Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 8, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 08 मे 2026; वार : शुक्रवार

    भारतीय सौर : 18 वैशाख शके 1948; तिथि : षष्ठी 12:21; नक्षत्र : उत्तराषाढा 21:19;

    योग : शुभ 26:29; करण : विष्टि 25:15;

    सूर्य : मेष; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:02;

    पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;

    शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    जागतिक रेड क्रॉस दिन

    टीम अवांतर

    इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसचे (ICRC) संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. 1859 मध्ये हेन्री ड्युनंट यांनी दुसऱ्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धात इटलीच्या सॉल्फेरिनोच्या युद्धभूमीवर जखमी सैनिकांच्या वेदना जवळून बघितल्या. या जखमी सैनिकांना योग्य उपचार न मिळणे आणि वैद्यकीय सेवा तसेच मदतीचा युद्धभूमीवर असणारा अभाव पाहून हेन्री घाबरले होते. त्यातूनच, त्यांनी आपल्या राष्ट्रीयत्वाची पर्वा न करता जखमींना मदत केली. त्यासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांनाही संघटित केले होते.

    रणांगणावरील या अनुभवांवर आधारित हेन्री यांनी नंतर ‘अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात युद्धादरम्यान जखमींची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवी गट स्थापन करण्याविषयी त्यांनी लिहिले होते. पुढे 1863 मध्ये, त्यांच्याच प्रयत्नांमुळे जखमींच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय समितीची स्थापना झाली, जी नंतर इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (ICRC) म्हणून ओळखली जाऊ लागली.

    हेही वाचा – सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    रेडक्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती, राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांचा संघ (द लीग ऑफ रेडक्रॉस सोसायटीज) आणि राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था (नॅशनल रेडक्रॉस सोसायटीज) हे या चळवळीचे प्रमुख घटक आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस परिषद (इंटरनॅशनल रेडक्रॉस कॉन्फरन्स) ही या चळवळीमधला महत्वाचा दुवा आहे. 1933 मध्ये जपानच्या टोकियो येथील रेड क्रॉसच्या 20 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेस दरम्यान अधिकृतपणे ‘जागतिक रेड क्रॉस दिन’ साजरा केला जावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा होतो.

    पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर अधिक चिन्हासारखी तांबडी फुली हे या संघटनेचे बोधचिन्ह असून त्यावरूनच संघटनेचे ‘रेडक्रॉस’ हे नाव पडले आहे. हेन्री हे स्वित्झर्लंडचे नागरिक असल्याने त्या देशाच्या सन्मानार्थ त्याच्या तांबड्या पार्श्वभूमीवरील पांढरी फुली असलेल्या राष्ट्रध्वजावरच्या रंगांची अदलाबदल करून हे चिन्ह तयार करण्यात आलेले आहे. इस्लामी राष्ट्रांत तांबड्या फुलीऐवजी पांढऱ्या पार्श्वभूमीवर चंद्रकोर (रेडक्रेसेंट) तर इराणमध्ये तांबडा (उगवता) सूर्य आणि सिंह (रेड लायन अँड सन) आणि इस्रायलमध्ये तांबडा ‘डेव्हिडचा तारा’ असा या बोधचिन्हात बदल केलेला आहे. हे बोधचिन्ह असलेली वाहने, इमारती तसेच ते धारण करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर गोळीबार, बॉबफेक अथवा हल्ला करून नये असेही ठरविण्यात आलेले आहे. अर्थात, अशा वाहनांमध्ये किंवा इमारतींमध्ये युद्धसाहित्य अथवा सैनिक असता कामा नये, असाही नियम आहे.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज थोडे जास्त काम असू शकते. त्यामुळे सकाळपासूनच धावपळ सुरू राहील. ऑफिसमध्ये थोडा तणाव असू शकतो, पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती शांत होईल. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे ताण कमी जाणवेल. नात्यांमध्ये चिडचिड टाळणे महत्त्वाचे आहे. पैशांचा वापर विचारपूर्वक करा. थकवा जाणवू शकतो, शक्य तेवढा आराम करा.

