Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …अन् दादांच्या शेवटच्या इच्छेनुसार पुत्रप्रेमाचा ‘अरुणोदय’ झाला!

    June 15, 2026

    Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे

    June 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …म्हणून आजच मनासारखं जगावं!
    ललित

    …म्हणून आजच मनासारखं जगावं!

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेJune 11, 2026Updated:June 12, 20263 Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, बालपण देगा देवा, भूतकाळाची ओढ, भूतकाळ हा सुवर्णकाळ, भूतकाळात रमणे, वर्तमानात जगण्याचा आनंद, वर्तमानात जगणे महत्त्वाचे, वर्तमान म्हणजे प्रवाह, वाहून गेलेल्या प्रवाहाचा मोह, मनासारखं जगणं
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज ताटात गरमागरम पोळी वाढून घेताना मला अचानक आईच्या ताटाची आठवण आली. ती संध्याकाळी सकाळची पोळी घ्यायची आणि सकाळी आदल्या रात्रीची. अगदी रोजच नाही, पण बऱ्याचदा हे असंच व्हायचं.

    बरं, सासूबाईंचंही तसंच. एकदा सकाळच्या जेवणाच्या वेळी मी त्यांना विचारलंच, “काय लॉजिक आहे हे? ताटात कालची शिळी पोळी घेतली आहे. त्यामुळे या ताज्या पोळ्यांमधून तुमची जी उरणार आहे, तीच तुम्ही रात्री खाणार. त्यापेक्षा ती आत्ताच घ्या ना — गरम, मऊ आणि ताजी!”

    मी त्यांना माझं ‘शिळी-ताजी, ताजी-शिळी’ हे संपूर्ण चक्र अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. पण त्याचा कधीच काही उपयोग झाला नाही. अर्थात, या सगळ्यात काटकसर, अन्नाची नासाडी किंवा घर चालवण्याचं शहाणपण या गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी एक गमतीदार विचार माझ्या मनात आला…

    हेही वाचा – स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    जीवनही आपल्याला रोज एक ताजी पोळी देत असतं; पण आपण मात्र कालच्या शिळ्या गोष्टींमध्येच रमून जातो. बघा ना, आपला वर्तमान जेव्हा भूतकाळ होतो, तेव्हा तो आपल्याला अधिक सुंदर वाटू लागतो. आपण आज सहज म्हणतो, “अरे, बालपण किती सुंदर होतं! तो तर एक सुवर्णकाळ होता.” पण खरंच, तेव्हा आपल्याला तसं वाटायचं का? उलट लवकर मोठं व्हायचं असायचं, काहीतरी नवीन करायचं असायचं… आणि गंमत म्हणजे, आजपासून वीस वर्षांनी आपण कदाचित आजच्या दिवसांबद्दलही असंच म्हणणार आहोत — “काय मस्त दिवस होते ते!” पण सध्या हे दिवस जगताना ते आपल्याला तेवढे सुंदर वाटत नाहीत.

    आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मागचा टप्पा अधिक सुंदर वाटत राहतो. असं का होत असेल? कदाचित स्मृती, काळानुसार दुःखाचे कोपरे गुळगुळीत करत असाव्यात आणि आनंदाचे रंग अधिक गडद. त्यामुळे भूतकाळ हा वास्तवापेक्षा थोडा अधिक सुंदर दिसू लागतो.

    पण पुन्हा प्रश्न तोच…

    जर भूतकाळ इतका सुंदर होता, तर तो जगताना आपल्याला तसं का वाटलं नाही?

    किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर—

    उद्या ज्या दिवसांना आपण आपल्या आयुष्यातला सुवर्णकाळ म्हणणार आहोत, ते दिवस आपण आज जगत आहोत… आणि त्याची आपल्याला जराही कल्पना नाही!

    कदाचित, म्हणूनच आयुष्याची खरी गंमत आपल्याला नंतर समजते. आपण ज्या क्षणाची वाट पाहत असतो, त्याच क्षणातून नकळत पुढे निघून जात असतो. मोठं होण्याची घाई करताना बालपण मागे राहतं, स्थिर होण्याच्या धावपळीत तारुण्य हातातून निसटतं आणि एक दिवस मागे वळून पाहताना लक्षात येतं की, ज्याला आपण साधासुधा वर्तमान समजत होतो, तोच आपल्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ होता.

    वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही. ती नदीसारखी असते. वाहून गेलेल्या पाण्याला स्मृतींची झळाळी लाभते म्हणून ते अधिक सुंदर दिसू लागतं. पण वाहून गेलेल्या प्रवाहाच्या मोहात हरवून जाण्यापेक्षा, आपल्या समोरून वाहणाऱ्या प्रवाहात मनसोक्त भिजून घ्यावं, मनासारखं जगून घ्यावं…


    किती वेगाने

    मला एकाच ठिकाणी घुटमळण्याची सवय

    आणि किती वेगाने पुढे निघून जातंय वय

    घरासमोर डबक्यात सोडलेली होडी

    सावरलेल्या अंगणात काढलेली रांगोळी

    पुस्तकातलं मोरपिस अन् पिंपळाचं पान

    मोगऱ्याच्या सुवासाने हरवलेलं भान

    कट्टी बट्टीच्या मैत्रिणींची खूप येते सयं

    आणि किती वेगाने पुढे निघून जातंय वय

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    …अन् दादांच्या शेवटच्या इच्छेनुसार पुत्रप्रेमाचा ‘अरुणोदय’ झाला!

    June 15, 2026 ललित

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026 ललित

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026 ललित

    3 Comments

    1. Aadinath on June 11, 2026 10:44 pm

      Wow aai!! Very well said….😊🫡

      Reply
    2. Shital More on June 11, 2026 10:48 pm

      Unbelievable thought
      Great👍

      Reply
    3. Ajay Sarjoshi on June 12, 2026 10:41 am

      खूप आवडले तुमचे लिखाण रेवती ज़ी कारण मना सारख जगणं च मनुष्यला जिवंत पणा देऊन जात
      तुमचे म्हणणे पटतेय वाहुन गेलेल्या प्रवाहत (भूतकाळात) अडकून राहण्या पेक्षा वर्तमान प्रवाहत स्वतःला झोकून देऊन आज चा आनंद घेण्यात खरे सुख आहे.

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    …अन् दादांच्या शेवटच्या इच्छेनुसार पुत्रप्रेमाचा ‘अरुणोदय’ झाला!

    By सतीश बर्वेJune 15, 2026

    भाग – 2 मी दादांच्या कपाळावर हात ठेवून थोपटत असताना दादांनी महत्प्रयासाने डोळे उघडले… तेव्हा…

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026

    मंजिरी

    June 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …अन् दादांच्या शेवटच्या इच्छेनुसार पुत्रप्रेमाचा ‘अरुणोदय’ झाला!

    June 15, 2026

    Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे

    June 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    सुदाम्याची मित्रप्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 329
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 455
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 223
    • मैत्रीण 20
    • ललित 704
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …अन् दादांच्या शेवटच्या इच्छेनुसार पुत्रप्रेमाचा ‘अरुणोदय’ झाला!

    June 15, 2026

    Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे

    June 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.