Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 13, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 13 एप्रिल 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 23 चैत्र शके 1948; तिथि : एकादशी 25:08; नक्षत्र : धनिष्ठा 16:02;
    • योग : शुभ 17:15; करण : बव 13:18;
    • सूर्य : मीन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:54;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वरूथिनी एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिन विशेष

    मराठी संशोधक आणि लेखक अनंत प्रियोळकर

    टीम अवांतर

    श्रेष्ठ मराठी संशोधक आणि लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 रोजी गोव्यातील प्रियोळ गावी झाला. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले. 1923मध्ये मराठी हा विषय घेऊन ते मुंबई विद्यापीठातून बीए झाले. काही काळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मुंबई नगरपालिकेत ते रुजू झाले. ही नोकरी सांभाळून विविधज्ञानविस्ताराच्या संपादकीय खात्यात ते काम करीत होते.

    1948 साली ‘मराठी संशोधन मंडळा’च्या उपसंचालकपदी त्यांची नेमणूक झाली. तर, 1950पासून ते या मंडळाचे संचालक झाले. मंडळाचे संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी मराठी संशोधन पत्रिका हे त्रैमासिक ते प्रकाशित करू लागले. मंडळाच्या संचालकपदावरून 1966च्या अखेरीस ते निवृत्त झाले. या मंडळाच्या माध्यमातून मराठी संशोधनकार्याला त्यांनी निश्चित स्वरूपाची बैठक दिली आणि गतीही आणली.

    हेही वाचा – शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    प्रियोळकरांनी साक्षेपीपणे संपादिलेल्या विविध ग्रंथांत रघुनाथपंडितकृत दमयंती स्वयंवर आणि मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व (खंड 1 ते 4) हे विशेष उल्लेखनीय होत. त्यांच्या अन्य संपादित ग्रथांत जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके आणि बाळशास्त्री घगवे या शास्त्रीत्रयाने रचिलेले महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, प्रा. केरूनाना छत्रे यांची टिपणवही, परशुरामपंततात्या गोडबोले यांच्या नवनीताचा पहिला आणि दुसरा भाग तसेच लोकहितवादीकृत निबंधसंग्रह (प्रथमांश) याचा समावेश होतो.

    काही ख्रिस्ती मराठी साहित्यही त्यांनी संपादिले आहे. त्यात पाद्री टॉमस स्टीव्हेंझकृत दौत्रिम क्रिस्तां, सेंट पीटरच्या जीवनावर एका फ्रेंच जेझुइटाने लिहिलेले मराठी पुराण (3 सर्ग), तसेच फादर अँटोनिओ द साल्दॅन्या याने लिहिलेली सांतु आंतोनिची जिवित्वकथा यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मराठी मुद्रणकलेच्या आरंभकालातील मराठी ग्रंथांची यादी मराठी दोलामुद्रिते या नावाने त्यांनी केली आहे. ग्रंथसंपादनाबरोबरच मौलिक असे इंग्रजी-मराठी ग्रंथलेखनही प्रियोळकरांनी केलेले आहे. द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया, गोवा री-डिस्कव्हर्ड, द गोवा इंक्विझिशन, ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली हे असे काही ग्रंथ होत.

    एक श्रेष्ठ संशोधक म्हणून प्रियोळकर प्रसिद्ध असले, तरी आरंभी त्यांनी कविता, कादंबरी असे काही ललित लेखन केलेले आहे. प्रिय आणि अप्रिय या त्यांच्या लेखनसंग्रहातूनही लालित्याचा प्रत्यय येतो. आयुष्याच्या अखेरीअखेरीस त्यांनी आपले आत्मचरित्र लिहावयास घेतले होते. या आत्मचरित्रात 1925 पर्यंतचाच काळ आला आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे पुढील भाग ते लिहू शकले नाहीत. डॉ. सुभाष भेंडे संपादित अ. का. प्रियोळकर स्मृतिग्रंथात हे आत्मचरित्र समाविष्ट आहे. 1951 साली कारवार येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 13 एप्रिल 1973 मुंबई येथे त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – व्यावसायिकांना दिवस थोडा संथ वाटेल, पण तरीही ते त्यांच्या मागील प्रकल्पांमधून चांगला नफा मिळवू शकतील. भागीदारीत कोणतेही काम करणे श्रेयस्कर ठरेल. नोकरदार जातकांना त्यांच्या कामातील क्षमतेशी जुळणारे काम मिळाल्याने आनंद होईल. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक उजळेल. तब्येतीच्या किरकोळ कुरबुरी राहतील.

