Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 27, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 एप्रिल 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 07 वैशाख शके 1948; तिथि : एकादशी 18:15; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 21:18;
    • योग : ध्रुव 21:35; करण : बव अहोरात्र;
    • सूर्य : मेष; चंद्र : सिंह 27:35;  सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 18:58;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    मोहिनी एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका जोहरा सहगल

    टीम अवांतर

    प्रसिद्ध अभिनेत्री, नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शिका जोहरा सहगल यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे झाला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जोहरा यांनी जर्मनीतील ड्रेझ्डेन येथे प्रख्यात जर्मन नर्तकी आणि नृत्यशिक्षिका मेरी विग्‌मान यांच्या ‘विग्‌मान स्कूल’ या नृत्यशिक्षण संस्थेमध्ये बॅले नृत्यप्रकार शिकण्यासाठी प्रवेश घेतला. त्यांनी या नृत्यप्रकाराची प्रवेश परीक्षा पूर्वीचा या नृत्याचा कोणताही अनुभव नसताना उत्तीर्ण केली आणि या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
    यानंतर त्यांनी जपान, इजिप्त, युरोप आणि अमेरिकेच्या अनेक भागांचा दौरा केला. 1940 मध्ये त्या भारतात परतल्या. उदय शंकर यांच्या अलमोडा येथील “इंडिया कल्चर सेंटर” येथे त्या नृत्यशिक्षिका म्हणून काम करू लागल्या.

    1945 साली जोहरा सहगल ‘पृथ्वी थिएटर’ या नाट्यसंस्थेमध्ये अभिनेत्री म्हणून रूजू झाल्या. या नाट्यसंस्थेसमवेत त्यांनी संपूर्ण भारतभर दौरा केला. याशिवाय जोहरा सहगल यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेद्वारे निर्मित अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. 1946 मध्ये त्यांनी ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित आणि इप्टा निर्मित धरती के लाल या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणूनही काम केले. ज्यात प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या बाझी आणि राज कपूर यांच्या आवारा या चित्रपटांचा समावेश आहे. पृथ्वीराज कपूर यांच्या ‘पृथ्वी थिएटरमध्ये’ त्यांनी 14 वर्षे नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले.

    हेही वाचा – आले जल गेले जल झाले जल आरपार…

    1959 साली पतीच्या निधनानंतर जोहरा सहगल दिल्लीला स्थायिक झाल्या. तेथे नव्याने स्थापन झालेल्या नाट्य अकादमीच्या संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. जवळपास तीन वर्षे त्या पदावर त्यांनी काम केले. 1962 मध्ये त्यांना नाट्य शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्यांना लंडन येथे जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी भारतीय भरतनाट्यम् नर्तक आणि नृत्य दिग्दर्शक राम गोपाल संचालित भारतीय नृत्य आणि संगीत अकादमीमध्ये काही काळ नृत्य प्रशिक्षक म्हणून काम केले. तिथेच त्यांना इंग्रजी मालिकेद्वारे ब्रिटिश दूरचित्रवाणीवर पदार्पण करण्याची संधी मिळाली. शिवाय, काही इंग्रजी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.

    त्यांच्या नृत्यविषयक कारकीर्दीसाठी त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, त्यांच्या एकूणच कलाविषयक कार्याकरिता भारत शासनाकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. याशिवाय, त्यांना कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमीची फेलोशिप देण्यात आली. जोहरा सहगल यांचे चरित्र त्यांची मुलगी किरण सहगल यांनी फॅटी या नावाने लिहिलेले आहे. 10 जुलै 2014 रोजी वयाच्या 102 व्या वर्षी जोहरा सहगल यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – कामासाठी तुमच्यात चांगली ऊर्जा असेल. अगदी सकाळपासूनच सर्व कामे पटकन पूर्ण करावीशी वाटतील. मात्र सहकारी तुमच्या गतीशी जुळवून घेऊ शकणार  नाहीत, त्यामुळे चिडचिड होऊ शकते. थोडा संयम बाळगणे उत्तम. आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला आहे, पण घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका.

    वृषभ – आज दैनंदिन कामाचे थोडे दडपण आल्यासारखे वाटेल. मात्र तरीही काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. अगदी छोटे बदलसुद्धा तुमचा दिवस सकारात्मक करू शकतात. कामाचे वेळापत्रक बदलणे किंवा थोडा वेळ स्वतःसाठी बाजूला काढणे असा बदल आज अवश्य करून बघा. आर्थिक आणि करिअरशीसंबंधित स्थिरता प्राप्त होईल.

