Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 03 ते 09 मे 2026

    May 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!
    ललित

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMay 3, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, सहजीवनाचा अर्थ, पती पत्नीचे सहजीवन, आजच्या काळात बदललेली नाती, आजच्या काळातील नव्या जबाबदाऱ्या, पती पत्नील समजूतदारपणा, पती पत्नीतील आदर भावना, वाढत्या महागाईचे आव्हान, पती पत्नीतील सामंजस्य, जबाबदार पती, जबाबदार पत्नी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नुकताच एक लेख वाचनात आला, ज्यामध्ये स्वयंपाकघर, स्त्री-पुरुषांमधील कामाची विभागणी आणि पुरुषांचा घरकामातील सहभाग यावर भाष्य केलं होतं. तो लेख वाचताना असं जाणवलं की, आपण आजकाल प्रत्येक विषयाकडे ठराविक चौकटीतून पाहू लागलो आहोत. पण या वादात ‘सहजीवन’ हा जो मूळ गाभा आहे, तो कुठेतरी हरवत चालला आहे. कोणत्याही नात्याचा विचार हा एकांगी करून चालत नाही, तर त्यातील परस्पर सामंजस्य समजून घेणं महत्त्वाचं असतं.

    बदलत्या काळातील आव्हाने पेलताना आज नवरा आणि बायको दोघांचीही ओढाताण होताना दिसते. आजच्या काळात सहजीवन पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त कठीण झालं आहे. वाढत्या महागाईमुळे पती-पत्नी दोघांनाही नोकरी करणं अनिवार्य झालं आहे. ‘न्यूक्लिअर फॅमिली’च्या संस्कृतीमुळे घरात वडिलधाऱ्यांचा आधार उरलेला नाही. अशा वेळी “मुलं जन्माला घालावीत की नाही?” इथपासून आजची ‘कपल्स’ विचार करतात. वाढत्या महागाईत मुलांचं संगोपन कसं करायचं आणि दोघांनाही वेळ नसल्यामुळे मुलांना ‘डे-केअर सेंटर’मध्ये ठेवताना तिथे त्यांना कशी वागणूक मिळेल, ही काळजी पालकांना सतत पोखरत असते. या धावपळीत एकमेकांसाठी तसेच पाल्यांकरता वेळ काढणं, हेच एक मोठं आव्हान बनलं आहे.

    या ठिकाणी श्रमविभागणी ही अन्याय की सोय? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर त्याकरिता अगदी मानवी उत्क्रांतीच्या काळापासून पाहिले तर, कामाची विभागणी ही केवळ कोणा एकावर अन्याय करण्यासाठी नव्हती. तो काळ संघर्षाचा होता. घराचं संरक्षण आणि अन्नाची तरतूद करण्यासाठी शारीरिक ताकदीची गरज होती, म्हणून ती जबाबदारी पुरुषाने स्वीकारली, तर घराचं व्यवस्थापन आणि मुलांचे संगोपन ही जबाबदारी स्त्रीने पेलली. हे एकमेकांना कमी लेखणं नव्हतं, तर ते घराचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी केलेलं एक समजूतदार ‘श्रमविभाजन’ होतं. यामध्ये कर्तव्याचं भान आणि जिव्हाळा होता… तसेच तो एक वैयक्तिक अनुभव होता.

    हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!

    सहजीवन म्हणजे केवळ ‘मी अर्धी भांडी घासतो आणि तू अर्धी घास’ असं गणिती वाटप नसतं. माझ्या पाहण्यात कितीतरी अशी जोडपी आहेत, जे अनेक बिझी कॉर्पोरेट सेक्टर असू देत किंवा पोलीस खात्यासारखे सतत चोवीस तास कर्तव्यात मग्न असणारे व्यक्ती असू देत, त्यांची ड्युटी किती कठीण असते, हे वेगळं सांगायला नको. पण मी हे अनेकांच्या बाबतीत निरीक्षण केले आहे की, नाइट ड्युटीवरून पहाटे चार वाजता घरी आले तरी, दोन-तीन तासांत पुन्हा उठून सकाळी साडेसातला मुलांना शाळेत सोडण्यासारखी कामं त्यांनी नेहमीच आनंदाने केली. रविवारी सुटी असली की, मुलांची आंघोळ, त्यांना जेवू घालणं यात ते हिरिरीने भाग घ्यायचे. माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी ही बाब निदर्शनास आणते आहे… कारण माझे मिस्टर देखील पोलीस ऑफिसर आहेत आणि हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये माझी मुलं, भाचे आहेत. शैक्षणिक क्षेत्रात, वकिलीच्या व्यवसायात तसेच बँकिंग व्यवसायात माझे भाऊ आहेत, जे त्यांच्या संसाराचा गाडा हाकताना घरामध्ये शक्यतोवर होईल, तितकी मदत ते करत असतात. स्वतःची झोप आणि थकवा बाजूला सारून कुटुंबासाठी दिलेला हा वेळ, हा त्यांचा ‘चांगुलपणा’ तर आहेच, पण त्यासोबतच तो त्यांचा त्यांच्या पत्नीप्रती असलेला एक ‘मूक सन्मान’ आहे.

