Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    June 11, 2026

    …म्हणून मनासारखं जगावं!

    June 11, 2026

    मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा

    June 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा
    ललित

    मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरJune 11, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, लघुकथा, मित्रांच्या संपर्कात रहा, मैत्रिणींच्या संपर्कात रहा, मित्र मैत्रिणींशी संपर्क, मित्र मैत्रिणीशी संवाद, संपर्कातून संवाद, संवाद महत्त्वाचा, मित्र-मैत्रिणीशी संवाद, संवाद आणि सुसंवाद
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अलीकडचीच गोष्ट आहे. घरी एकटाच होतो. संध्याकाळचं चहा आणि खाणं झालं होतं. विचार केला आपणच लिहिलेल्या म्हैस पुस्तकामधला एखादा लेख वाचावा. पुस्तक उघडलं आणि समोर लेख आला – ‘मित्र मैत्रिणींच्या संपर्कात रहा’. पहिल्यांदाच लेख वाचतो आहे, असे समजून लेख वाचला आणि मजा आली. लेखांमधल्या आठवणींबद्दल विचार करत होतो आणि तेवढ्यात फोनची रिंग वाजली. सोलापूरहून वाचक मैत्रिण सुनीता यांचा फोन होता.

    मी : नमस्कार, मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा

    सुनीता : तुम्हाला कसं समजलं की, तुमच्याच पुस्तकातला ‘मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा’, हाच लेख मी वाचत होते म्हणून!

    मी : कारण मी पण आत्ताच तोच लेख वाचत होतो आणि का ते माहीत नाही, पण असं उगीचच वाटलं की, कुणीतरी मित्र-मैत्रीणी पण हा लेख आत्ताच वाचत असतील आणि त्यांचा फोन येईल.

    हेही वाचा – फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!

    सुनीता : दोघेजण एकच लेख एकाच वेळी वाचत आहोत, आणि लगेच फोन! वा मस्तच… नक्कीच टेलीपथी असणार. कालच ॲमेझॉनकडून तुमचं म्हैस पुस्तक आलं. आता घरी कोणीच नव्हतं म्हणून विचार केला पुस्तक उघडावं आणि समोर येईल तो लेख आज पूर्ण वाचावा आणि पहिला लेख समोर आला – ‘मित्र मैत्रिणीच्या संपर्कात रहा’. खूपच छान लिहिला आहे. वाचताना मजा आली आणि म्हणून संपर्कात येण्याकरिता लगेच फोन केला. आता रोज एक एक वाचत जाईन. लेखामध्ये लिहिलेली कॉलेजची मैत्रीण वीणा आणि नाशिकची मैत्रीण सुनंदा यांच्याशी गप्पा होतात की नाही आणि त्यांना पुस्तक मिळाले का?

    मी : त्यांना पुस्तक मिळाले आहे आणि त्यांचे फोन पण येत असतात. बऱ्याच मित्रांचे पण फोन येत असतात, पुस्तक मिळाल्याबद्दल. मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहून गप्पा मारणे यामध्ये नेहमीच एक वेगळाच आनंद असतो.

    सुनीता : कारण या गप्पांना कुठला विषय असा नसतोच. कुठून तरी सुरुवात होते आणि कुठे चाललो आहे, कुठे जात आहे,  किती वेळ बोलणे चालू आहे हे समजतच नाही. फक्त हसणे सुरू असते आणि मजा घेणे सुरू असते.

    हेही वाचा – हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    या विषयावरून त्या विषयावर अशा आमच्या गप्पा सुरू होत्या आणि हसणे सुरू होते… आणि –

    मी : तुमच्याकडे कोणीतरी आलेलं दिसतय. कारण डोअर-बेलचा आवाज तुमच्या फोनमधून येत आहे.

    सुनीता : तुमच्याकडे पण कोणीतरी आलेले दिसतंय, कारण डोअर-बेलचा आवाज तुमच्याही फोनमधून येतो आहे.

    दोघेही एकदम : हो हो कुणीतरी आलेले दिसतय. दारावरची बेल वाजते आहे.

    बाय बाय, पुन्हा भेटू, पुन्हा बोलू, पुन्हा गप्पा मारू, मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा… असे म्हणून फोन बंद झाले.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    June 11, 2026 ललित

    …म्हणून मनासारखं जगावं!

    June 11, 2026 ललित

    स्मृतीगंध… गाण्यांच्या भेंड्या!

    June 11, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    By Team AvaantarJune 11, 2026

    पराग दामले कुटुंब एकत्र असेल तर, बऱ्याच गोष्टी खपून जातात… कोणीतरी सावरायला असतंच… किंवा नेमकं…

    …म्हणून मनासारखं जगावं!

    June 11, 2026

    स्मृतीगंध… गाण्यांच्या भेंड्या!

    June 11, 2026

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    June 11, 2026

    …म्हणून मनासारखं जगावं!

    June 11, 2026

    मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा

    June 11, 2026

    Dnyaneshwari : वांचूनि योगाचेनि बळें, अधिक कांहीं मिळे

    June 11, 2026

    स्मृतीगंध… गाण्यांच्या भेंड्या!

    June 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 325
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 450
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 696
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    June 11, 2026

    …म्हणून मनासारखं जगावं!

    June 11, 2026

    मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहा

    June 11, 2026
    Most Popular

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    June 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.