Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आठवण आषाढी वारीची
    अवांतर

    आठवण आषाढी वारीची

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 10, 2026Updated:July 11, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लघुकथा, मी मराठी, अभिजात मराठी, आषाढी एकादशी, पंढरीची वारी, पंढरपूरची वारी, आषाढीची वारी, आषाढी एकादशीची वारी, वारकऱ्यांची तल्लीनत, वारकऱ्यांची भक्ती, विठ्ठल दर्शनाची आस, पंढरीच्या कळसाचे दर्शन, ज्ञानोबा तुकाराम गजर, वारीचा अनुभव, नीता चंद्रकांत कुलकर्णी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    श्रीयुत जनार्दन महाराजांच्या दिंडीबरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली. त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या. त्यांनी सांगितले, “वारीमुळे आळंदीपासूनचा पाच-सहा किलोमीटरचा रस्ता वाहनांसाठी बंद असतो. त्यामुळे आपल्याला  बऱ्यापैकी चालावे लागणार आहे. म्हणून आपण लवकर निघू. तुम्ही बरोबर पहाटे पाच वाजता सारसबागेच्या दारात या.”

    आदल्या दिवशीच मी बहिणीकडे रहायला गेले. बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दीनानाथ हॉस्पिटलमधून घरी आला होता. त्याला इमर्जन्सी आली म्हणून जावं लागलं होतं. तेव्हा, तिच्या सुनेने डॉक्टर दिप्तीने आम्हाला सोडायचे ठरले. पहाटे साडेचार  वाजता आम्ही गाडीने निघालो. थोडा पाऊस पडून गेला होता. रस्त्यावर नीरव शांतता होती. रस्ता एकदम सुनसान होता…

    सारसबागेजवळ तिने आम्हाला सोडले. परत जाताना दिप्ती एकटी कशी जाईल, याची मला चिंता वाटली. पण बहीण अत्यंत विश्वासाने म्हणाली, “अगं, पंढरीराया तिला नेईल सुखरूप घरी, काळजी नको करूस!”

    अरे खरचं की… एकदा का त्याच्यावर सोपवलं की, मग सगळं सोपंच होतं… मन निर्धास्त झालं.

    तिथे ट्रक उभा होता. स्टुल ठेवले होते. त्यावरून ट्रकमध्ये चढलो. पहिल्यांदाच ट्रकमध्ये  बसलो होतो. त्याची गंमत वाटत होती. सगळ्याजणी खूप खूश होत्या. हसत होत्या…

    ट्रक निघाला.. शैलाताईंनी –

    पाऊले चालती पंढरीची वाट

    सुखी संसाराची सोडूनीया गाठ…

    म्हणायला सुरुवात केली.. आम्ही पण त्यात सूर मिसळला. विठुरायाची गाणी  म्हणत आनंदाची वारी सुरू झाली.

    ट्रकने आळंदीच्या अलीकडे सोडले. अनेक जण पायी चालत होते. आम्ही पण चालायला लागलो. पुढे जाता जाता एकदम ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा सजवलेला रथ लांबूनच दिसला. अलोट गर्दी होती. जागेवर उभं राहून दर्शन घेतलं. शैलाताई म्हणाल्या, “गर्दी कमी झाली की, आपल्याला दर्शन मिळेल तेव्हा आपण घेऊ.”

    हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    नंतर खरंच पुढे गेल्यावर आमचे शांतपणे छान दर्शन झाले… अन् आमची दिंडी वारीत सामील झाली.

    अभंग, ओव्या, आरत्या म्हणत, टाळ वाजवत अत्यंत आनंदात मार्गक्रमण सुरू होते. कधी पाऊस, वारा, ऊन चालूच होते… त्याचाही आनंद वाटत होता… मधेच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून नाश्ता झाला. नंतर मात्र भराभर चालायला सुरुवात झाली… दीड वाजता जेवणासाठी थोडा वेळ थांबलो. थोडसंच खाऊन घेतलं आणि पुढे निघालो.

    आम्ही सगळे पासष्ठ, सत्तरच्या पुढच्या वयाचे होतो. पहाटेच उठलो होतो… तीन वाजल्यानंतर  चालण्याचा वेग थोडा मंदावला. प्रथमच इतकं पायी चालत होतो. काही वेळाने पुढच्या आणि  आमच्या दिंडीत अंतर पडले. आम्हाला ते समजत होते. पण पाय आता दमले होते. सगळ्यांच्या मनात उत्साह होता, पण शरीर साथ देत नव्हते.

    शैलाताई समोर येऊन म्हणाल्या,

    “आता आपल्याला देवाचा धावा करायचा आहे…”

    धावा?… आम्हाला काहीच कळेना. मग त्यांनी नीट समजावून सांगितले. दिंडीचे दोन भाग केले. मधे जागा थोडी मोकळी ठेवली. चालत चालत एका गटाने म्हणायचे, “आमचा विठोबा” दुसऱ्या गटानी म्हणायचे, “आमची रखुमाई”…

    मग काय! झाली की धमाल सुरू…

    आधी खालच्या आवाजात म्हणत होतो. नंतर आवाज चढवत चढवत वर नेला. ते म्हणत असताना आम्हाला खूप मज्जा वाटत होती. अचानक एका क्षणी शैलाताई म्हणाल्या,

    “धावा!”

