Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गेटवर जी धडकली ‘ती’ पार्थच्या समोर होती…
    ललित

    गेटवर जी धडकली ‘ती’ पार्थच्या समोर होती…

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 2, 2026Updated:July 9, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, शार्वीची नवी पीए, पीए गरिमा पांडे, पार्थ आणि गरिमा पांडे, अग्रवाल इंडस्ट्रितील लव्हस्टोरी, गरिमा पार्थ प्रेमकथा, पार्थ गरिमा लव्हस्टोरी, शार्वीची पार्थवर नाराजी, शार्वीचा नवा प्रोजेक्ट
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पल्लवी खरोसे आंबेकर

    भाग – 4

    पार्थ बाइक पार्क करून जातच होता की, एका मुलीला धडकला… क्षणभर तो तिच्याकडे पाहातच राहिला… ‘ओह गॉड, एवढं सुंदर कोणी असू शकत का?’ असा प्रश्न त्याला तिला पाहिल्यावर पडला. पण ती तशीच निघून गेली… हा मात्र तिलाच बघत होता… कोणाच्या तरी गाडीचा हॉर्न ऐकायला आला, तेव्हा कुठे तो भानावर आला. ती मुलगी तर केव्हाच निघून गेली होती. त्याने त्याच्या केसातून हात फिरवला आणि तोही आत निघून गेला…

    त्याला नवीन बॉससोबत एकाच प्रोजेक्टवर काम करायच होतं, त्यामुळे त्याचा डेस्क तिच्या केबिनजवळच लावला होता..

    तो येऊन बसलाच होता की, त्याची बॉस, हिलच्या टक टक आवाजाने आपलं अस्तित्व दाखवत बड्या दिमाखात ऑफिसमध्ये एंटर झाली… सगळेच उठून तिला अदबीने ग्रीट करत होते… ती तशीच चालत तिच्या केबिनजवळ पोहचली… तिची नजर बाहेरच्या डेस्ककडे वळली. ‘हं… मघाशी होता तोच मुलगा आहे, जो त्या मुलीकडे भान हरपून आणि वळून वळून बघत होता. कसली लोक या ऑफिसमध्ये कामाला घेतली आहेत, काय माहिती… ज्यांचं कामावर कमी आणि इतर गोष्टीवर जास्त लक्ष आहे! नो वरिज मी आली आहे, आता सगळे कसे लायनीवर येतील… तिने त्याच्याकडे बघून सुस्कारा सोडला. तिने आपलं केस बड्या ॲटिट्युडने हाताने उडवले आणि केबिनमध्ये निघून गेली.

    तिने केबिनमध्ये येऊन एक फोन केला आणि फाइल चेक करत बसली… तोच केबिनच्या दरवाज्यावर टकटक झाली… तिने परमिशन देताच मिस्टर राजपाल आत आले.

    “मॅम, मला बोलावलंत काही काम होतं का..?” त्यांनी मोठ्या अदबीन तिला विचारलं.

    “ओह कमॉन अंकल तुम्ही मला शार्वीच म्हणा! हे मॅम वगैरे असल्या फॉरमॅलिटिज माझ्यासोबत नका करू,” ती त्यांच्याकडे रोखून बघत म्हणाली.

    तसं ते हसले. त्यांना माहिती होतं की, ती किती हट्टी आहे.

    “बरं… ठीक आहे. आता तरी सांगशील माझ्याकडे काय काम होतं ते…” ते चष्मा वर करत म्हणाले.

    “अं… ते काल माझ्यासाठी एक पी. ए. बघायला मी सांगितलं होती. बघितली का?” तिने विचारलं.

    “हो. कालच एका मुलीला सिलेक्ट केलंय. ती आलीय बस थोड्याच वेळात तुम्हाला रिपोर्ट करेल,” मिस्टर राजपाल माहिती पुरवत म्हणाले.

    “ओके. थँक्स अंकल. तिला लवकर पाठवून द्या,” ती स्मित करत म्हणाली.

    “ठीक आहे. मी जातो,” असं म्हणून राजपाल तिची परवानगी घेऊन निघून गेले.

    ते गेले तसं ती परत तिच्या कामात बिझी झाली. थोड्यावेळाने दारावर टकटक झाली आणि तिने परमिशन देताच एक सुंदर, पण सिम्पल कपडे घातलेली मुलगी तिच्या केबिनमध्ये आली.

    शार्वीने तिच्याकडे ‘तू कोण?’ या अविर्भावात पाहिले. तिला तिच्या नजरेतला प्रश्न समजला…

    “मी गरिमा पांडे… तुमची नवीन सेक्रेटरी. आजच जॉइन झाले.”

