Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 9, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 09 जून 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 19 ज्येष्ठ शके 1948; तिथि : नवमी 26:34; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 09:38;
    • योग : प्रीति 08:17; करण : तैतिल 15:04;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:14;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    संगीतकार वसंत देसाई

    टीम अवांतर

    सुप्रसिद्ध संगीतदिग्दर्शक वसंत देसाई यांचा जन्म 9 जून 1912 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सोनवडे येथे झाला. आजोबांमुळे  लहानपणापासून त्यांच्या मनावर भजनाचे संस्कार झाले. पुढे कोकणातून ते कोल्हापूरला आले आणि प्रभात फिल्म कंपनीत गेले. मूकपटांतून किरकोळ भूमिकाही त्यांनी केल्या. त्याच सुमारास प्रभात फिल्म कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या बोलपटात त्यांनी संगीतदिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांना सहकार्य केले. पुढे प्रभात फिल्म कंपनीचे कोल्हापुराहून पुण्यास स्थलांतर झाल्यावर वसंतरावांनी केशवराव भोळे आणि मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्यासारख्या संगीत-अभ्यासकांबरोबर सहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या सहवासात राहून त्यांनी गाण्यातील स्वर, तान, मुरकी इत्यादी संगीत-विशेष संपादन केले.

    प्रभातच्या ‘संत ज्ञानेश्वर’ आणि ‘संत सखू’ या गाजलेल्या चित्रपटांतील काही गाण्यांच्या चाली आणि बरेचसे पार्श्वसंगीत वसंत देसाई यांचे आहे. त्याच वेळी देसाई यांनी उसना आवाजही प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना दिला होता. शिवाय, चित्रपटांमधून ते भूमिकाही करीत होते. हलक्याफुलक्या संगीतापेक्षा रागदारी संगीतामध्ये त्यांना विशेष गोडी असल्यामुळे प्रभात फिल्म कंपनीत असतानाच त्यांनी इनायत खाँसाहेब यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताची साधना केली. तसेच ख्यातनाम गवयांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका वारंवार ऐकून, विविध घराण्यांच्या गायकांच्या बैठकांना जाऊन संगीतातील मर्म समजावून घेण्याचे त्यांनी बरेच प्रयत्न केले.

    हेही वाचा – नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    राजकमल कलामंदिराच्या ‘शकुंतला’ या चित्रपटापासून खऱ्या अर्थाने त्यांना स्वतंत्र संगीतदिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यानंतर 32 वर्षे त्यांनी अनेक चित्रपट, नाट्यकृती, बालगीते, समरगीते यांना उत्कृष्ट संगीत दिले. शकुंतला, रामजोशी, अमरभूपाळी, दो आँखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, गुंज उठी शहनाई, आशीर्वाद तसेच गुड्डी या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत विशेष गाजले. महाराष्ट्राच्या स्थापनाप्रसंगी त्यांनी चाल दिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ भूपाळी म्हटली गेली. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताने पाकिस्तानात आकाशवाणीवर आणि शाळांतून प्रार्थनेचा दर्जा संपादन केला. हिंदी-मराठी मिळून एकूण सुमारे 65 चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

    वसंत देसाई यांच्या स्वरसाजाने समृद्ध झालेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाने मराठी रंगभूमीची संगीतपरंपरा पुन्हा एकदा सुरू केली. त्यांना समरगीतांचे जनकही मानण्यात येई. 1962 मधील चीनच्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी स्वरबद्ध केलेले ‘जिंकू किंवा मरू’ हे ग. दि. माडगूळकरांचे समरगीत विशेष लोकप्रिय ठरले. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाले आहेत.

    1971 साली त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार दिला होता तर 1973-74 मध्ये त्यांना मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. 1975 मध्ये विधान परिषदेवर त्यांची राज्यपालांनी नियुक्ती केली होती. अशा या गुणी संगीतकाराचे  22 डिसेंबर 1975 रोजी अपघाती निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – एका चांगल्या बातमीमुळे उत्साह आणखी वाढेल. करिअरची एक उत्तम संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक दृढ होईल. कौटुंबिक वातावरणामुळेही दिलासा मिळेल. मात्र, धावपळीच्या वेळापत्रकात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात अनुभवी कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

    वृषभ – आज खूप मेहनत करावी लागेल, पण या मेहनतीचे भविष्यात मोठे फायदे मिळतील. नवीन व्यवसाय कल्पना किंवा उत्पादन सादर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तुमचे नियोजन आणि बुद्धिमत्ता लोकांना प्रभावित करेल. आर्थिक बाबतीतही सकारात्मक संकेत आहेत. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल.

