Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 17 एप्रिल 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 27 चैत्र शके 1948; तिथि : अमावस्या 17:22; नक्षत्र : रेवती 12:02;
    • योग : वैधृति 07:21, विष्कंभ 27:45; करण : चतुष्पाद 06:49, किंस्तुघ्न 27:48;
    • सूर्य : मेष; चंद्र : मीन 12:02; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 18:55;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    दर्श अमावस्या

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय बिलियर्ड्सपटू गीत सेठी

    टीम अवांतर

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकरपटू गीत श्रीराम सेठी यांचा जन्म 17 एप्रिल 1961 रोजी दिल्ली येथे एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबाद येथील सेंट झेवियर्स हायस्कूल तसेच महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी अहमदाबाद येथील बी. के. स्कूल या व्यवसाय–व्यवस्थापन संस्थेतून एमबीए ही पदवी संपादन केली.

    बिलियर्ड्समधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खेळाडू मायकेल फरेरा यांच्या उत्तुंग कामगिरीच्या काळातच सेठी यांनी या खेळातील आपली कारकीर्द सुरू केली. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. 1982मध्ये त्यांनी बिलियर्ड्सची राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आणि 1985मध्ये जागतिक हौशी बिलियर्ड्स स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. पुढे त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक अजिंक्यपदे मिळविली. जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स स्पर्धेत त्यांनी पाच वेळा (1992, 1993, 1995, 1998, 2006), तसेच जागतिक हौशी बिलियर्ड्स स्पर्धेत तीन वेळा (1985, 1987, 2001) विजेतेपद मिळविले. बँकॉक येथे झालेल्या तेराव्या आशियाई स्पर्धांत या खेळातील सांघिक सुवर्णपदक आणि एकेरीत रौप्यपदक मिळवले (1998). तर, चौदावी आशियाई स्पर्धा (2002, दक्षिण कोरिया) आणि पंधरावी आशियाई स्पर्धा (2006, कतार) यामध्ये त्यांनी अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझ पदकांची कमाई केली.

    हेही वाचा – पाप आणि पुण्य

    बिलियर्ड्सप्रमाणेच स्नूकरमध्येही त्यांनी सलग चार वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले (1985-88). सेठी यांच्या कामगिरीबद्दल पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, के. के. बिर्ला पुरस्कार इत्यादी. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांनी ‘सक्सेस व्हर्सेस जॉय’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले. भारतीय नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन आणि उत्तेजन देण्यासाठी त्यांनी विख्यात भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या सहयोगातून ‘ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट’ ही संस्था स्थापन केली.


    आजचे राशीभविष्य

    मेष – तुमच्यावर कामाचा भार जास्त असेल, परंतु प्रयत्न आणि कठोर परिश्रम यामुळे यश मिळेल, पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. त्यामुळे व्यवसायाच्या विस्तारासाठी योजना आखाल. आज वडिलोपार्जित मालमत्तेमधील वाटा देखील मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील, मात्र बाहेरचे खाणे टाळा.

    वृषभ – व्यवसायात चांगली वाढ होईल. परिणामी, कामाचा ताण जास्त असेल आणि खूप धावपळ करावी लागेल. अतिरिक्त श्रमामुळे थकवा जाणवेल. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा वादात अडकू शकता. धार्मिक यात्रेला जाण्याचा विचार करू शकता. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

    मिथुन – व्यावसायिक कामांमध्ये किरकोळ अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा, न्यायालयीन खटले टाळा. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. नोकरीच्या ठिकाणी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

    कर्क – व्यवसायात आर्थिक फायदा होईल. नोकरीत प्रगतीची संधी आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, पण सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि दिवस आनंदात जाईल‌. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आज नवीन वाहन किंवा कपडे अथवा दागिने याची खरेदी होऊ शकते.

    सिंह – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल, अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना बदलीसह पदोन्नती मिळू शकते, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे समाजात आदर वाढेल. आज आरोग्य चांगले राहील.

    कन्या – व्यवसायात यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन योजना आखू शकता. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. संततीच्या प्रगतीची बातमी मिळेल. आज नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

    तुळ – कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल, मात्र तुमच्या प्रयत्नांमुळे आणि मेहनतीमुळे यश मिळेल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल, पण अनावश्यक खर्चही वाढेल. अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे चिंता वाटू शकते. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कुटुंबातील सदस्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात.

    वृश्चिक – कामाच्या ठिकाणी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका, पूर्ण विचार करून किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरातील बाबींवर वडिलधाऱ्यांशी चर्चा करू शकता. कौटुंबिक वातावरण थोडे तणावपूर्ण असेल, मात्र तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

    धनु – व्यवसायात किरकोळ अडचणी येऊ शकतात, मात्र तुमच्या मेहनतीमुळे यश आणि आर्थिक लाभ मिळेल. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वादात अडकू शकता. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, परंतु कोणीही नाराज होणार नाही याची काळजी घ्या. काळजीपूर्वक वाहन चालवा.

    हेही वाचा – Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    मकर – व्यवसायात चांगली वाढ होईल तर नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त असेल, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नातेवाईकांच्या घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळू शकते. तिथे इतर कुटुंबीयांना भेटून आनंद होईल.

    कुंभ – व्यवसायात अडचणी येऊ शकतात. मात्र, घाई न करता, शांतपणे त्यातून मार्ग काढा. अनावश्यक खर्च वाढेल, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ शकते. धार्मिक आणि सामाजिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, परंतु आपल्या शब्दांनी कोणालाही दुखवू नये याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.

    मीन – व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आज केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना यश मिळेल. एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरुवात करू शकता. नोकरदारांच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश होतील. आज रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे,  कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 16, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 एप्रिल 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 26…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.