    वृषभ – आज एखादी नवीन योजना सुचू शकते. त्यानिमित्ताने प्रवासाचा बेत आखला जाईल. जवळच्या नातेवाईकाबरोबरचा दूरावा तुमच्या पुढाकाराने कमी होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी संयम बाळगावा. व्यवसायात घाईने निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते, अनावश्यक खर्च वाढू शकतो. आरोग्य सामान्य राहील, पण विश्रांती घेण्याची गरज असेल.

    मिथुन – मनात एकाच वेळी अनेक गोष्टी घोळत असतील. पैशांची किंवा जबाबदाऱ्यांची चिंता वाटत राहील. कामाच्या ठिकाणी कोणतीही जबाबदारी समजून घेतल्याशिवाय स्वीकारू नका. जवळच्या व्यक्तीशी एखाद्या विषयावर स्पष्टपणे बोलणे महत्त्वाचे आहे. व्यावसायिक भागीदारीबाबत सावधगिरी बाळगा. दिवस संपेपर्यंत ताण काही प्रमाणात कमी होईल.

    कर्क – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक बाबी हाताळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये तारतम्य बाळगण्याची गरज आहे. एखादा फोन कॉल अपमानित करणारा वाटू शकते, परंतु लगेच त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. कुटुंबासोबत वेळ घालवणे फलदायी ठरेल. तब्येत नरम-गरम राहू शकते.

    सिंह – कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागू शकते. ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल, पण हळूहळू सर्व काही निवळेल. जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिळेल. संध्याकाळी जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होऊ शकतात. खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेटकडेही लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

    कन्या – भविष्याबद्दल अधिक विचार करू शकता. नोकरी व्यतिरिक्त काहीतरी नवीन सुरू करण्याची इच्छा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात. व्यवसायात जुने संपर्क फायदेशीर ठरू शकतात. नातेसंबंधात दुरावा जाणवत असेल तर संवाद थांबवू नका. अतिरिक्त ताण घेण्याचे टाळा.

    तुळ – मनःस्थिती थोडी भावनिक असू शकते. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात चांगल्या नफ्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना अनावश्यक जोखीम घेऊ नका. प्रलंबित कामे पुढे सरकू शकतात. बाहेरचे पदार्थ कमी खा, नाहीतर पोटाचे विकार होऊ शकतात.

    वृश्चिक – काही कामे तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील, तर काहींसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. नोकरीतील बदलाबाबत चर्चा होऊ शकते. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क वाढेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंददायी असेल. आर्थिक स्थिती चांगली असेल, पण कोणाला पैसे उधार देणे टाळा. पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो, वैद्यकीय सल्ला घ्या.

    हेही वाचा – गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    धनु – घर आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबाबत अतिविचार कराल. एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दलची चिंता त्रासदायक ठरू शकते. ऑफिसमधील काम संथ गतीने पूर्ण होईल. नात्यांमधील गैरसमज वाढू देऊ नका. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधीत योजनेची संपूर्ण माहिती गोळा करणे महत्त्वाचे आहे. आरोग्याची काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा.

    मकर – आत्मविश्वास वाढलेला असेल. रखडलेली कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. रागाच्या भरात कोणाशीही वाद घालणे टाळा. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असू शकते. पुरेशी झोप न झाल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

    कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. काम हळूहळू पूर्ण होईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. व्यवसायामध्ये नवीन व्यवसाय योजना विकसित करू शकता. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा.

    मीन – जुन्या आठवणी पुन्हा जागृत होऊ शकतात. त्यामुळे थोडे भावनिक होऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात हळूहळू वाढ होण्याची चिन्हे आहेत. नातेसंबंधांमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरेल. खर्चाच्या बाबत काळजी घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे अस्वस्थपणा जाणवेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 मे 2026

    May 5, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    By Team AvaantarMay 7, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 मे 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 17…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 मे 2026

    May 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    May 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 411
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 609
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026
    Most Popular

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.