Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 20, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 20 एप्रिल 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 30 चैत्र शके 1948; तिथि : तृतीया 07:27, चतुर्थी 28:15; नक्षत्र : रोहिणी 26:08;
    • योग : सौभाग्य 16:11; करण : वणिज 17:50;
    • सूर्य : मेष; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 18:56;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    विनायक चतुर्थी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    संतवाङ्मयाचे अभ्यासक सोनोपंत दांडेकर

    टीम अवांतर

    महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे भगवद्भक्त, श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि संतवाङ्मयाचे अभ्यासक सोनोपंत दांडेकर यांचा जन्म 20 एप्रिल 1896 रोजी ठाणे (आता पालघर) जिल्ह्यातील केळवे येथे झाला. त्यांचे मूळ नाव शंकर वामन दांडेकर. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतली. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे आणि जोग महाराज या दोन व्यक्तींच्या सहवासाचा सोनोपंतांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. पुढे त्यांना मुंबई विद्यापीठाची प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर ते गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा विषय घेऊन एम.ए. झाले.

    सोनोपंतांनी पुणे विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. याशिवाय अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. निवृत्तीनंतर त्यांनी नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. नेवासे येथील शंकराच्या मंदिरात ज्या एका खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली, ते मंदिर कालौघात पडले; परंतु तो खांब टिकून राहिला. त्या खांबाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी भव्य ज्ञानेश्वर मंदिर बांधले. याशिवाय त्यांनी पिंपळनेर येथील संत निळोबाराय मंदिर, पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिर आदी मंदिरांचा देखील जीर्णोद्धार केला.

    हेही वाचा – आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    ज्ञानेश्वरीची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन हे सोनोपंतांचे महत्त्वाचे योगदान होय. या ग्रंथाला त्यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना स्वतंत्र ग्रंथाच्या तोडीची आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या राजवाडे संशोधित प्रतीच्या संपादनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या समितीने ज्ञानेश्वरीची संशोधित आवृत्ती तयार केली. तिला सोनोपंतांची 150 पानांची प्रस्तावना असून ती सोनोपंतांची ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे.

    शिवाय त्यांनी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इत्यादी मौलिक ग्रंथ लिहिले. तसेच अनेक ग्रंथांचे संपादनही केले. संत-साहित्य प्रकाशन समितीवर त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. 9 जुलै 1968 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची स्मृती निरंतर राहावी म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर पालघरमधील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीची स्थापना करून महाविद्यालय सुरू केले आहे.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. काही कामे अपूर्ण सोडणे फायद्याचे ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. पूर्ण उत्साहाने काम कराल, फक्त घाई टाळा. हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. सरकारी कामाला उशीर होऊ शकतो. कुटुंबाबरोबर संध्याकाळ हलकीफुलकी बनवाल.

    वृषभ – आत्मविश्वासाने कामांना सुरुवात कराल. ही सकारात्मक ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास मोठे फायदे मिळतील. आईसोबतच्या संभाषणातून नवीन कल्पना सुचतील. घरी एखादी आनंदाची बातमी मिळेल. नवीन पाहुण्यांचे आगमन होणार असल्याची चिन्हे आहेत. दिवसाचा शेवट आर्थिकदृष्ट्या आश्वासक असेल.

    मिथुन – सावधपणे पावले उचलण्याचा दिवस आहे. व्यवसायातील एखाद्या अडचणीमुळे तुमचा ताण वाढू शकतो. पण जाणकारांचा सल्ला घेऊन त्यातून मार्ग काढता येईल. आजूबाजूच्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबतचा तुमचा सुरू असलेला वाद संभाषणातून सुटेल आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल.

    कर्क – आज तुम्हाला एखादी सकारात्मक बातमी ऐकायला मिळेल. संततीशी संबंधित समस्या सुटतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल, त्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. एखादी पार्टी किंवा समारंभाचे नियोजन केले जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी एखादी अनपेक्षित भेटवस्तू किंवा सन्मान मिळू शकतो.

    सिंह – एक बदल यशाचे दार उघडू शकतो. नोकरीच्या नवीन संधी मिळतील आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या व्यवसायासाठी कर्ज घेणे टाळा. विरोधकांच्या बोलण्याला भुलू नका. किरकोळ कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी शांत राहून मार्ग काढणे योग्य ठरेल.

    कन्या – आज आव्हाने तुमची परीक्षा घेतील. वडिलोपार्जित मालमत्तेमुळे फायदा होऊ शकतो, पण नवीन शत्रूही निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक गोड होतील. इतरांवर अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे वाटचाल करा.

    तुळ – सावधगिरीने निर्णय घेणे ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. छुपे प्रतिस्पर्धी व्यवसायात समस्या निर्माण करू शकतात. तुमची फसवणूक होऊ शकते. जोखीम असलेले निर्णय घेणे टाळा. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. मागील चुकांमधून शिका आणि पुढे वाटचाल करा.

    वृश्चिक – नोकरी करणाऱ्या जातकांना आनंदाची बातमी मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सांघिक प्रयत्नांमुळे यश मिळेल, पण दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणे महागात पडू शकते. आपल्या मुलांना दिलेली वचने पाळा‌. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, पथ्येपाणी सांभाळा.

    हेही वाचा – कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    धनु – आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. बँकिंग किंवा वित्त क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. जुनी कर्जे फेडण्याची संधी मिळेल. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. नवीन उपक्रमांचा काळजीपूर्वक विचार करा. बोलण्यावर ताबा ठेवा. अकारण वाद होऊ शकतो.

    मकर – आजचा दिवस प्रेम आणि संतुलनाचा आहे. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा आर्थिक नियोजन बिघडू शकते. आज व्यवसायात भागीदारीची संधी मिळू शकते. मात्र त्यावर विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. सही करण्यापूर्वी कागदपत्रे तपासून घ्या.

    कुंभ – जुन्या समस्यांवर उपाय शोधण्यात यश मिळेल. व्यवसायात बदल करणे टाळा, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन स्रोतांवर लक्ष केंद्रित करा. जबाबदाऱ्या गांभीर्याने घ्या. कोणालाही पैसे उधार देणे टाळा. वडिलांकडून एखादा सुखद धक्का मिळू शकतो.

    मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. भावंडांसोबत चांगला समन्वय राहील. प्रवासादरम्यान मौल्यवान माहिती मिळू शकते. मात्र निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून सावध रहा. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सुटतील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    By प्राजक्ता काथेApril 19, 2026

    मेष या आठवड्यात रवी मेष राशीमध्ये आला आहे. तो उच्चीचा असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तब्येत…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 272
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 391
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 563
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.