Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    Team AvaantarBy Team AvaantarMay 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ॥520॥ वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम । आदिजनक तूं ॥521॥ आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥522॥ ऐसें सानुरागें चित्तें । स्तवन केलें पांडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥523॥ पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥524॥ पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥525॥ इये चराचरीं समस्ते । अखंडिता देखे तयांतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥526॥ ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें । तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥527॥ आणिक स्तुति नाठवे । आणि निवांताही न नसवे । नेणों कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥528॥ किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रावरी । कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥529॥ देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई । तरी तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥530॥ उभा माझिये पाठीसीं । म्हणोनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी । सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडे तुज ॥531॥ आतां वेगळालिया अवेवां । नेणें रूप करूं देवा । म्हणोनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥532॥ जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमितविक्रमा । सकळकाळीं समा । सर्वदेवा ॥533॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : कीर्ती आठवितां वेळोवेळां, भोगितसें महासुखाचा सोहळा

    अर्थ

    हे अनंता, तू वायू आहेस आणि जगाचे शासन करणारा यम तू आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी (जठराग्नी) तो तू आहेस. ॥520॥ देवा तू वरुण, चंद्र आणि जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस आणि त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदिजनक तू आहेस. ॥521॥ आणि हे जगन्नाथा, आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही, ते सर्व तूच आहेस. म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो. ॥522॥ अशा प्रीतियुक्त अंत:करणाने अर्जुनाने भगवंतांची स्तुती केली; मग पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो, ॥523॥ पुन्हा त्या श्रीमूर्तीला साद्यंत पाहिले आणि पुन्हा म्हणाला, प्रभो तुला नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. ॥524॥ त्या मूर्तीच्या (एकेक) अवयवाचे भाग पाहाता पाहाता, त्याच्या अंत:करणास समाधान वाटले आणि पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. ॥525॥ या सर्व स्थावर-जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू त्याला त्याने पाहिले आणि पुन्हा म्हणाला, प्रभो तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. ॥526॥ अशी ती अनंत आणि अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रकट होत होती, तो तो अर्जुन ‘प्रभो, तुला नमस्कार असो, नमस्कार असो,’ असेच म्हणत होता. ॥527॥ ‘नमस्ते नमस्ते’ याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना आणि निवांतपणे राहावे हेही सहन होईना. कशा प्रेमभावाने तो (अर्जुन) ‘नमस्ते नमस्ते’ अशीच गर्जना करत होता, ते कळत नाही! ॥528॥ फार काय सांगावे! याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले आणि पुन्हा म्हणाला की, हे माझ्यासमोर असणार्‍या श्रीहरी, तुला नमस्कार असो. ॥529॥ देवाला पाठ आणि पोट आहे की नाही, याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे? परंतु महाराज, पाठमोरा जो तू, त्याला नमस्कार असो. ॥530॥ माझ्या पाठीमागे तू जसा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो; परंतु हे परमेश्वरा, जगाशी समोर अथवा पाठमोरे होणे, हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही. (कारण जगद्रूप तूच आहेस). ॥531॥ आता वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे देवा, मला कळत नाही. याकरिता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. ॥532॥ देवा अनंत बलाच्या आवेशाचे तू ठिकाण आहेस आणि तुला पराक्रमाला मोजता येत नाही; तू तिन्ही काळी सारखा (एकरूप) असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. ॥533॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान

    May 22, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : कीर्ती आठवितां वेळोवेळां, भोगितसें महासुखाचा सोहळा

    May 21, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान

    By Team AvaantarMay 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि…

    Dnyaneshwari : कीर्ती आठवितां वेळोवेळां, भोगितसें महासुखाचा सोहळा

    May 21, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026

    रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू

    May 23, 2026

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    May 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 मे 2026

    May 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 306
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 428
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 646
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026
    Most Popular

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.