
योगासने अभ्यास
शयनस्थितीतील आसने
- पवनमुक्तासन
- मर्कटासन
- उत्तान वक्रासन
- सर्वांगासन
- मत्स्यासन
- शवासन
विपरीत शयनस्थितीतील आसने
- भुजंगासन
- शलभासन
- धनुरासन
- मकरासन
बैठक स्थितीतील आसने
- पद्मासन योगमुद्रा
- वज्रासन योगमुद्रा
- भूनमन वज्रासन
- मंडुकासन
- कुर्मासन
- सुप्त वज्रासन
- उष्ट्रासन
- शशांकासन
- अर्धमत्स्येंद्रासन
- पश्चिमोत्तानासन
- शवासन
योगाभ्यास करताना शवासन आणि मकरासन ही विश्रांतीदायक आसने अवश्य घ्यावीत.
प्राणायाम अभ्यास
- कपालभाती
- अनुलोम-विलोम प्राणायाम
- भ्रामरी प्राणायाम
हस्त मुद्रा
- प्राण मुद्रा
- अपान मुद्रा
- सूर्य मुद्रा
अशा रितीने आपण मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यासातील उपयुक्त योगासने, प्राणायाम आणि हस्त मुद्रा याविषयी जाणून घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकात वरील सर्व अभ्यासाची कृती आणि आरोग्य लाभ याबाबत सविस्तररीत्या मार्गदर्शन केले आहे. तसेच, वरील सर्व अभ्यासाची प्रत्यक्ष कृती माझ्या यूट्युब चॅनेलवरील Yoga for Controlling Diabetes या व्हिडीओत पाहता येतील आणि यामुळे योगाभ्यास मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. या व्हिडीओची लिंक लेखाअंती दिली आहे.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन
मधुमेह नियंत्रणासाठी नियमित योगाभ्यास नक्कीच उपयुक्त आहे.
पुढील लेखात आपण मधुमेह नियंत्रणासाठी आहार – काय खावे? आणि घरगुती उपाय याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत.
या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


