Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!
    फूड काॅर्नर

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरApril 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किchicचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेख, चिवळीची भाजी, विदर्भ स्पेशल चिवळी, उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी, चिवळीच्या भाजीची रेसिपी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात. परंतु विदर्भातील लोक या दोन भाज्यांमधील फरक अचूक ओळखतात. चिवळीची पाने एकदम बारीक आणि आकाराने तांदळाच्या दाण्यांएवढी असतात. याची देठे लालसर गुलाबी आणि एकदम गवताच्या काड्यांसारखी असतात. याची पाने मऊसर आणि पाण्याने भरलेली असल्याने स्पर्शाला एकदम नरम तसेच थंड असतात. त्यामुळे पूर्वी बऱ्याच गावांमध्ये जेव्हा कूलर, एसी नव्हते, त्या काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका मोठ्या दुरडीत म्हणजे बांबूच्या टोपलीत ही चिवळ भाजी पसरवून घेत आणि त्यावर नरम सुती कापडाची किंवा साडी / पातळाची अथवा धोतराची चौघडी अंथरवून त्यावर लहान बाळांना ठेवत असत. कारण, ही भाजी मुळातच स्पर्शाला थंड असल्याने त्यावर त्या लहान बाळांना निजवले की, त्यांना गरमीचा त्रास होत नसे. याचसारखी घोळीची भाजी आहे. घोळीची पाने आकाराने मेथीच्या पानांसारखी गोलसर असतात आणि स्पर्शाला थंड आणि मऊ असतात. या भाजीचे देठ देखील थोडे जाडसर पण नरम आणि गुलाबी पांढरट रंगाचे असते. विशेष म्हणजे, या दोन्ही भाज्यांची लागवड करावी लागत नाही तर, या भाज्या शेतामध्ये आपोआप उगवतात आणि त्या गवतासारख्या पसरतात. यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

    पोटाला थंड आणि पौष्टिक असल्याने विदर्भातील लोक उन्हाळ्यात चिवळ आणि घोळ या भाज्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करतात. चिवळची भाजी सहसा कांदा आणि बेसन वापरून करतात, चिवळच्या भाजीचे मुटके देखील छान लागतात. घोळीची भाजी कैरीचा वापर करुन तुरीच्या वरणा सोबत आंबटगोड चवीची केली जाते. तसेच, कैरी टाकून या भाजीचा झुणका देखील छान होतो. या दिवसांत चिवळची भाजी, घोळीचे वरण किंवा झुणका, कैरी लोणचे आणि भाकरी, ठेचा किंवा लाल मिरच्यांची चटणी हे विशेष जेवण मानले जाते. मुंबई, पुणे या ठिकाणी चिवळ व घोळ या भाज्या मिळत नसल्याने तेथील लोकांना या भाज्यांचा परीचय बहुतेक नसावा आणि जरी तिकडे या भाज्या मिळत असल्या तरी यांचे प्रमाण कमी असावे असे वाटते. कदाचित या भाज्यांची पर्यायी नावे देखील वेगळी असू शकतात.

    साहित्य

    • चिवळी – पाव किलो
    • बेसन – अर्धी वाटी
    • कांदे – 2
    • हिरव्या मिरच्या – 2,
    • तिखट – दोन चमचे
    • हळद – एक चमचा
    • मोहरी – एक लहान चमचा
    • जिरे – एक लहान चमचा
    • हिंग – अर्धा चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – एक पळीभर
    • पाणी – अर्धी वाटी (किंवा गरजेनुसार)

    हेही वाचा – Recipe :  अतिशय स्वादिष्ट वांगे बुरानी!

    कृती

    1. चाळणीमध्ये चिवळी घेऊन नळाच्या वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. असे केल्याने त्यामधील काडी कचरा आणि बारीक माती निघून जाईल.
    2. धुतलेली चिवळी कोरड्या कापडावर टाकून वाळवून घ्यावी आणि त्यानंतर चिरावी. कापडावर वाळवल्याने चिवळी चिरायला सोपी जाते.
    3. मिरच्या आणि दोन कांदे बारीक चिरून घ्यावे.
    4. कढईत एक पळीभर तेल घेऊन मंद आचेवर ठेवावे. नंतर मोहरी, जिरे टाकून ते तडतडल्यावर त्यात अर्धा चमचा हिंग टाकून बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकून ते थोडे परतून घ्यावे.
    5. कांदा थोडा अर्धवट परतला की, त्यात एक चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करावे.
    6. नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली चिवळी टाकावी आणि गरजेनुसार हातावर पाणी घेऊन ते त्या भाजीवर शिंपडून चिवळी मंद आचेवर शिजवून घ्यावी.चिवळीला पाणी सुटत असल्याने ही भाजी शिजवण्याकरता जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे बेताने पाणी वापरावे.
    7. भाजी थोडी वाफवल्यावर त्यामध्ये एका हाताने वरून बेसन पेरत घालावे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने भाजी घोटत रहावी.
    8. अशा प्रकारे भाजी बेसनासोबत एकत्र कालवून मंद आचेवर वाफवून घ्यावी.
    9. पाच ते सात मिनिटांत चविष्ट अशी चिवळीची भाजी तयार होते. हवं तर याला चिवळीचा झुणका म्हणू शकता.

    हेही वाचा – Recipe : शॅलोट्सचे चटपटीत लोणचे!

    टीप्स

    उन्हाळ्यात चिवळीची भाजी ज्वारीची भाकरी, सुक्या लाल मिरच्यांची लसणाची चटणी आणि कांदा, कैरीच्या लोणच्या सोबत मस्त लागते.

    कधीकधी चिवळीच्या भाजी सोबत भाकरी न करता घडीची पोळी करून त्यासोबत आंब्याचा रस आणि कुरडई, पापड, भजी असापण जेवणाचा बेत करतात.


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    By Team AvaantarApril 11, 2026

    साहित्य मैदा – दोन वाट्या मुगाची डाळ – दोन वाट्या काजू – एक लहान वाटी…

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 265
    • अवांतर 180
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 3
    • पंचांग आणि भविष्य 382
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 549
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    April 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.