    मिथुन – आज एकाच वेळी अनेक कामे आणि गोष्टी समोर येऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक गोष्ट करावीशी वाटेल, पण तसे करायला जाऊ नका. जेवढी कामे हाताळू शकता, तेवढीच हाती घ्या. अन्यथा, थकवा आणि तणाव जाणवू शकतो. लहान लहान आर्थिक खर्चही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या.

    कर्क – आज तुमचे मन थोडे भावनिक बनू शकते. अगदी लहानसहान गोष्टींमुळेही तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. बाहेरून ठीक असल्याचे दाखवाल, पण आतून दुःखी असाल. स्वतःला थोडा वेळ देणे, हा यावरचा उत्तम उपाय आहे. शांत वातावरणात राहण्याला प्राधान्य द्या. गोष्टी हळूहळू हाताळणे अधिक चांगले ठरेल.

    सिंह – करिअरसाठी आजचा दिवस चांगला आहे, फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व टिकवून ठेवाल. सहकारी तुमची सर्व मते ऐकतील, त्यामुळे कामात उत्तम प्रगती होईल. मात्र, अहंकार आड येणार नाही याची काळजी घ्या. शांत आणि संयमी राहिल्याने अधिक मोठे फायदे मिळतील.

    कन्या – अंगावरच्या जबाबदाऱ्या खूप जास्त वाटू शकतात. कामाचा ताण असेल, पण तुम्ही तो सांभाळून घ्याल. जास्त तणावाखाली राहू नका. अधूनमधून विश्रांती घ्या. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला थोडे आनंदी वाटेल. संध्याकाळी एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला उपस्थित रहाल, याचा भविष्यात मोठा फायदा होईल.

    तुळ – छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल आणि हीच तुमची ताकद बनेल. हाती घेतलेल्या सगळ्याच कामांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येईल. मात्र, जास्त विचार करणे टाळा. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वतःला थकवू नका. हळूहळू कामे हतावेगळी करणे अधिक चांगले ठरेल.

    वृश्चिक – नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्याच जबाबदाऱ्या असतील. पण, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अतिजास्त विचार कराल. मात्र हे टाळणे आवश्यक आहे. त्याने ताण वाढू शकतो. त्याऐवजी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तब्येत सांभाळा. करिअर आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर स्थिरता असेल.

    हेही वाचा – एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    धनु – मन थोडे असंतुलित असेल. सर्वांना खूश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष कराल. आपले मत स्पष्टपणे मांडणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीवर तडजोड करण्याची गरज नाही. फक्त रागावर ताबा ठेवा, अन्यथा अडचणी वाढतील. काम नेहमीप्रमाणे सुरू राहील, फक्त संयम राखा.

    मकर – व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणच्या काही गोष्टी मनातच दाबून ठेवाल, अशी शक्यता आहे. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो. एखादी गोष्ट तुम्हाला स्वस्थता देत नसेल, तर त्यावर काम करून, उत्तर शोधून ती सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कौटुंबिक वातावरणही सामान्य राहू शकते.

    कुंभ – आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. मनात अनेक योजना येतील, पण त्या प्रत्यक्षात उतरवणे अधिक महत्त्वाचे आहे. केवळ विचार करून काही उपयोग होणार नाही. योजना निवडून त्याचे नियोजन करा, तर ती पूर्णत्वास जाईल. अशाने तुम्हाला समाधान मिळेल.

    मीन – मन थोडे अधिक संवेदनशील असेल. अगदी लहानसहान गोष्टीही त्रासदायक वाटू शकतात. त्यामुळे, शांत राहा आणि अनावश्यक संभाषण टाळा. अन्यथा त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतो. आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास, दिवस चांगला जाईल आणि विरोधकांच्या कारवाया निष्फळ ठरतील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 एप्रिल 2026

    April 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 एप्रिल 2026

    April 25, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    By प्राजक्ता काथेApril 26, 2026

    मेष या आठवड्यात घरात शांतता राहील. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी अनावश्यक…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 एप्रिल 2026

    April 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 एप्रिल 2026

    April 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 280
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 398
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 583
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.