Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026

    Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’

    July 26, 2026

    नळ स्टॉपची कहाणी…

    July 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 8, 2026Updated:June 8, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 08 जून 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 18 ज्येष्ठ शके 1948; तिथि : अष्टमी 27:23; नक्षत्र : शततारका 09:09;
    • योग : विष्कंभ 09:27; करण : बालव 15:29;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : कुंभ 27:35; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:14;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    कालाष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    मराठी समीक्षक आणि विचारवंत दि. के. बेडेकर

    टीम अवांतर

    मराठी श्रेष्ठ समीक्षक आणि विचारवंत दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म 8 जून 1910 रोजी सातारा येथे झाला. हिंदू विश्वविद्यालयाची तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांतील पदवी त्यांनी घेतली. तेथे शिकत असतानाच, 1930 मध्ये, महाराष्ट्रात येऊन मुळशी सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. पुढे मुंबईत येऊन ते कामगार चळवळीत सहभागी झाले. 1954 साली तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते एम.ए. झाले. त्यानंतर पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अर्थविज्ञान या त्रैमासिकाचे संपादन त्यांनी केले.

    अल्पकाळ ते नाशिकाच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. 1962 ते 1964 या काळात मराठी विश्वकोशाच्या कार्यालयात विभाग संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. 1968-69मध्ये गोखले अर्थशास्त्र संस्थेत मराठी ग्रंथसंपादनाचे कार्य त्यांनी केले. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते तत्त्वज्ञानाचे अध्यापन करीत असत.

    हेही वाचा – ‘देवळाबाहेरच्या देवां’ना ओळखण्याची गरज!

    बेडेकरांनी 1936च्या आसपाच कथा, तसेच राजकीय वाङ्मयीन स्वरूपाचे लेखन करावयास सुरुवात केली होती. मात्र त्यांचे सर्व महत्त्वाचे लेखन 1950 नंतरच्या कालखंडातच झाले. नवकाव्य, नवकथा, नवे साहित्यविचार, सौंदर्यशास्त्रीय मीमांसा, अस्तित्ववादासारख्या विचारप्रणाली यांचा हा काळ होता आणि या काळाची आव्हाने आणि आवाहने साक्षेपाने स्वीकारून बेडेकर समीक्षेच्या क्षेत्रात उतरले. साहित्य : निर्मिती व समीक्षा, साहित्यविचार, केशवसुतांची काव्यदृष्टी, आधुनिक मराठी काव्य : उदय, विकास आणि भवितव्य यासारख्या ग्रंथांतून मोजकाच परंतु मौलिक साहित्यविचार त्यांनी माडंला. समाजचिंतन, विचारयात्रा यासारख्या ग्रंथातून त्यांच्या सामाजिक विचाराची ओळख होते.

    भारतीय प्रबोधन : समीक्षण व चिकित्सा या नावाने निघालेल्या शंकरराव देव गौरवग्रंथाचे संपादन त्यांनी भा. श. भणगे यांच्यासमवेत केले होते. मात्र, हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाला. हिंदी उद्योगधंद्यात राबणाऱ्या स्त्रिया आणि मुले, संयुक्त महाराष्ट्र, सुमित्रानंदन पंत, अणुयुगातील मानवधर्म, टूवर्डस अंडरस्टॅंडिग गांधी, धर्मचिंतन आणि धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार ही त्यांची महत्त्वाची अन्य पुस्तके प्रकाशित झाली. समाजवाद प्रेरणा आणि प्रक्रिया हा बेडेकरांच्या गौरवार्थ काढण्यात आलेला ग्रंथ 1971 मध्ये प्रसिद्ध झाला. 2 मे 1973 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस संतुलित आणि सुखद धक्का देणारा असेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कामातील मेहनतीचे फळ तुम्हाला बढती किंवा कौतुकाच्या रूपात मिळू शकते. व्यवसायात भागीदारीचे नवे प्रस्ताव येऊ शकतात. मात्र, काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्याने वैवाहिक नाते अधिक घट्ट होईल. तब्येतीची काळजी घ्या.

    वृषभ – सर्जनशील कामांमधील आवड वाढेल. तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा होईल. महत्त्वाच्या गोष्टी सर्वांना सांगू नका. गाडी काळजीपूर्वक चालवा. संततीच्या वागणुकीबद्दल थोडी चिंता वाटू शकते. कुटुंबात शांतता राखणे ही तुमची जबाबदारी असेल, त्यामुळे सर्वांशी सुसंवाद ठेवा.

