Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    Team AvaantarBy Team AvaantarMay 18, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझां तोंडीं । तुवां देखिलें जें ॥457॥ तरि तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । वल्गिजत आहाती ॥458॥ हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरि गजदळें । वाखाणिजताती ॥459॥ म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । जगाचा भरूं । घोटु यया ॥460॥ पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरि जाळूं । काई बाणवरी खिळूं । वारयातें ॥461॥ ऐशा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥462॥ बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥463॥ तरि हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळे । अगा चित्रींची फळें । वीर हे देखें ॥464॥ हां मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ॥465॥

    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
    मयैवैते निहताः पूवमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥33॥

    येर चेष्टवितें जें बळ । तें मियां मागांचि ग्रासिलें सकळ । जातां कोलौरीचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥466॥ हालविती दोरी तुटली । तरि तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥467॥ तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळु न लगेल पैं गा । म्हणोनि उठीं उठीं वेगा । शाहाणा होईं ॥468॥ तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें । मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥469॥ आतां हें त्याहूनि निपटारें जाहलें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥470॥ आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ॥471॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…

    अर्थ

    विजेच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये जे पाहिलेस, ॥457॥ तर त्यामध्ये खात्रीपूर्वक काहीच शिल्लक राहाणार नाही. ते पाहा, या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे. ॥458॥ हे जे सैन्यांचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत आणि हत्तींचे थवे वगैरे आपली सैन्ये यमाच्या वरचढ आहेत, असे त्यांचे वर्णन करीत आहेत. ॥459॥ ती म्हणतात (ती सैन्ये अशी वल्गना करतात) की, आम्ही प्रतिसृष्टी करू. शपथ वाहून (प्रतिज्ञेने) मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू. ॥460॥ आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळू आणि हे आकाश तर वरच्या वरच पेटवून भस्म करू; इतकेच काय, एवढा चंचल वारा, पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणाने जागच्या जागी जखडून टाकू. ॥461॥ पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत, ते अशा या चतुरंग सैन्यरूप संपत्तीच्या सहाय्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात. ॥462॥ त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षा दाहक वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषाशी तुलना केली तर, काळकूट विषाला मधुर म्हणावे लागेल. ॥463॥ (अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत) तरी हे वीर गंधर्वनगराचे लोट आहेत, किंवा पोकळीचे भेंडोळे. चित्राची रंगीत पोकळ फळे आहेत,  असे समज. ॥464॥ हा सैन्यसमुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हे सैन्य नव्हे, तर कापडाचा साप केलेला आहे, अथवा हे सजवून मांडलेले भोत आहेत. ॥465॥

    म्हणून तू (युद्धाला) उभा राहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे (सर्व) मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत. हे सव्यसाचिन् (तू) केवळ निमित्तमात्र हो. ॥33॥

    शिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात, ते सर्व सामर्थ्य मी मधेच नाहीसे केले आहे. आता हे मातीच्या चित्रातील वेताळांसारखे निर्जीव आहेत. ॥466॥ खांबावरच्या बाहुल्यांना हालविणारी दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या बाहुल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात. ॥467॥ त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही. एवढ्याकरिता अर्जुना, शहाणा हो आणि लवकर उठ पाहू. ॥468॥ विराटराजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे (कौरव) मत्स्यदेशात आले होते, त्यावेळेस सरसकट सर्वांनाच तू मोहनास्त्र घातलेस. मग विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी सर्वांची वस्त्रे हिसकावून त्यांस नग्न केले. ॥469॥ आता हे त्याहीपेक्षा तेजोहीन झालेले आहेत आणि आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे, तर त्यांस तू मार आणि एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले, असे यश मिळव. ॥470॥ आणि यात केवळ रिकामे यशच मिळाणार आहे, असे नाही तर, संपूर्ण राज्य देखील त्यात आलेले आहे. अर्जुना, तू केवळ नावाला मात्र कारण हो. ॥471॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु

    May 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…

    May 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला, का भणंगा दुष्काळु पाहला

    May 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु

    By Team AvaantarMay 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा मियां होआवया समाधान । पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकें काळें त्रिभुवन…

    Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…

    May 16, 2026

    Dnyaneshwari : जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला, का भणंगा दुष्काळु पाहला

    May 15, 2026

    Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत

    May 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    May 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 301
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 423
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 209
    • मैत्रीण 19
    • ललित 631
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.