Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं
    ललित

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेMay 28, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, भावविश्वात समरस होणारी नाती, आत्या भाची नाते. नेहा आतूचे भावविश्व, नेहाचे बालपण, नेहा आत्या स्नेहबंध, नेहाची नवी वास्तू, नेहाचा नवा फ्लॅट, नेहाची स्वप्नपूर्ती
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ऑफिसमध्ये होते आणि नेहाचा मेसेज आला… ‘आत्तू, आमच्या नव्या घराचा ताबा मिळालाय. तुझी खूप आठवण आली किल्ल्या घेताना.’ मेसेज बघता क्षणी मी फोन लावला तिला. खूप उत्साहात होती पोर. आवाजात नुसता आनंद भरलेला… काय सांगू आणि किती सांगू असं झालं होतं तिला. मी म्हटलं, “फोटो पाठव घराचे!”

    “नाही, तू प्रत्यक्ष यायला हवंस बघायला.”

    “मी येईनच गं, पण तुमचं सगळं काम झालं की, सजवलेलं घर पाहायला येईन. तोवर फोटो तर पाठव.”

    “फोटो कशाला, थांब व्हिडीओ कॉल करते… ठेव फोन.”

    पुढच्याच क्षणाला व्हिडीओ कॉल आला आणि घरभर नाचून तिने घराची प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, ओपन टेरेस, अगदी संडास, बाथरूमची पण सैर घडवून आणलीन… छान होतं घर, चौदाव्या मजल्यावर! बक्कळ हवा, उजेड, उत्तम वस्ती, सगळंच छान होतं. पोरीचा आनंद बघून आनंदाश्रू तरळले डोळ्यात माझ्या…

    मी अकरावीत असताना, नेहा आली आमच्या आयुष्यात. भाऊ आणि वहिनीची सोनपरी… आई, बाबा, मी, दादा आणि वहिनी. त्यात नेहाची गोड भर… घराचं गोकुळ करणारी! दादा आणि वहिनी नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर, त्यामुळे मी, आई आणि नेहा, आमचा दिवसभर धुडगूस घरात. तिचं तान्हेपण शब्दशः जगले मी. तिनं  इवल्याशा मुठीत धरलेलं माझं बोट अजूनही तसंच आहे!

    हेही वाचा – माझ्यातल्या ‘मी’ची कथा

    मी बारावीत गेल्यावर ती वर्षाची झाली आणि माझा अभ्यासच होईना झाला. सारखी आपली तिच्यात रमलेली मी. शेवटी आई ओरडली आणि मी अभ्यासिकेत जायला लागले अभ्यास करायला, तेव्हा कुठे बारावीत तगले. तेव्हापासून, ती आणि मी अविभाज्य. माय मरो मावशी जगो म्हणतात. इथे आत्या जगो, एवढाच बदल, तिच्या दृष्टीने.

    माझं लग्न ठरलं आणि मी घरातून जाणार या कल्पनेनंच हतबल झालेली नेहा, मला अजून आठवतेय. सात-आठ वर्षांची असेल ती तेव्हा, पण माझा होणारा नवरा, म्हणजे आदित्य घरी आल्यावर गाल फुगवून बसायची. ‘मी तुझी आत्या चोरून नेणारे,’ असं तो म्हणाला की, इकडे डोळ्याला पाझर फुटायचे नुसते. पण आवडायचा आदित्य काका तिला. त्याच्या हळुवार वागण्याने, त्याने पण आपलंस करून घेतलं तिला.

    माझ्या लग्नाच्या दिवशी तर, ती एवढी धाय मोकलून रडली ती, की माझा पाय अडखळला, डोळे डबडबले आणि शेवटी तिची बालमिठी निग्रहाने दूर करत, मी धावतच गाडीत बसले. काळीज पिळवटून टाकणारा तो क्षण आठवला की, आज हसू येतं, पण तेव्हा तो प्रसंग फार कठीण होता!

