Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    न चुकलेली बस…

    April 6, 2026

    देखल्या देवा…

    April 6, 2026

    Dnyaneshwari : मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी…

    April 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » देखल्या देवा…
    ललित

    देखल्या देवा…

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेApril 6, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, देवभोळा प्रवासी, देवभोळा लोकल प्रवासी, देवभोळा मुंबईकर, मुंबईकरांचा लोकल प्रवास, मुंबई लोकल प्रवासी, मुंबईकरांचा उलटा प्रवास, देखल्या देवा दंडवत,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज down/up केलं लोकलसाठी. म्हणजे ठाकुर्लीला चढून, कल्याणकडे जाणाऱ्या गाडीत बसून परतीचा प्रवास केला. थोडा वेळ जास्त जातो, पण हमखास बसून प्रवासाची खात्री असते. वाचायला छान वेळ मिळतो… मुंबईचा प्रवास असला की, मी बऱ्याचदा ही पद्धत अवलंबतो. बरेच असे प्रवासी असतात माझ्यासारखे. अर्थात, शिरस्त्याप्रमाणे मुलुंड किंवा भांडुपला आपण उभं राहून दुसऱ्याला जागा देऊन थोडा परोपकार पण करायचा असतो, तोही मी नियमितपणे करतो. शिणलेले सगळेच असतात! थोडा वेळ बसायला जागा मिळाली की, सगळ्यांनाच बरं वाटतं, तेवढंच.

    आज मला मस्त खिडकीची जागा मिळाली. समोर एक पस्तिशीचा तरुण बसला होता. कपाळावर छान चंदनाचा टिळा होता. बॅगा वगैरे रॅकवर ठेवून आम्ही स्थानापन्न झालो… त्याने खिशातून एक कसलंतरी स्तोत्रांचं पुस्तक काढलं… शिस्तीत ते कपाळाला लावून वंदन केलं आणि भक्तिभावाने ते पुटपुटत वाचण्यात गुंग होऊन गेला. ठाकुर्लीहून कल्याणला पोहोचायला साधारण सात-आठ मिनिटं लागतात, तेवढ्या वेळात त्याची त्या छोटेखानी पुस्तकाची दोन-तीन तरी पारायणं झाली असतील…

    मी सुद्धा पुस्तक वाचत होतो, पण मधे मधे उगाचच त्याच्याकडे लक्ष जात होतं, का कोणास ठाऊक? कल्याणला गाडी पाचएक मिनिटं थांबते, तशी थांबून निघाली. त्याची स्तोत्र वाचनाची पाटी टाकून झाली होती बहुतेक! पुस्तक घडी घालून शर्टाच्या खिशात गेलं आणि मोबाइल नामक राक्षस हातात आला… पापक्षालन झालं होतं, त्यामुळे तो निवांतला होता. आम्ही मुंबईला जाताना डाव्या बाजूला बसलो होतो. गाडी ठाकुर्लीला आली. माणसं चढली. आता गर्दी वाढत जाणार होती पुढे…

    हेही वाचा – केल्याने होत आहे रे!

    ठाकुर्ली आणि डोंबिवलीच्या मधे डोंबिवलीचं ग्रामदैवत म्हणजे गणपती मंदिर दिसतं. समोरच्यानं अगदी लीन होऊन नमस्कार केला गणरायाला. बरेच जण करतात. मीही केला. प्रसन्न वाटतं, ते छान देऊळ आणि त्याचा सुबक कळस दिसला की… डोंबिवली सुटल्यावर स्वामीनारायण मंदिर दिसतं. उजवा हात कपाळावर आणि ओठावर असं करत त्या देवळाला द्रुतगती नमस्कार झाला, डोळे मिटून… हा दुसरा नमस्कार आणि मग मात्र येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या देवळाला, अगदी शेंदूर फासलेल्या दगडाला सुद्धा नमस्कार घडायला लागला…

    त्याला मार्गातला प्रत्येक देव आणि देऊळ ठाऊक होतं बहुतेक! मुंब्रा आल्यावर लांब डोंगरावर दिसणाऱ्या देवळाला नमस्कार झाला. मी चकित होऊन बघत होतो…

    एका देवाला भक्तिभावाने केलेला प्रणाम त्याला पुरत नव्हता. वाटेतल्या प्रत्येक देवाला द्रुतगती नमस्कार करून तो अधिकचं पुण्य गाठीशी बांधायचा केविलवाणा प्रयास करत होता. एकदा वाटलं हटकावं त्याला, पण आवर घातला मनाला. उगाचच दुसऱ्याच्या खासगी गोष्टीत आपण का ढवळाढवळ करा, म्हणून गप्प बसलो.

    हे असे नमुने हल्ली जागोजाग, अगदी रस्त्याने चालताना सुद्धा दिसतात. हा मानसिक रोग की, सतत जाणवणाऱ्या असुरक्षिततेला काडीचा आधार?

    हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस

    भाव असावा मनात, पण त्याचा हा असा अनिर्बंध अतिरेक झाला की, पाचपोच सुटतो आणि प्रतिक्षिप्त क्रियेसारखा,  दिसला देव की घाल नमस्कार अशी वेडगळ परिस्थिती उद्भवते. कुठेतरी बांध हवाच याला. गरज असली तर, मानसोपचार घ्यायला लागला तरी हरकत नाही! पण हे असं विक्षिप्त वागणं थांबायला हवं मुळातच.

    विक्रोळी येईपर्यंत हा प्रकार सुरू होता. विक्रोळीला महाशय उतरले आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. माझ्या पुस्तकात मी मान आणि मन खुपसलं आणि वाचनात गढून गेलो, घडलेला घटनाक्रम विसरायचा प्रामाणिक प्रयत्न करत…

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    न चुकलेली बस…

    April 6, 2026 ललित

    शिवने रामकडे काय कबुली दिली?

    April 5, 2026 ललित

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    April 4, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    न चुकलेली बस…

    By सतीश बर्वेApril 6, 2026

    उत्तरार्ध श्रीनिवास आणि त्याची होणारी बायको आरती मला भेटले तेव्हा श्रीनिवासने मला कडाडून मिठी मारली.…

    शिवने रामकडे काय कबुली दिली?

    April 5, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    April 4, 2026

    आपल्यांचा आपलेपणा…

    April 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    न चुकलेली बस…

    April 6, 2026

    देखल्या देवा…

    April 6, 2026

    Dnyaneshwari : मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी…

    April 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 एप्रिल 2026

    April 6, 2026

    अजिंक्य रहाणेला ठरवून केले जातंय का टार्गेट?

    April 5, 2026

    शिवने रामकडे काय कबुली दिली?

    April 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 259
    • अवांतर 181
    • आरोग्य 97
    • पंचांग आणि भविष्य 376
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 191
    • मैत्रीण 17
    • ललित 536
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    न चुकलेली बस…

    April 6, 2026

    देखल्या देवा…

    April 6, 2026

    Dnyaneshwari : मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी…

    April 6, 2026
    Most Popular

    न चुकलेली बस…

    April 6, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.