Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…

    July 9, 2026

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    July 9, 2026

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…
    ललित

    उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलJuly 9, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, बाळाचं बारसं, बाळाचं नाव अनंत, हे बंध रेशमाचे, बाळाच्या आईची नोकरी, नोकरीवर जाणारी माता, मातेला बाळाच्या संगोपनाची चिंता, उमाचा सासुरवास, घर आणि नोकरीची कसरत, नववधू उमाचा अनुभव, उमाचा चहाचा अनुभव
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 3

    बाळाच्या बारशाच्या दिवशी आणखी दीड महिन्याने बाळाला घरात ठेवून आपल्याला नोकरीवर रुजू व्हावे लागेल, यामुळे उमा भावनावश झाली होती… बाहेर जेवायला बसल्याने बायकांचा कलकलाट पूर्ण थांबला होता, कारण आता हाताची आणि तोंडाची लढाई सुरू होती. तेवढ्यात पारूबाई ताट वाढून आत घेऊन आली. तिच्या पुढ्यात ताट ठेवत म्हणाली,

    “जिऊन घे. जेवणाची येळ चुकली तर पोराचं पोट दुखंल.” उमाच्या मांडीवरून तिने बाळाला उचलले आणि ती त्याच्याशी बोबड्या बोलीत बोलू लागली. उमाने ताट पुढ्यात घेतले आणि जेवायला सुरुवात केली. बाळ अंगावर पित असल्याने तिलाही भूक लागली होती. तिचे जेवण झाल्यावर सासूने बाळाला तिच्याकडे दिले, मग ती जेवायला बाहेर गेली.

    सासूचे ‘काळजी घेणे’ पाहून ती सुखावत होती, पण कधीकधी तिच्या मनात येई, ही काळजी घेणे बाळामुळे आहे. त्यांच्या घराण्याचा वंशज आहे तो. तो सुदृढ, निरोगी व्हावा यासाठी आपली काळजी घेतात. ती स्वतःच्या मनाला समजावत असे, कशी का होईना काळजी घेतात ना? माणसाचे मनच माणसाचा पहिला शत्रू असते!

    बाळ झोपले म्हणून तिने त्याला पाळण्यात ठेवले आणि ती बाहेर अंगणात आली. जेवणाची मोठी पातेली घासायची  म्हणून ती पुढे सरसावली, तशी पारूबाई तिच्यावर वसकन ओरडली.

    हेही वाचा – बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    “आत हो पयली. गारठ्याचं पाण्यात हात घालणार हाईस व्हय? अजून ह्या तुला गार पान्यात हात घालू दिला न्हाय. लेकराला बरसान झालं तर? मी बगते भांड्यांकडं. तू जा आत झाडू मार जा.”  ती मुकाट्याने घरात शिरली.

    रात्री महेशराव काही लवकर घरात आले नाहीत. ती बाळाला घेऊन आपल्या बाळंतीणीच्या खोलीत झोपायला गेली. सगळे आवरल्यावर पारूबाई खोलीत आली. तिने पारूबाईचे अंथरुण टाकले होते, त्यावर बसली. दमून गेलेल्या आपल्या सासूकडे पाहत ती म्हणाली,

    “आता मला गार पाण्यात हात घालू द्या की आत्या. सव्वा महिना झाला की बाळाला. तुमची एकटीची किती तारांबळ होते.”

    “लै शानी हायस की. गप बस. मी सांगितल्याबिगर अजाबात गार पान्यात हात घालायचा न्हाय. पोरगं आजारी पडलं तर, लेन्याचं देनं हुईल. काय नको, माझं मी करती समदं. तू लेकराला जप म्हंजी बास.”

    सासूचे हे बोलणे ऐकून आता काय बोलायचे म्हणून ती गप्प बसली.

    सासूने हात जोडून डोळे मिटले आणि भगवंताचे नाव घेऊन जमिनीवर पाठ टेकली.

    दमल्यामुळे पाच मिनिटांत पारूबाईची झोप लागली. उमा मात्र छताच्या तुळईकडे पहात विचार करत होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस तिला आठवले. नवी नवरी असताना बावचळून तिच्या हातून चुका घडायच्या. कधी कधी काय करावे हे तिला कळायचे नाही. अशावेळी पारूबाई तिच्यावर रागवायची. त्यामुळे ती अधिकच बावचळून जायची.  सकाळी लवकर उठून ती सगळ्यांचा स्वयंपाक बनवायची. महेशराव आणि ती दोघेही गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. तिला लग्नानंतर लगेच नोकरी लागली होती.

    हेही वाचा – नोकरी करणाऱ्या मातेची बाळासाठी तगमग

    नोकरी करते म्हणून तिला घरकामात कसलीही सवलत नव्हती. घरातील सगळी कामे आटपून, मग तिने नोकरीला जायचे असा पारूबाईचा दंडक होता. सकाळची तिची कितीही तारांबळ उडाली, तरी पारूबाई एकाही कामाला हात लावत नसे. तळहातावर मिसरी घेऊन मधल्या बोटाने ती बार भरल्यासारखी हिरड्यांच्या कडेला भरत असे आणि ती कामे कशी करतेय, याकडे बारकाईने पाहात बसे‌. चूक दिसली रे दिसली की, तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होई.

    “व्हय गं, अक्कल कुठं गहान ठेवलीया का? ती पावट्याच्या शेंगाची टरफालं म्हशीच्या गव्हानीत टाकायची सोडून कचऱ्यात टाकलीस व्हय? काड ती पयली, आन् टाकून यं म्हशी म्होरं.”

    ती मुकाट्याने सासू जे सांगेल तसे करत असे.

    “व्हय गं, च्यात साकार का मन घातली न्हाय?”

    “घातली आहे की आत्या.”

    “एवढा आळणीपुचुक च्या प्यायची सवं न्हाय मला. साकार हाय ना घरात? तुज्या बापाकडनं तर आनाय लावली न्हाय ना? न्हे ह्यो च्या माघारी. साकार घालून गरम कर, मग आन.”

    हे ऐकून ती खाली मान घालून चहा घेऊन गेली आणि त्यात पुन्हा साखर घालून गरम करून आणून दिला. तेव्हापासून ती रोज असाच गोड चहा बनवू लागली. हळूहळू तिलाही असाच काकवीसारखा चहा प्यायची सवय लागली.

    क्रमशः
    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    July 9, 2026 ललित

    चांगली बोहनी…

    July 9, 2026 ललित

    पावसाळा

    July 8, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    By Team AvaantarJuly 9, 2026

    पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 5 पार्थ आणि गरिमा एकाच दिवशी अग्रवाल कंपनीत जॉइन झाले.…

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    दृष्टिकोन…

    July 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…

    July 9, 2026

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    July 9, 2026

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 354
    • अवांतर 194
    • आरोग्य 128
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 482
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 232
    • मैत्रीण 24
    • ललित 769
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…

    July 9, 2026

    पार्थच्या खोटं बोलण्यानं गरिमाही अडचणीत…

    July 9, 2026

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.