Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    पान खाये सैंया हमारो…

    May 31, 2026

    लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…

    May 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 1, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 01 जून 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 11 ज्येष्ठ शके 1948; तिथि : प्रतिपदा 16:36; नक्षत्र : ज्येष्ठा 19:07;
    • योग : सिद्ध 06:18; करण : तैतिल 29:49;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : वृश्चिक 19:07; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:11;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    अंधत्वावर मात करणारी लेखिका हेलन केलर

    टीम अवांतर

    अंधत्वावर मात करणारी जगप्रसिद्ध लेखिका हेलन केलर यांचा जन्म 27 जून 1880 साली अमेरिकेच्या ॲलाबॅमा राज्यातील टस्कंबिआ येथे झाला. दीड वर्षांची असतानाच एका असाध्य मेंदूविकारामुळे ती अंध, बहिरी आणि मुकी झाली. अंधत्वाच्या आपत्तीतून अंशतः वाचलेली विलक्षण जिद्दीची ही तरुणी ‘पर्किन्झ स्कूल फॉर ब्लाइंड्स’ची पदवीधारिका होती. 2 मार्च 1887 हा हेलनच्या शिक्षणाचा पहिला दिवस होता. स्पर्शसंवेदनांच्या सहाय्याने एका महिन्यातच केलरला भाषा अवगत झाली. अकराव्या पाठानंतर प्रथमच केलरच्या तोंडून ‘मी आता मुकी नाही,’ हे वाक्य उच्चारले गेले. ॲन मॅन्सफील्ड सलिव्हन या शिक्षिकेची सातत्याने लाभत असलेली शिकवण आणि ‘हॉरिस मॅन स्कूल फॉर द डेफ’सारख्या संस्थांचे मार्गदर्शन यामुळे ती लेखन, वाचन, वक्तृत्व यांत पारंगत झाली. एवढेच नव्हे, तर औपचारिक शिक्षणातही तिने अनन्यसाधारण यश मिळविले.

    रॅड्‍‌क्लिफ महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी 1896मध्ये ती मॅसॅचूसेट्स राज्यातील ‘केंब्रिज स्कूल फॉर यंग लेडीज’ या संस्थेत जाऊ लागली. तेथे तिने इंग्लिश आणि जर्मन भाषांत विशेष प्रावीण्य संपादन केले. त्यानंतर लेखन, व्याख्याने आणि अपंगसेवा हेच तिचे पुढील आयुष्यातील महत्त्वाचे ध्येय बनले.

    हेही वाचा – लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…

    1923पासून न्यूयॉर्कच्या ‘अमेरिकन फाऊंडेशन फॉर ब्लाइंड्स’ या संस्थेत बरीच वर्षे केलरने काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तिने अनेक सैनिकी रुग्णालयांत जखमी जवानांची शुश्रूषा केली. अंधांना शिकता यावे म्हणून तसेच इतरही समाजकार्यास हातभार लावावा, या हेतूने तिने ‘हेलेन केलर एन्डोमेंट फंड’सुरू केला. त्यासाठी अमेरिका, युरोप आणि जपान येथे व्याख्याने दिली.

    पिक्टोरिअल रिव्ह्यू कंपनीकडून कर्तृत्वपदक, नॅशनल एज्युकेशन असोसिएशनचे सुवर्णपदक, शव्हाल्येज रिबन ऑफ द फ्रेंच लिजन ऑफ ऑनर यासारखे अनेक सन्मान तिला मिळाले. शिवाय, हेलेन केलर इन हर स्टोरी आणि द मिरॅकल वर्कर हे तिच्या जीवनावर आधारित चित्रपटही निघालेले आहेत.

    तिने लिहिलेल्या पुस्तकांपैकी बऱ्याचशा पुस्तकांचे पन्नासांहून अधिक भाषांत रूपांतर झालेले आहे. तिची द स्टोरी ऑफ माय लाइफ, द साँग ऑफ द स्टोन वॉल, मिडस्ट्रीय माय लेटर लाइफ, लेट अस हॅव फेथ यासारखी तिची पुस्तके प्रसिद्ध आहेत. दृष्टी नसून मानवी आकांक्षेचे सौंदर्य ती अनुभवू शकली, श्रवणशक्ती नसून अलौकिक प्रेमाचा सुसंवाद ऐकू शकली. म्हणूनच केलरचे चरित्र आणि कार्य दुर्दैवी अपंग व्यक्तींना चिरंतन स्फूर्तिदायक ठरणारे आहे. कनेक्टिकट राज्यातील ईस्टन येथे 1 जून 1968 रोजी तिचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – तुमची मेहनत आणि समर्पण कार्यालयातील सर्वांचे लक्ष वेधून घेईल. बॉस तुमच्या कामाने इतके प्रभावित होतील की, पदोन्नतीबद्दल चर्चा सुरू होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. काही छुपे शत्रू तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कौटुंबिक वाद घरातच ठेवा. प्रवास आणि अनावश्यक खर्चावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे उत्तम राहील.

