Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दोन स्पेशल

    August 23, 2026

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत

    Team AvaantarBy Team AvaantarMay 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दष्ट्राकरालानि भयानकानि । केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥27॥

    तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥410॥ कां महाकल्पाचां शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसाही स्वर्गा मिठी । पाताळासकट दे ॥411॥ नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥412॥ तैसीं साचलीं सैन्यें एकवाटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें । परि एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥413॥ अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥414॥ परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिलीं दाढांचां सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥415॥ तियें रत्नें दांताचिये सवडी । कूट लागलें जिभेचां बुडीं । कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥416॥ हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें । परि जीवदेहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥417॥ तैसीं शरीरामाजीं चोखडीं । होतीं उत्तमांगें इयें फुडीं । म्हणोनि महाकाळाचांहि तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥418॥ मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं । जग आपैसेंचि वदनडोहीं । संचरताहे ॥419॥ या आघवियाचि सृष्टी । लागलिया आहाति वदनाचां वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥420॥ ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥421॥ आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥422॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    अर्थ

    हे (अगोदर) भयानक आणि दाढांच्या योगाने (अधिक) भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये त्वरेने शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमध्ये अडकलेले दिसतात. ॥27॥

    त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला, ‘अहो हे पाहा. ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत, त्याप्रमाणे तलवार व चिलखत यासह दोन्हीकडील सैन्ये एकाच वेळेला तोंडात गेली आहेत. ॥410॥ अथवा महाकल्पान्ताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो, त्या वेळेला पाताळासह एकवीस स्वर्गांना तो ग्रासून टाकतो. ॥411॥ अथवा, प्रतिकूल दैवाच्या योगाने कृपणाचे ठेवे सहजच जसे जेथच्या तेथे नाश पावतात, ॥412॥ त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्ये या तोंडामध्ये एकदम शिरली आहेत. परंतु कसे कर्म विपरीत आहे पाहा की, त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाही! ॥413॥ ज्याप्रमाणे उंटाने अशोक झाडाचे ढगळे चघळावेत, त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत. ॥414॥ परंतु मुकुटासह मस्तके दाढांच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ होताना दिसत आहेत! ॥415॥ मुकुटांवरील काही रत्ने दातांच्या फटीत सापडली आहेत; कित्येक रत्नांचे झालेले पीठ, जिभेच्या बुडास लागले असून काही काही दाढांचे अग्रभागही त्या पिठाने माखून गेले आहेत. ॥416॥ अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे आणि बळे जरी ग्रासली तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तके, ती अवश्य रक्षण केली गेली. ॥417॥ त्याप्रमाणे मस्तके निश्चयेकरून शरीराचे उत्तम भाग होती, म्हणून ती महाकाळाच्या (विश्वरूपी काळाच्या) तोंडात जरी गेली, तरी पण शेवटी विश्वरूपी महाकाळाच्याही तोंडात नाश पावली नाहीत. ॥418॥ नंतर अर्जुन म्हणावयास लागला, हे काय? जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही! सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे. ॥419॥ या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागीच त्यास गिळून टाकीत आहे. ॥420॥ ब्रह्मदेव आदिकरून सर्वजण उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत, ते अलीकडील तोंडातच पडत आहेत. ॥421॥ आणखी देखील जेवढे प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांस उत्पन्न झालेल्या ठिकाणीच मुख गिळून टाकीत आहे, पण याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही. ॥422॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके

    August 22, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली

    August 21, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    By Team AvaantarAugust 23, 2026

    अध्याय तेरावा कां मातलिया सरडा । पुढती बुड पुढती शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसा…

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके

    August 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली

    August 21, 2026

    कानडा राजा

    August 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दोन स्पेशल

    August 23, 2026

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 869
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दोन स्पेशल

    August 23, 2026

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.