दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 05 जुलै 2025, वार : शनिवार
भारतीय सौर : 14 आषाढ शके 1947, तिथि : दशमी 18:58, नक्षत्र : स्वाती 19:50
योग : सिद्ध 20:34, करण : वणिज अहोरात्र
सूर्य : मिथुन, चंद्र : तुला, सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा. जवळच्या लोकांनाच तुम्ही पुढे जावे, तुमची प्रगती व्हावी, असे वाटत असावे, त्यामुळे सावध रहा. आपले काम प्रामाणिकपणे करा. कामाच्या ठिकाणी मतभेद निर्माण होतील. पण आर्थिक बाबी मार्गी लागतील.
वृषभ – वागणुकीने लोकांना आकर्षित कराल. व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. स्वतःकडे गांभीर्याने लक्ष द्या. जोडीदाराप्रती असलेली जबाबदारी समजून घ्या.
मिथुन – वेळ अनुकूल आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. पण दिवसभर एकटेपणा जाणवेल. त्यामुळे मानसिकरित्या अस्वस्थ वाटेल. कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंददायी राहील.
कर्क – नोकरीच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत असाल तर, सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून एखादे प्रोजेक्ट केले असेल तरी विद्यार्थ्यांचे कौतुक होईल. दातांशी निगडीत विकार होण्याची शक्यता आहे.
सिंह – राजकारणाशी संबंधित जातकांना वेळ अनुकूल आहे. कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील. आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या.
कन्या – उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. नशीबाची उत्तम साथ आहे. कामात यशाची कमान चढती असेल. त्यामुळे नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही कर्मचारी विरोध करू शकतात. घरगुती खर्चात वाढ होऊ शकते.
हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे
तुळ – कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी निगडीत समस्या निर्माण होतील. पोटाशी संबंधित विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आराम करण्याची गरज आहे. जोडीदाराकडून नकळत अवमान होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो.
वृश्चिक – शारीरिक शक्ती वाढेल. कामाची पद्धत बदलल्याने फायदा होईल. नातेवाईकांचे घरी आगमन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील.
धनु – स्वतःच्या मनाचे नीट ऐका. प्रामाणिकपणे काम करत असाल तर, यशस्वी व्हाल. लोक तुमच्या सरळपणाचा फायदा घेतील, त्यामुळे सावधगिरी बाळगा. व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नवीन घर खरेदीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतील.
मकर – व्यवसायात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. भूतकाळाबद्दल विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रियजनांच्या सहवासामुळे मनःशांती मिळेल, काही नातलगांशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्तरावर लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ – धार्मिक यात्रेचे नियोजन केले जाईल. विवाह प्रस्तावांमुळे मित्रत्वाचे संबंध नात्यात बदलू शकतात. इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. भावनिक संबंधांमध्ये जवळीक राहील. लोकांकडून प्रशंसा मिळेल.
मीन – वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. परदेशात जाण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या आड येणारे अडथळे कायम राहतील. त्यासाठी वेळोवेळी मोठ्यांचे मार्गदर्शन घ्या. योग्य वेळेची वाट बघा आणि त्यानुसार आपले काम करत रहा.
दिनविशेष
रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर
हजाराच्या वर रहस्यकथा लिहिणारे, झुंजार, मेजर सुदर्शन, दर्यासारंग, धनंजय-छोटू, इन्स्पेक्टर दिलीप ही पात्रे मराठी कथा विश्वात अजरामर करणारे प्रख्यात रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचा आज स्मृतीदिन. चंद्रकांत सखाराम चव्हाण हे त्यांचे कागदोपत्री नोंद असलेले नाव. मात्र लहानपणापासून ‘बाबू’ या नावाने त्यांना हाक मारली जात असे. याशिवाय विरार जवळच्या अर्नाळ्याचे राहणारे म्हणूनच त्यांनी ‘बाबूराव अर्नाळकर’ या टोपणनावाने कथालेखनाला सुरूवात केली. नाथ माधव यांनी रहस्यकथा लिहा, असा दिलेला सल्ला अर्नाळकर यांनी शेवटपर्यंत मानला. 1942 साली येरवड्याच्या तुरुंगात असताना एडगर वॅलेस यांची ‘थ्री जस्ट मेन’ ही कथा अर्नाळकरांनी वाचली आणि आपल्याला कशा प्रकारचे लेखन करायचे आहे, याचा मार्ग सापडला. अर्नाळकर यांच्या अनेक कथांचे बीज हे इंग्रजी कथांमध्ये दडलेले होते. मात्र, त्याला अस्सल मराठी साज चढवून ती कथा वाचकांसमोर आणली जात होती. रहस्यकथा असूनही वाचकांना कुठेही अश्लीलपणा जाणवणार नाही, याची काळजी त्यांनी कायम घेतली. अशा या रहस्यकथा लेखकाचे 5 जुलै 1996 रोजी निधन झाले.
हेही वाचा – देशविदेशातील शक्तिपीठे