    मिथुन – नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. तुमचे नेतृत्व कौशल्य लोकांना प्रभावित करेल. आव्हाने येतील, पण तुम्ही त्यांचा धैर्याने सामना कराल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. संततीच्या आनंदासाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. जुनी कर्जे फेडण्यासाठी पावले उचलाल. योग आणि व्यायाम यामुळे तुमचे आरोग्य व्यवस्थित राहील.

    कर्क – खर्च अचानक वाढू शकतो, ज्यामुळे तणावाखाली असाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस थांबणे शहाणपणाचे ठरेल. व्यवसात काही सौदे जोखमीचे ठरू शकतील. त्यामुळे ते करताना काळजी घ्या. वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण कराल. आरोग्यात चढ-उतार होऊ शकतो. जोडीदारासोबत मिळून संततीच्या भविष्याबद्दल एखादा मोठा निर्णय घेऊ शकता.

    सिंह – नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे. नात्यांमध्ये प्रेम आणि जवळीकता वाढेल, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. व्यवसायात कोणतेही बदल करणे टाळा. एखाद्या धार्मिक समारंभांमध्ये सहभागी व्हाल. शॉपिंगचा तसेच जोडीदारासोबत क्वालिटी टाइम व्यतीत केल्याचा आनंद घ्याल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात कठोर परिश्रम घेतील.

    कन्या – कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. कुटुंबात सलोखा आणि प्रेम टिकून राहील. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीने भावूक होऊ शकता.  नोकरदार जातक वरिष्ठांसोबत पदोन्नतीबद्दल चर्चा करू शकतात. राजकारणात असलेल्यांना नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारख्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

    तुळ – घाईने घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही ना, याची काळजी घ्या. कुटुंबासोबत झालेल्या मोकळ्या संवादामुळे नात्यांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. व्यावसायिक भागीदारीत सामील होणे टाळा. प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते.

    वृश्चिक – नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. अशावेळी  संयम आणि शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल. कामासोबतच आराम करण्यासाठीही वेळ काढा. जोडीदारासोबतचे कोणतेही सुरू असलेले मतभेद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान तुम्हाला मौल्यवान माहिती मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाची बातमी आनंद घेऊन येऊ शकते.

    हेही वाचा – आता पूर्वी अन् पवनची प्रेमकहाणी फुलू लागली…

    धनु – करिअरच्या दृष्टीने दिवस खूप चांगला असेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होतील. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. आत्मविश्वास वाढेल आणि व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची चांगली चिन्हे आहेत. नोकरीच्या ठिकाणी सहकारी तसेच वरिष्ठांकडून कामे पूर्ण करण्यास मदत मिळेल.

    मकर – दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने मूड हलका होईल. छुप्या शत्रूंपासून सावध रहा. दिखाव्यासाठी जास्त पैसे खर्च करणे हानिकारक ठरू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना लक्षणीय नफा मिळू शकतो. पण यासाठी जाणकारांचा सल्ला घेणे, इष्ट. कुटुंबात मालमत्तेसंबंधी चर्चा सुरू होऊ शकते. नवीन पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंद नांदेल.

    कुंभ – नोकरीच्या ठिकाणी आपली कामे स्वत: पूर्ण करा, दुसऱ्यांवर विसंबून राहिल्यास नुकसान होऊ शकते. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात, पण तुमची अंगभूत समज सर्व काही सांभाळून नेईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि स्नेह टिकून राहील. नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे धावपळीत वाढ होऊ शकते. अनोळखी लोकांच्या प्रभावाखाली येणे टाळा.

    मीन – दिवस व्यग्रतेचा राहील. कामाच्या ठिकाणी मोठे धोके पत्करणे टाळा. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कुटुंबातील प्रत्येकाशी सुसंवाद ठेवा, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काय विचार करता ते वडिलांशी किंवा  विश्वासातील व्यक्तीशी बोला. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 27, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 जुलै 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 05 श्रावण शके 1948; तिथि : त्रयोदशी 16:14 ; नक्षत्र : मूळ 10:27; योग : वैधृति 22:54…

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026

    Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’

    July 26, 2026

    नळ स्टॉपची कहाणी…

    July 26, 2026

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 373
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 507
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 807
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026

    Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’

    July 26, 2026

    नळ स्टॉपची कहाणी…

    July 26, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.