दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 एप्रिल 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 12 चैत्र शके 1948; तिथि : पौर्णिमा 07:41; नक्षत्र : हस्त 17:38;
- योग : ध्रुव 14:19; करण : बालव 20:08;
- सूर्य : मीन; चंद्र : कन्या : 30:28; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:52;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
हनुमान जयंती
वैशाख स्नानारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
मराठी भावगीत गायक आणि संगीतकार गजानन वाटवे
टीम अवांतर
मराठी भावगीत गायक आणि संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्म 8 जून 1917 रोजी बेळगाव येथे झाला. गाण्याच्या आवडीमुळे बेळगाव सोडून ते पुण्यात आले. अर्थार्जनाकरिता त्यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये गायनाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यांचा गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम 1938 साली फर्ग्युसन महाविद्यालयात झाला. तर, 1939 मध्ये त्यांना मुंबई आकाशवाणीवर गायनाचा कार्यक्रम करण्याची संधीही मिळाली. याचवर्षी त्यांची ‘वारा फोफावला’ ही ध्वनिमुद्रिका एचएमव्हीने काढली. ही पहिलीच ध्वनिमुद्रिका खूप गाजली. यानंतर त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या.
गजानन वाटवे यांनी केशवसुत, गिरीश, माधव जुलियन, यशवंत, कुसुमाग्रज, सुरेश भट, गदिमा, राजा बढे, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, श्रीनिवास खारकर आदी प्रतिभावंतांच्या दर्जेदार भावकविता अत्यंत सुरेल चालीत बांधल्या आणि त्या रसिकांसमोर पेश केल्या. त्यांचे काव्यगायनाचे कार्यक्रमही खूप गाजले. त्यांनी जवळपास 2 हजारांपेक्षाही अधिक गीते स्वरबद्ध केली, त्यापैकी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या गीतांमध्ये रामाला गं चंद्र हवा, हीच राघवा हीच पैंजणे, मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला, झुंजू मुंजू झालं, निरांजन पडले तबकात, दोन ध्रुवावर दोघे आपण, चंद्रावरती दोन गुलाब, घट तिचा रिकामा, प्रीत तुझी माझी, ही गीते विशेष गाजली. दहा वाजता या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन देखील केले.
हेही वाचा – ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!
वाटवे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मालती पांडे, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, ज्योत्स्ना भोळे, कुमुदिनी पेडणेकर यांनी गायली आहेत. आपल्या सुरेल गायनाने त्यांनी मराठीतील अर्थघन भावगीतांना वेगळी उंची प्राप्त करून दिली. ते स्वत:ची ओळख काव्यगायक अशी करून देत असत. त्यांनी भावगीत या गायनप्रकाराचा प्रसार केला आणि सुगम संगीताला मैफलीचा दर्जा मिळवून दिला.
गजानन वाटवे यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’, वसंतराव नाईक पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार, युगप्रवर्तक पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. पुणे येथे 12 डिसेंबर 1967 रोजी झालेल्या भावगीत गायक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गगनी उगवला सायंतारा हे त्यांचे आत्मचरित्र देखील वाचकप्रिय ठरले. 2 एप्रिल 2009 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आज कामाच्या ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. सहकाऱ्यांसोबत समन्वय सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल. आर्थिक कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. सेवा क्षेत्रातील तुमची कामगिरी प्रशंसनीय असेल. नियम आणि शिस्तीचे काटेकोरपणे पालन करा. व्यावसायाच्या योजना वेगाने पुढे घेऊन जाल. व्यावसायिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे शहाणपणाचे आहे.
वृषभ – आज शैक्षणिक बाबींमध्ये खूप सक्रिय राहाल. कार्यक्षमता सुधारेल, आर्थिक लाभ वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांमध्ये रुची निर्माण होईल परीक्षा आणि स्पर्धांमधील तुमची कामगिरी सुधारेल. व्यावसायिक बाबींमध्ये पुढाकार घ्याल. नकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिभा नवीन पदे मिळवून देण्यास मदत करेल.