    वृषभ – नवीन व्यावसायिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा नफा मिळू शकतो. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांना दिवस चांगला जाईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखादी मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे प्रचंड आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी अभ्यासात काही शिस्त आणि कठोरता बाळगण्याची गरज आहे.

    मिथुन – कुटुंबाला दिलेले एखादे वचन पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे. बऱ्याच काळानंतर एखाद्या जुन्या सवंगड्याला भेटू शकता, पण भूतकाळातील घटना पुन्हा उकरून काढणे टाळा. सहलीचे देखील नियोजन कराल. सभोवतालच्या लोकांशी वैयक्तिक बाबींवर बोलताना काळजी घ्या. एखाद्या कायदेशीर प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक दस्तऐवज आणि निर्णयाकडे व्यक्तिश: बारकाईने लक्ष द्या.

    कर्क – कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. घाईघाईत आणि भावनेच्या भरात घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका, आवश्यकता वाटल्यास जाणकारांचा सल्ला घ्या. काळजीपूर्वक विचार केल्याशिवाय नवीन उपक्रम हाती घेणे टाळा.

    सिंह – दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. एखाद्या कार्यक्रमात प्रभावशाली लोकांशी भेट होईल. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा, कारण यामुळे आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. घाईने घेतलेला कोणताही निर्णय नंतर डोकेदुखी ठरू शकतो. विद्यार्थ्यांना मानसिक ताण आणि अभ्यासाच्या दबावातून दिलासा मिळेल.

    कन्या – मालमत्ता आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये नशीबाची मोठी साथ मिळेल. एखाद्या मोठ्या व्यवहारासंदर्भात महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकता. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी कठोर परिश्रमात कोणतीही कसर सोडू नये. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

    तुळ – नोकरीच्या ठिकाणी आवडीचे काम मिळाल्याने उत्साह वाढेल आणि भावंडांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला बळ मिळेल. व्यावसायात नवीन सौदे होऊ शकतात. मात्र, कागदपत्रे तपासून स्वाक्षरी करा. घरातील वडीलधाऱ्या सदस्यांसोबत वेळ घालवल्याने तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. वाहन दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च येऊ शकतो. लहान मुलांच्या आरोग्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

    वृश्चिक – सभोवतालचे वातावरण अत्यंत सुखद असेल. व्यवसायातील जोडीदार कामासाठी परदेशात जाऊ शकतो. बोलताना सावधगिरी बाळगा. एखादा चुकीचा शब्द भांडणासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करणे महागात पडू शकते. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. मात्र, सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळाल्याने वेळेचे गणित पाळणे शक्य होईल.

    हेही वाचा – साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास ठरेल. प्रभावशाली लोकांना भेटल्याने भविष्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. सभोवतालच्या लोकांबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक हसरा चेहरा खरा नसतो. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा होईल, परंतु खर्च करताना आपल्या बजेटची जाणीव ठेवा. तब्येतीची काळजी घ्या.

    मकर – दिवस मित्र, परिवार आणि प्रियजनांसोबत आनंदाने व्यतीत होण्याची शक्यता आहे. कोणाला काही वचन दिले असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मत्सर किंवा द्वेषाच्या भावना मनात बाळगल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, म्हणून मन स्वच्छ ठेवा. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या एखाद्या शासकीय प्रकरणासाठी अधिक प्रयत्नांची गरज भासू शकते.

    कुंभ – दिवस तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे नेणारा असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. एखाद्या नातेवाईकाच्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. आईच्या आरोग्याबद्दलही काही चिंता वाढू शकते. कौटुंबिक व्यवसायातील चढ-उतारामुळे भावांशी चर्चा करणे महत्त्वाचे ठरेल. कोणाचे वाहन उसने घेणे टाळा, अन्यथा अडचणीत येऊ शकता.

    मीन – सकारात्मक विचारांमुळे कामाच्या ठिकाणी इतरांपेक्षा पुढे रहाल. नवीन नोकरी किंवा चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मन ईश्वरभक्ती आणि अध्यात्मात मग्न राहील. मात्र मुलाच्या करिअरबद्दल काही चिंता वाटू शकते. घरी पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण प्रफुल्लित होईल. कोणत्याही प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, दिशाभूल होणार नाही, याची काळजी घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    By प्राजक्ता काथेMay 31, 2026

    मेष हा आठवडा मनाप्रमाणे कामे होण्याचा आहे. नोकरदारांनी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. हाताखालच्या लोकांकडून युक्तीने…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    पान खाये सैंया हमारो…

    May 31, 2026

    लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…

    May 31, 2026

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 314
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 439
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 667
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    पान खाये सैंया हमारो…

    May 31, 2026

    लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…

    May 31, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.