    वृषभ – आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. कामाच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ नका, ते हानिकारक ठरू शकते. व्यावसायिकांनीही नव्या प्रस्तावांचा नीट अभ्यास करावा आणि स्पष्ट निर्णय कळवावा. गाडी चालवताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी पालकांचा सल्ला उपयुक्त ठरेल. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

    मिथुन – कुटुंबात एखादी शुभ घटना आनंद देऊन जाईल. सर्वांकडून आदर मिळेल. एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित केले तरच तुमचे काम पूर्ण होईल. नोकरदार जातकांमध्ये नेतृत्व कौशल्ये अधिक विकसित होतील, वरिष्ठांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. जुन्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. व्यावसायिकांची प्रतिष्ठा वाढेल, व्यवसायात नवीन धोरणे अवलंबली जातील. परदेशी व्यवहारांमधून अधिक पैसे कमवाल.

    कर्क – जोखमीचे आर्थिक व्यवहार करणे टाळा, कारण त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे, कारण त्यामुळे तुमच्याच अडचणी वाढतील. बाहेरील व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे टाळा. आज काही नवीन लोकांशी ओळख होईल, जी फायदेशीर ठरेल. नोकरदार जातकांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे त्यांना कामे वेळेवर पूर्ण करण्यास मदत होईल.

    सिंह – आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा आहे. व्यावसायिक नवीन प्रकल्पांचा पुरेपूर फायदा घेऊ शकतील, त्यामुळे बँक खात्यातील शिल्लक लक्षणीयरीत्या वाढेल. कामाच्या ठिकाणी, कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. एखादे प्रलंबित काम आज पूर्ण होऊ शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील, सर्वांना सोबत आणण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा आणि साथ मिळेल.

    कन्या – आज सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. काही महत्त्वाच्या कामांसाठी घाई करावी लागेल, तरच ती पूर्ण होतील. कुटुंबातील सुरू असलेल्या समस्या बाहेरच्या लोकांना सांगू नका, कारण ते त्याचा गैरफायदा घेतील. व्यावसायिक आणि उद्योजक आपापल्या क्षेत्रात प्रगती साधतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींपासून दिलासा मिळेल.

    तुळ – तुमचे धैर्य वाढेल, ज्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्यास आणि अधिक पैसे कमावण्यास मदत होईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. तिथे महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळेल. आजव्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. प्रतिस्पर्धकांनाही कडवी टक्कर देऊ शकाल. तुम्ही संध्याकाळ एखाद्या धार्मिक स्थळी घालवाल.

    वृश्चिक – कुटुंबातील सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने वातावरण सुखद राहील. एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळू शकते. बाहेरच्या काही व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सुधारण्यातही तुम्हाला यश मिळेल. आज कोणतेही काम पूर्ण आत्मविश्वासानेच हाती घेतले पाहिजे, तरच ते पूर्ण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो.

    धनु – नोकरदार जातक सृजनशील कामात पूर्ण रस दाखवतील आणि वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करतील. तुम्ही कोणाला वचन दिले असेल, तर ते आज पूर्ण करण्यात यश मिळेल. व्यावसायिकांना त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. घरात धार्मिक वातावरण राहील.

    हेही वाचा – IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    मकर – समाजकार्यातील आवड वाढेल आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. वाढता खर्च नियंत्रणात ठेवा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक कामासाठी दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. घाईने निर्णय घेणे टाळा, त्यामुळे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील वातावारण आनंदी राहील. तब्येतीची काळजी घ्या, पथ्ये पाळा.

    कुंभ – कामाच्या ठिकाणी काही नवीन स्रोतांकडून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जीवनातील ज्या समस्या बऱ्याच काळापासून त्रास देत आहेत, त्या आज सुटतील. काही प्रलंबित बाबी त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे त्या वेळेवर पूर्ण करणे हिताचे ठरेल. सरकारी मदतीचा पुरेपूर फायदा घ्याल. एका जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. मित्रांसोबत सहलीचे नियोजन करू शकता.

    मीन – उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे, तर बजेट व्यवस्थित राहील. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात, परंतु वरिष्ठांच्या मदतीने त्यावर मात करू शकाल. अनोळखी लोकांना भेटताना सावधगिरी बाळगा आणि कोणतीही माहिती उघड करणे टाळा. सकारात्मक विचारांचा मोठा फायदा होईल. महिलांना माहेरकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळू शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    By प्राजक्ता काथेApril 12, 2026

    मेष रागावर नियंत्रण ठेवा या आठवड्यात 15 तारखेला रवी मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 266
    • अवांतर 181
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 383
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 550
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.