मिथुन – आज कौटुंबिक संबंधांमध्ये आल्हाददायक वातावरण टिकवून ठेवण्याची गरज आहे. प्रियजनांच्या चिंतांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्याशी संवाद साधा. प्रत्येकाशी आदर आणि सन्मानाने वागल्यास सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. प्रियजनांसोबत महत्त्वाच्या गोष्टी शेअर कराल. नफ्याचे प्रमाण स्थिर राहील.
कर्क – आज साहसी कार्य करण्याकडे कल असेल. धैर्याने आणि पुढाकाराने सर्वांना प्रभावित कराल. व्यावसायिक चर्चांमध्ये आघाडीवर असाल. सामाजिक कार्यांमधील सहभाग वाढेल. तुमच्यातील क्षमता आणि अनुभव खूप फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या बाबींना गती द्याल, त्यामुळे व्यावसायिक दौरे यशस्वी होतील. आळस पूर्णपणे सोडून कार्यप्रणाली व्यवस्थापन सुधारा.
सिंह – आज उत्साहाचे वातावरण राहील. कौटुंबिक बाबींमध्ये अधिक रस घेऊन कामे हातावेगळी कराल. नोकरीचे आकर्षक प्रस्ताव येतील. रक्ताचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. व्यावसायिक करारांना गती मिळेल. भागीदारांमध्ये परस्पर विश्वास आणि चांगले वर्तन टिकवून ठेवा. घरी एखाद्या प्रिय व्यक्तीचे आगमन होईल. यामुळे घरातील वातावरण आनंदी बनेल.
कन्या – आज सर्जनशील कामांमध्ये प्रभावीपणे कामगिरी कराल. कामाच्या ठिकाणी सुधारणांची स्पष्ट चिन्हे दिसतील. व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि सौम्यता टिकवून ठेवा. नवनिर्मितीवर भर दिल्याने स्मरणशक्ती तल्लख होईल. मात्र आज तुमच्या बजेटला चिकटून राहा, अनावश्यक खर्च टाळा. सहकाऱ्यांचा विश्वास संपादन कराल.
तुळ – आज महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा. व्यवस्थेच्या सूचनांचे पालन करा तसेच, नम्रता आणि संयम बाळगा. आज लांबचा प्रवास संभवतो, तिथे होणाऱ्या गाठीभेटी फलदायी ठरतील. तथापि, कोणत्याही वादात अडकू नका, व्यवसायाची शिस्त राखा. समाजकार्यात रस घ्याल. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरीने पुढे जा.
वृश्चिक – आज व्यवसायातील यश अपेक्षेपेक्षा चांगले असेल. आर्थिक संधींचा फायदा घेण्यासाठी पुढाकार घ्याल. व्यावसायिक बाबींमध्ये तुमचा प्रभाव राहील, त्यामुळे तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
धनु – आज, व्यावसायिक अपेक्षा पूर्ण होतील. फायदेशीर योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा दिवस योग्य ठरेल. व्यवस्थापनावर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल. प्रशासकीय बाबींना गती मिळेल, ज्यामुळे नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल. तुमच्या कागदपत्रांच्या कामाबाबत जागरूक रहा, व्यवस्थित पडताळणी करा.
हेही वाचा – लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर
मकर – आज भाग्याचा पुरेपूर फायदा होईल. आधी घेतलेल्या कष्टांमुळे आता मिळणारे अपेक्षित परिणाम पाहून खूप आनंद होईल. तुमच्या करिअर आणि व्यवसायात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. वडीलधाऱ्यांचा पाठिंबा आणि सहकार्य तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. तुमचा प्रभाव वाढेल आणि वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. सर्वांना सोबत घेऊन जा.
कुंभ – आरोग्याशी संबंधित बाबींकडे दुर्लक्ष करू नका. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून मिळणारे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. प्रवासादरम्यान विशेष खबरदारी घ्या आणि सामान, पैसे सांभाळा. आज विरोधकांपासून सावध रहा. शिस्त आणि दक्षता आव्हानांवर मात करण्यास मदत करतील.
मीन – आज महत्त्वाच्या कामांना गती मिळेल, ज्यामुळे उत्साह वाढेल. उत्साहाच्या भरात चुकीचे निर्णय घेणे टाळा. कामात संतुलित गती ठेवा. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी नम्रतेचा वापर करा. इतरांशी तुमचे संबंध सुधारतील.


