Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    June 26, 2026

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 26, 2026Updated:June 26, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 26 जून 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 05 आषाढ शके 1948;  तिथि : द्वादशी 22:21; नक्षत्र : विशाखा 19:15;
    • योग : सिद्ध 11:38 ; करण : बव 09:14;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ 12:32 ; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:19;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीनुसार)

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    भारतीय कादंबरीलेखनाचा पाया घालणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी)

    टीम अवांतर

    भारतीय कादंबरीलेखनाचा पाया घालणारे, पहिले कादंबरीकार, कवी, संपादक, तत्वज्ञ आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या लेखनाने तमाम भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांचा जन्म 26 जून 1838 रोजी कलकत्त्याजवळील नहाटी या गावी झाला. 1858मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले, त्यांत बंकिमचंद्र होते. यानंतर त्यांनी डेप्युटी मॅजिस्ट्रेटची नोकरी स्वीकारली आणि 1891मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत ते विविध हुद्यांवर सरकारी नोकरीतच होते.

    आधुनिक बंगाली साहित्याचे ते प्रवर्तक होते. आधुनिक कादंबरीचे जनक म्हणून देखील ते ओळखले जातात. त्यांचे साहित्यिक जीवन विद्यार्थीदशेतच सुरू झाले आणि जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी कविताही लिहिल्या आहेत. त्यांच्या कविता तसेच काही गद्यलेखनही ‘संवाद प्रभाकर’ या नियतकालिकात प्रसिद्ध होत असे.

    हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    बंकिमचंद्रांनी आपली पहिली कादंबरी रॉयमोहन्स वाइफ इंग्रजीत लिहिली होती. तर, पहिली बंगाली कादंबरी दुर्गेश नंदिनी असून त्यांनी कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर, कृष्णकांतेर विल, आनंदमठ, देवी चौधुराणी, सीताराम इत्यादी कादंबऱ्या आणि कमलाकांतेर दप्तर, विज्ञानरहस्य, लोकरहस्य, साम्य, विविध प्रबंध, कृष्णचरित्र, धर्मतत्त्व यांसारखे प्रबंधग्रंथ लिहून प्रसिद्ध केले. आनंदमठ  या त्यांच्या कादंबरीतील ‘वंदेमातरम्‌’ हे गीत भारताचा मानबिंदू ठरले.

    बंकिमचंद्र यांच्या बहुतेक कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या आहेत. वा. गो. आपटे यांनी त्यांच्या सर्व कादंबऱ्या संपूर्ण बंकिमचंद्र (तीन भाग) नावाने मराठीत अनुवादित केल्या. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. बंकिमचंद्रांनी बंगाली गद्याला नवे वळण तर लावलेच, पण त्याला मोठे सामर्थ्यही प्राप्त करून दिले. बंगाली साहित्यात विनोदही प्रथम बंकिमचंद्रांनीच आणला.

    बंकिमचंद्रांनी 1872 साली सुरू केलेले वंगदर्शन  हे नियतकालिक बंगाली साहित्यात युगप्रवर्तक ठरले. सुशिक्षितांमध्ये स्वातंत्र्यप्रेम आणि राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूनेच बंकिमचंद्रांनी वंगदर्शन  सुरू केले होते. वंगदर्शनमध्ये त्याकाळातील प्रतिष्ठित आणि प्रख्यात साहित्यिक लिहीत तसेच वंगदर्शनने अनेक नवे लेखकही तयार केले. बंकिमचंद्रांनी रवींद्रनाथांना साहित्यसाधनेत प्रोत्साहन दिले होते. 8 एप्रिल 1894 रोजी या महान साहित्यिकाचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. भागीदारीतील कामामुळे फायदा होईल, मात्र मोठी व्यावसायिक गुंतवणूक करायची असेल तर दिवसाच्या पूर्वार्धात करा. पोट किंवा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बोलताना संयम ठेवा, शांत रहा, वाद टाळा.

    वृषभ – थोडासा आव्हानात्मक असा आजचा दिवस असेल.  कामाचा दबाव वाढेल. व्यावसायिक प्रतिस्पर्धकांपासून सावध रहा, कोणताही मोठा धोका पत्करणे टाळा. स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक रहा. सात्विक खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. कामाबाबत अत्यंत दक्ष रहा आणि संयम बाळगा. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या.