    शैलाताईंनी पळायला सुरुवात केली. त्यांच्यामागे आम्ही सर्वजण असलेल्या सर्व शक्तीनिशी पळायला लागलो. त्या आवाजाचा, जल्लोषाचा, वातावरणाचा, भक्तीचा असा काही परिणाम झाला होता की, कित्येक वर्षांत न पळालेलो आम्ही धावत सुटलो…

    पुढची दिंडी गाठली आणि ऊंच आवाजात…

    “पुंडलिक वरदा हारी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय”

    …जयजयकार करीत वारीत सामील झालो. अपार आनंद झाला. थकलेल्या दमलेल्या मनाला उभारी आली. परमेश्वराची मनापासून आळवणी केली आणि त्याचा धावा केला की, तो जवळ येतोच… याची प्रचिती आली.

    विठोबाही आमचाच आणि रखुमाई पण आमचीच! संकट आलं की, तोच एकमेव तारणहार आहे, हे मनाला समजते आणि मग अंतरात्म्यातून अत्यंत प्रांजळपणे आपण त्याचा धावा करतो… त्या क्षणी तो धावा निर्मळ मनाने केलेला असतो आणि तो त्याच्यापर्यंत पोहोचतो….

    आज हे सगळे आठवले…

    मग लक्षात आले की, प्रत्यक्ष जीवनातही कधीतरी हे घडते. आपण रेंगाळतो, थोडे बेसावध होतो, थकतो आणि मग मागे पडतो… जीवनाला संथपणा, कंटाळवाणेपणा येतो. आपल्या अंगात शक्ती असते, पण काय आणि कसं करायचं, हे सुचत नसते…

    “आमचा विठोबा आणि आमची रुखुमाई”

    हे साधे शब्द नव्हते… ते म्हणताना ताईंनी आधी आमच्या मनातले चैतन्य जागवले होते. आम्हाला प्रोत्साहित करून चेतवले होते, हे आत्ता लक्षात येते. प्रेरणा देणारं असं कोणीतरी समोर येतं, आपल्याला शिकवतं, सांगतं, शहाणं करतं… कधीतरी ते आपलं अंतर्मन सुद्धा असतं! मात्र प्रयत्न आपल्याला सर्व शक्ती पणाला लावून करावे लागतात. मग ती गोष्ट साध्य होते… हवे ते ध्येय गाठता येते.

    आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची आस मनापासून हवी. यासाठी, मानस मात्र श्रेयस असावे… त्यात पाऊले ‘पांडुरंगाच्या” वाटेने चालत असतील तर, मार्गक्रमण अजून सोपे होते.

    हेही वाचा – विठ्ठल दर्शनाची आस, वारी आणि मी

    वारकऱ्यांसारखं का? तर ती वाट दिसते तितकी सोपी नाही… अखंड चालावं लागतं. तिथे तुमच्या क्षमतेची कसोटी लागते… घरातलं सुखासीन आयुष्य सोडून इतके दिवस बाहेर रहायचं सोपं नसतं… तिथे सोयी नसतात. मनात आलं तरी थांबता येत नाही… प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते.

    वारीत आपल्या आसपास असलेल्या लोकांना नुसतं बघायचं… वृद्ध पुरुष, म्हाताऱ्या बायका आनंदाने हसत खेळत चाललेल्या असतात. डोक्यावर तुळशी वृंदावन, गाठोडं नाहीतर पिशवी, काखेत कळशी, खांद्याला शबनम याचे कशाचे त्यांना भान नसते… अधीरपणे वारकरी पुढे पुढे पळत असतात. मुखाने विठ्ठल रखुमाईचं नाव घेऊन धावा चाललेला असतो… आणि शरीराच्या आधी मनाने तो त्याच्याजवळ पोहोचलेलाच असतो.

    असा त्रिगुणी संगम होऊन धावा चालू असतो. कशासाठी तर, पांडुरंगाला भेटण्यासाठी! अर्थात, आपला पांडुरंग कोणता, हे ज्याने त्याने मनाशी ठरवायचे… आणि वारकऱ्यांसारखे त्या मार्गाने धावत निघायचे….

    मग तो भेटतोच…

    आपला पांडुरंग!

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026 अवांतर

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026 अवांतर

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    By तृप्ती देवAugust 20, 2026

    हाजमोलाची ती टीव्हीवरील जुनी जाहिरात आठवली की, आजही चेहऱ्यावर नकळत हसू फुलतं. रात्रीच्या अंधारात हॉस्टेलच्या…

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    स्वत:ला सांभाळूया…

    August 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 408
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 549
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 876
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.