    हेही वाचा – अग्रवाल कंपनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    “ओके… मिस्टर राजपाल यांनी तुला तुझी सगळी काम समजावलीयत ना?” तिच्यावर नजर स्थिर करत तिने विचारलं.

    “हो.. मॅम त्यांनी सगळं सांगितलं आहे,” गरिमा म्हणाली.

    “ठीक आहे. केबिनच्या एंट्रन्सला तुझी बसायची सोय केली आहे. सो तू आता तुझ्या कामाला लागू शकतेस आणि हो, माझ्यासाठी एक कॉफी पाठवशील…” शार्वी फाइल बघत म्हणाली.

    गरिमा बाहेर आली. तिला डोअरजवळ एक रिकामा डेस्क दिसला, तिने तिचं सगळं सामान नीट लावलं आणि शार्वीसाठी एक कॉफी पाठवून दिली… तिची नजर सहज समोर गेली तर, तिला सकाळचा तिला धडकलेला मुलगा दिसला… ‘ओह, म्हणजे हापण इथेच कामाला आहे तर… अवघड आहे गरिमा तुझं!’ ती त्याच्याकडे पाहून विचार करत होती की, त्याचंही लक्ष तिच्याकडे गेलं. ‘ही इथे आहे की, मला भास होतोय…’ त्याने हळूच स्वतःला एक चिमटा काढला आणि खात्री करून घेतली की, हे सत्यच आहे… तो तिच्याकडेच पाहात होता, ती त्याच्या अशा पाहण्याने अवघडून गेली आणि तिथून निघून गेली.

    ‘काय पार्थ, वेड्यासारखं वागत आहेस, कधी मुलगी न पाहिल्यासारखं! तिला काय वाटेल? असं वागू नकोस, नाहीतर तिचा गैरसमज व्हायचा…’ असं स्वत:ला समजवतानाच, ‘आता ती इथेच कामाला आहे म्हणजे सतत ती नजरेसमोर असणार’ या विचारानेच तो खूश झाला.. त्याने स्वतःला नॉर्मल केलं आणि कामात लक्ष घातलं.

    हेही वाचा – …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    थोड्यावेळाने तीही आली आणि आपल्या जागेवर काम करत बसली. दोघांचे डेस्क एकमेकांसमोर होते, त्यामुळे त्यांची सारखीच नजरानजर होत होती. तिलाही तो आवडला होता बहुतेक, पण यांच्या नजरेचे खेळ कोणीतरी पाहत होतं… आणि यापासून ते दोघेही अनभिज्ञ!

    ती गरिमा पांडे. गोरा रंग, कर्ली केस, गोल चेहरा, लांब नाक, राऊंड शेपमध्ये कोरीव भुवया… ज्या तिच्या चेहऱ्याची शोभा वाढवत होत्या, नाजूक बांधा आणि उंचही. राहायला एकदम साधी आणि सरळ. ती अनाथ होती. एका ॲक्सिडेंटमध्ये तिचे आई-वडील देवा घरी गेले. ती सध्या एका लेडीज हॉस्टेलमध्ये राहात होती. सध्या तिला जॉबची खूप गरज होती आणि योगायोगाने तिलाही इथेच जॉब मिळाला.

    लंच ब्रेक झाला तसं तिने शार्वीला विचारून तिच्यासाठी लंच ऑर्डर केलं आणि ती कॅन्टीनला जेवायला गेली. पार्थही त्याचं आवरून जेवायला गेला.

    जेवण करून आल्यावर त्यांना बरंच काम होत. ते दोघेही त्यांच्या त्यांच्या कामात व्यग्र झाले. ऑफिस टाइम झाला तसं ते घरी निघून गेले… ते दोघे गेले तसं तीही निघून गेली.

    क्रमश:

    त्यांना खरंच काम होत का मुद्दाम दिल होत…? पाहू पुढील भागात…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    अनपेक्षित

    August 24, 2026 ललित

    सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…

    August 24, 2026 ललित

    श्रावणी सोमवारची कहाणी

    August 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अनपेक्षित

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 24, 2026

    “अरे ओंकार, काहीच होऊ शकत नाही का रे आपल्या जाण्याबद्दल? आपण परत विचार करूयात नं?…

    सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…

    August 24, 2026

    श्रावणी सोमवारची कहाणी

    August 24, 2026

    Bookshelf : आनंदाचे बालपण देता येते, स्पष्ट करणारे ‘चीपर बाय द डझन’

    August 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    अनपेक्षित

    August 24, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026

    सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…

    August 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 408
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 549
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 873
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.