    मिथुन – सर्जनशीलतेने भरलेला दिवस असेल. करिअरमध्ये तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक होईल.  गुंतागुंतीची कामे सहजतेने हाताळाल. व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील, ज्यामुळे भविष्यातील नफ्याचे मार्ग खुले होतील. आरोग्य उत्तम राहील, मात्र संध्याकाळनंतर आहाराची विशेष काळजी घ्या. काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखू शकता. आत्मविश्वासाने पुढे जा; तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    कर्क – आजचा दिवस काहीसा व्यस्त ठरेल. संध्याकाळनंतरचा काळ तुमच्या करिअरसाठी चांगला असेल. व्यवसायातील आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. अनावश्यक धावपळ टाळा आणि आपली ऊर्जा योग्य कामात लावा. संयमाने, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    सिंह – दिवस खूप चांगला असेल. करिअरमध्ये तुमच्या धैर्याचे आणि शौर्याचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संपर्क प्रस्थापित होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्य उत्तम राहील आणि तुम्हाला खूप उत्साही वाटेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

    कन्या – दिवस संमिश्र असेल. आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगा आणि विचारपूर्वक खर्च करा. व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी शांतपणे विचार करा.  आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्या बजेटचा आणि एकूण गुंतवणुकीचा आढावा घ्या. कोणत्याही कामात घाई टाळा. संयम राखणे फायदेशीर ठरेल. आत्मविश्वासाने काम करा.

    तुळ – आज तुमची कार्यक्षमता वाढेल. तुमच्या मेहनतीने यशाची नवी पायरी गाठाल. नवीन व्यावसायिक करार यशस्वी होतील आणि भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्याबाबत घेतलेली काळजीमुळे आजारातून लवकर बरे व्हाल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि तुमच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर फायदा घ्या. प्रगतीचा मार्ग आपोआप मोकळा होईल.

    वृश्चिक – नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. शिवाय, काही अनावश्यक खर्चांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात सावधगिरी बाळगा आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे टाळा. कामात अनावश्यक घाई करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका आणि पुरेशी विश्रांती घ्या. ध्यान आणि योगामुळे तुमच्या मनाला शांती आणि शक्ती मिळेल.

    हेही वाचा – बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    धनु – आजचा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर असेल, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि  तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप आनंदी असाल.  जे काही काम हाती घ्याल, ते यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे.

    मकर – आजचा दिवस प्रगतीचा असेल. करिअरमध्ये एक नवीन आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमची पत आणि प्रतिष्ठा वाढेल. नवीन व्यावसायिक योजना यशस्वी होतील, व्यावसायिक सौद्यांमधून मोठा नफा मिळेल.  कामाच्या ठिकाणी एक कुशल रणनीतिकार म्हणून तुमची ओळख निर्माण होईल. आत्मविश्वासाने कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा; विजय निश्चित आहे. आरोग्याच्या दृष्टीने, दिवस चांगला असून उर्जेची पातळी उच्च राहील.

    कुंभ – आज प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. थांबलेल्या कामाला गती मिळेल. एखाद्या मोठा व्यावसायिक कराराला अंतिम रूप मिळू शकते, जो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. आरोग्य चांगले राहील, सकारात्मकता टिकून राहील.

    मीन – दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांबाबत सावधगिरी बाळगा. अनावश्यक संभाषणांवर वेळ वाया घालवणे टाळा. व्यवसायातील कोणतीही मोठी गुंतवणूक तूर्तास पुढे ढकलणे उत्तम राहील. केवळ शांत राहूनच तुम्ही अडचणींवर मात करू शकाल. त्यामुळे संयम बाळगा, वादांपासून दूर राहणे उत्तम राहील. पोटाच्या किंवा पचनाच्या समस्यांबाबत जागरूक रहा, हलके जेवण घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    By Team AvaantarJune 25, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 04…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    June 26, 2026

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026

    फक्त आपण… आणि आपला शोध!

    June 25, 2026

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 339
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 467
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 735
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    June 26, 2026

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026

    बारशामध्ये आत्याला मान आणि आई?

    June 25, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.