    माझ्या लेकाचा जन्म झाला आणि तिचा आनंद गगनात मावेना. त्याच्या नावाची चर्चा घरात सुरू असताना, ठरलेलं नाव सोसायटीभर सांगत फिरणारी परकरी ती, अजूनही आठवतेय मला. त्याच्याशी खेळताना आणि मला आता भाऊ झालाय, असं सगळ्यांना तोंडभर हसून सांगणारी ती, कशी विसरणार मी?

    नंतर माझा संसार, माझी नोकरी, माझा लेक यात मी गुरफटले, भेटी थोड्याश्या दुरावल्या, पण ते जपलेलं नातं मात्र अक्षय्य राहिलं. रक्षाबंधन, भाऊबीज तर होतेच, पण इतर सण सुद्धा आम्ही जमेल तसे एकत्र साजरे करत असू… जपत असू आमच्या नात्याचे धागे आम्ही, जिवापाड!

    तिची शाळा, कॉलेज, पुढचं शिक्षण यात आत्तूची जागा इतर बऱ्याच गोष्टींनी घेतली, पण एक कोपरा मात्र अजूनही माझ्यासाठी राखीव होता.

    उत्तम शिकली ती, बँकेत छान नोकरी लागली तिला आणि तिच्या ट्रेकिंग ग्रुपमधला कानडी राघवेंद्र भावला तिला. सीए असलेला, मूळचा मंगलोरजवळच्या एका गावातला, पण आता पुण्यात नोकरीनिमित्त आलेला… त्याचे आई, बाबा आणि तो, भाड्याच्या 2 बीएचकेमध्ये रहायचे… लाडकी आत्या म्हणून हे गुपित प्रथम मलाच सांगावंसं वाटलं होतं तिला, हेच तर आमच्या नात्याचं इंगित होतं. यथावकाश ते सगळ्यांना कळलं आणि आमचं छोटसं कुटुंब न्हाऊन निघालं आनंदाच्या कारंज्यात.

    राघवेंद्रशी बोलताना एकच दुर्दम्य इच्छा दिसली मला त्याच्या बोलण्यात, ते म्हणजे पुण्यात घर हवं आणि ते चौघांचंही हवं. नेहाचीही तीच मनीषा! लगेच मूल होऊ न देता, मनाशी जपलेलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास. दोन्हीकडच्या मोठ्यांची मदत, दोघांनी घेतलेलं कर्ज, या सगळ्याची मिळवणी होऊन आज नेहा नव्या वास्तूची स्वामिनी झाली होती.

    हेही वाचा – परोपकार

    मला अभिमान वाटला, कारण मी जगले होते तिच्यासोबत, प्रत्येक क्षण… तिच्या आकांक्षांची साक्षीदार म्हणून… तिच्या सुखाचे कवडसे अनुभवले होते मी… नात्यांचा दुरावा अनुभवण्याच्या आजच्या काळात, नेहाचं आणि माझं हे नातं अगदी आगळंवेगळं. समरसून जपलंय ते नातं आम्ही. माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींना सुद्धा हे ठाऊक आहे. त्या कौतुक करतात आमचं. म्हणतात, प्रेम दिलं तर, प्रेम मिळतं, दामदुप्पट! तू साक्षी आहेस…

    नेहाच्या नव्या घराचा व्हिडीओ बघताना, पापण्या ओलावल्या माझ्या. धूसर झाली चित्रं, पण मला झालेला आनंद तिला जाणवला.

    “आत्तू, तुझंच घर आहे. कधीही ये हक्काने माहेरपणाला,” असं ती म्हणाल्यावर मात्र मला सार्थक झाल्यासारखं वाटलं माझ्या जगण्याचं. तिच्या सासूचाही फोन आला, या चार दिवस मुक्कामाला, असं अगत्याचं निमंत्रण देणारा… भरून पावले मी.

    अशीच जपायची असतात नाती, दोन्ही बाजूंनी, नाही का? तरच समरस होता येतं एकमेकांच्या भावविश्वात

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026 ललित

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    By प्रदीप केळुस्करAugust 1, 2026

    भाग – 2 आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस…

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 515
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.