    मिथुन – आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत असेल. अतिरिक्त उत्पन्न किंवा कमाईचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. खर्चाबाबत विवेकी राहाल, ज्यामुळे बचत वाढेल. संभाषण करताना मात्र सावधगिरी बाळगा, कारण लहानशा टिप्पणीमुळेही कोणालातरी वाईट वाटू शकते. घाईचे निर्णय घेणे टाळा. मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी संबंधित सकारात्मक बातम्यांनी उत्साहित व्हाल.

    कर्क – कामाच्या ठिकाणी वैयक्तिक बाबींवर चर्चा करणे टाळा. विरोधकांपासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात तुमच्या कामाची प्रशंसा होईल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल.  घरातील वातावरण सुखद राहील. जुन्या कौटुंबिक समस्या सुटू शकतात.

    सिंह – प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलणे आवश्यक आहे. घाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. कामात दिरंगाई केल्याने अडचणी वाढू शकतात, म्हणून आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करा. कामाच्या ठिकाणी सांघिक कार्य फायदेशीर ठरेल. जुनी कर्जे फेडण्याबाबतही सकारात्मक संकेत मिळत आहेत. वाहन चालवताना काळजी घ्या.

    कन्या – दिवस थोडा गुंतागुंतीचा असू शकतो, पण संयम आणि समजूतदारपणाने सर्व काही सांभाळून घ्याल. काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो, पण थोडीशी जरी शंका असेल तर घाई करू नका. कुटुंब हेच आज सर्वोच्च प्राधान्य राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते किंवा कुटुंबात नवीन सदस्य आल्याचा आनंद मिळू शकतो.

    तुळ – सुखसोयींमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. एखाद्या नातेवाईकाच्या भेटीने किंवा त्यांच्याशी बोलल्याने संबंध आणखी दृढ होतील. नोकरीतील बदलाची किंवा नवीन संधीची बातमी तुमचा दिवस खास बनवेल.

    वृश्चिक – एक नवीन सुरुवात यशाचे दरवाजे उघडू शकते. काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा मिळेल आणि त्याचे चांगले फळही मिळेल. नवीन वाहन किंवा मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी समन्वय ठेवा, कारण छोट्या-छोट्या गोष्टींचे रूपांतर वादात होऊ शकते. आईसोबतची धार्मिक यात्रा तुमच्या मनाला शांती देऊ शकते.

    हेही वाचा – मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    धनु – आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामासोबतच, विश्रांती आणि सकस आहारावर लक्ष केंद्रित करा. एखादी नवीन योजना किंवा प्रकल्प सुरू करण्याची नियोजन कराल. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन स्रोतावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. संततीच्या शिक्षणाशी संबंधित समस्या चर्चेद्वारे सहजपणे सोडवल्या जाऊ शकतात.

    मकर – दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. तुमच्या समजूतदारपणामुळे अडचणीही कमी होतील. एखादा जुना मुद्दा पुन्हा समोर आल्यास थोडे अस्वस्थ व्हाल. कौटुंबिक पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा नोकरीची नवीन संधी मिळू शकते. पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. अफवांपासून दूर राहा.

    कुंभ – प्रगतीच्या मार्गावरील तुमची वाटचाल अधिक मजबूत होतील. संततीकडून आलेली चांगली बातमी उत्साह वाढवेल. घरातील कामे एकत्र मिळून केल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. एखाद्या अनुभवी व्यावसायिकाचा सल्ला फायदेशीर ठरेल.

    मीन – तुमच्या कामाला आज एक नवीन दिशा मिळेल आणि आत्मविश्वासही वाढेल. कामाच्या ठिकाणी आवडीचे काम मिळाल्याने समाधान आणि आनंद मिळेल. जोडीदाराकडून मिळणारे एखादे सुखद आश्चर्य तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. एखाद्या दीर्घकालीन आरोग्य समस्येमुळे काही चिंता निर्माण होऊ शकते, त्यामुळे निष्काळजीपणा करू नका.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरJuly 27, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे – 4) उच्च शिक्षण (19 ते 24 वर्षे) –…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हृदयशुद्धीचां आवारीं, आराध्यु तो धुरु करी

    July 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026

    Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’

    July 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 374
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 508
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 809
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.