Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 12 एप्रिल 2026; वार : रविवार

    भारतीय सौर : 22 चैत्र शके 1948; तिथि : दशमी 25:16; नक्षत्र : श्रवण 15:13;

    योग : साध्य 18:14; करण : वणिज 13:02;

    सूर्य : मीन; चंद्र : मकर 27:44; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:54;

    पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;

    शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे

    टीम अवांतर

    अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न लेखक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे यांचे बालपण विदर्भात गेले आणि नागपूरला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास झाला. त्यांना वाचनाचे विलक्षण वेड होते, या वाचनामुळेच त्यंच्यातील वाङ्‍मयाभिरूचीचे पोषण झाले. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली आणि आपल्या लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला.

    हेही वाचा – एक थी बुलबुल…

    कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इत्यादी विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. प्रथमपुरूषी एकवचनी हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध असून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली, हे याद्वारे समोर येते.

    रक्त आणि अश्रू हा त्यांचा लेखसंग्रह मराठी निबंधवाङ्‍मयाताही अद्वितीय असा आहे. वाघनखे, विठ्ठला पांडुरंगा, अमरवेल, रांगोळी इत्यादी त्यांचे चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्मरणी हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही उल्लेखनीय आहे.

    त्यांचे एकूण 27 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘सतरावे वर्ष’, ‘सीमेवर’, ‘सावल्या’, ‘काळ, काम आणि वेग’, ‘ स्वप्‍न’, ‘ ध्यास’, ‘मुक्ती’, ‘रूप’, ‘प्रतारणा’, ‘पुतळा’, ‘दुःख’, ‘फुलवा’, ‘पहिले पाप’, ‘संगम’, ‘घायाळ’, ‘नौका’ यासारख्या अप्रतिम कथा लिहून भावे यांनी मराठी कथासृष्टीत आपले नाव अजरामर केले आहे. भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या नौका या कथासंग्रहातील कथा तर जीवनातील तारूण्याचे आणि कारूण्याचे, शाश्वतेचे आणि नश्वरतेचे ते सारख्याच समरसतेने चित्रण करतात. ‘आइसक्रीम’ ही त्यांची विनोदी कथा दृष्टीने उल्लेखनीय आहे.

    अकुलिना आणि वर्षांव यासारख्या कादंबऱ्यांतून ते स्त्रीव्यवथेचे विलक्षण हळुवारपणे चित्रण करतात. अडीच अक्षरे या कादंबरीतून प्रेमभावनेचे विविध पदर उलगडून दाखवणारे भावे आग, रोहिणी, पिंजरा, मागं वळून, सायंकाळ, व्याध, रखमाच्या मुली इत्यादी कादंबऱ्यातून मानवी विकारविलसिताचे तसेच नियतीच्या प्रभावाचे अप्रतिम चित्रण करतात. त्यांच्या एकूण 19 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.

    हेही वाचा – योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    नाटककार म्हणूनही भावे यांनी लौकिक प्राप्त केला होता. विषकन्या, स्वामिनी, महाराणी पद्मिनी ही त्यांची गाजलेली नाटके. सौभाग्य आणि माझा होशील का? या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या. उत्तर-दिग्विजय आणि चितोड यात्रा ही त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत.

    पु. भा. भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. हिंदूमहासभेचे ते काही काळ सक्रिय कार्यकर्तेही होते. महात्मा गांधी तसेच काँग्रेस पक्षाच्या धोरणावरही भावे यांनी कडाडून हल्ला केला आहे. भावे सनातन भारतीय संस्कृतीचे तसेच जीवनमूल्यांचे उपासक असले, तरी कर्मठ नव्हते. स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतानाच ते स्वैराचारावर टीका करीत. हिंदू समाजाच्या ऐक्याला विघातक अशा जातिभेदादी गोष्टींवर टीका करीत.

    अहमदनगर येथे 1964 साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून नाट्यरसिकांनी भाव्यांच्या नाट्यसेवेचे कौतुक केले होते. तर, पुणे येथे 1977 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. 13 ऑगस्ट 1980 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 11, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 एप्रिल 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 21…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 381
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 193
    • मैत्रीण 18
    • ललित 549
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 12 एप्रिल 2026

    April 12, 2026

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.