    सुरक्षितता आणि विश्वासावर नवरा, बायकोचे नाते अधिक समृद्ध होतं, असं मला वाटतं. आजच्या धावपळीच्या युगात एकमेकांना वाटणारी ‘सुरक्षितता’ अधिक मोलाची असते. आजही अनेक ठिकाणी बाई दोन पावलं मागे राहणं पसंत करते, पण ते न्यूनगंडातून नाही, तर त्या पुरुषाच्या कर्तृत्वावर आणि त्याने दिलेल्या सुरक्षिततेच्या कवचावर असलेल्या विश्वासामुळे!  बाहेरील जगाशी संघर्ष करताना जेव्हा पुरुष ढाल बनून पुढे उभा राहतो, तेव्हा ती सुरक्षितता स्त्रीला मानसिक बळ देते. माझी एक मैत्रीण आज सरकारी खात्यामध्ये चांगली कमिश्नरेट पदावर असती, परंतु तिच्या नवऱ्याची बिझी श्येड्युल्ड असलेली नोकरी पाहून तिने स्वतःहून नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती तिच्या संसारात समाधानी आहे. हा सर्व प्रकार एकमेकांच्या सहमतीने आणि सामंजस्याने झाला तर, त्या नवरा, बायकोला या बाबतीत कुठलाच कमीपणा न वाटता उलट ते नातं अजून चांगले बहरतं!

    अधिकारशाहीला छेद देऊन कुटुंबात पोषक वातावरणही असणे वैवाहिक जीवनात महत्त्वाचे आहे, नाही का? त्याच सोबत समाजातल्या त्या वास्तवाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, जिथे आजही काही पुरुष हेकेखोरपणे आपला अधिकार गाजवतात. स्त्रीला केवळ ‘रांधा, वाढा, उष्टे काढा’ या चौकटीतच पाहिलं जातं. काही घरांत आजही पुरुष स्वतःचा पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतः भरून घेत नाहीत! ही मानसिकता बदलायला हवी. सहजीवन म्हणजे सत्तेचा खेळ नाही, तर ते एकमेकांसाठी पूरक वातावरण निर्माण करणारं एक नातं आहे.

    हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!

    सहजीवनात विसंवाद तेव्हाच होतो, जेव्हा तिथे अहंकाराचा प्रवेश होतो. हेकेखोरपणा हा केवळ पुरुषांकडेच असतो, असे नाही. समाजात जसे काही पुरुष अधिकार गाजवणारे असतात, तशाच काही स्त्रिया सुद्धा टोकाच्या हेकेखोर आणि आक्रमक स्वभावाच्या असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून आक्रमक होणे किंवा स्वतःचेच म्हणणे खरे करणे, यामुळे नात्यातील लवचिकता संपते. स्त्री असो वा पुरुष, जर स्वभाव लवचिक नसेल आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती नसेल, तर त्या संसाराचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही.

    स्वयंपाकघरात मदत करणारा पुरुष कौतुकास्पद आहेच, पण जो पुरुष आजच्या कठीण काळात आपल्या पत्नीच्या श्रमाचा सन्मान करतो, तिच्या विश्रांतीचा विचार करतो आणि संसाराच्या प्रत्येक चढ-उतारात ‘आपलं घर’ या भावनेतून स्वतःला झोकून देतो, तो खऱ्या अर्थाने ‘देखणा’ असतो. सहजीवन हे केवळ हक्क गाजवण्याचं नाव नसून, ते एकमेकांना सावरून घेण्याचं आणि समृद्ध करण्याचं नाव आहे!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026 ललित

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026 ललित

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    By मधुर सुनील कुलकर्णीMay 2, 2026

    उत्तरार्ध गौरी आणि आदिनाथबद्दल शैलाच्या कानावर आलं. “गौरी, सावध हो. तुझी पावलं जिकडे वळताहेत तो…

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026

    कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला

    May 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 03 ते 09 मे 2026

    May 3, 2026

    Dnyaneshwari : तुझें रूप वय कैसें, तुजपैलीकडे काय असे

    May 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 03 मे 2026

    May 3, 2026

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 286
    • अवांतर 185
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 405
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 600
    • शैक्षणिक 78
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 03 ते 09 मे 2026

    May 3, 2026
    Most Popular

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.