Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 एप्रिल 2026

    April 2, 2026

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 1, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवों । आपणपेयां ॥197॥ जन्ममृत्यूंची भाख । हारपोनी जाय निःशेख । आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे ॥198॥ मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे । तें तुज देतां चित्त माझें । पुरे म्हणों न शके ॥199॥ तवं तुझें नामचि जी आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगसी सुरवाडें । आनंदाचेनि ॥200॥ आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें । तरि येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ॥201॥ हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा । कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ॥202॥ तुंवा स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिलें । आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मा ॥203॥ या पार्थाचिया बोला । सर्वांगें कृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥204॥ ऐसा पतिकराचिया तोषाआंतु । प्रेमाचा वेग उचंबळतु । तो सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले ॥205॥

    श्रीभगवानुवाच :- हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥19॥

    मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता । कीं म्हणतसे बा पांडुसुता । भलें केलें ॥206॥ अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । अंगें तो लेंकरूं काई । नव्हेचि नंदाचें ॥207॥ परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ॥208॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…

    अर्थ

    ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निरास होतो आणि अढळ अशी नित्यता आपणास प्राप्त होते. ॥197॥ ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढू लागते ॥198॥ मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर, सेवन करणारा आपण स्वत: परमामृत होऊन राहतो. असे जे परमामृत ते तू मला देत असताना, माझे चित ‘पुरे’ असे म्हणू शकत नाही. ॥199॥ महाराज, आपले नावच आम्हास आधी आवडते, आणि शिवाय आपली भेट होत असून आपले सान्निध्य प्राप्त झालेले आहे. त्याशिवाय, आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात. ॥200॥ आता हे सुख कशासारखे आहे म्हणून सांगावे! तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि, मी इतके मात्र समजतो की, आपणास विचारलेल्या गोष्टींची पुनरुक्तीही झाली तरी हरकत नाही (पण ती पुन्हा तुम्ही सांगा). ॥201॥ अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणाता येईल काय? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणार्‍या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय? ॥202॥ तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात, ते आम्ही मूर्तिमंत नादब्रह्मच अनुभविले. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे आज साक्षात आम्ही चंदनाच्या झाडाच्या फुलांचा वास घेत आहोत ना! ॥203॥ अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला आणि म्हणाला, हा अर्जुन, भक्ती आणि ज्ञान यांचा मळा झाला आहे. ॥204॥ याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्यांच्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाले (ते ऐका), ॥205॥

    श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत, त्यापैकी मुख्य तुला सांगतो. कारण हे कुरुश्रेष्ठा, माझ्या (विभूतींच्या) विस्ताराला अंत नाही. ॥19॥

    (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) ब्रह्मदेवाचे आपण वडील आहो, हे श्रीकृष्णास माहीत असूनही याची आठवण त्यांच्या चित्ताला होईना आणि ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना ठीक केलेस. ॥206॥ कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला ‘बाबा’ असे म्हणाले, यात आम्हाला काही आश्चर्य करावयाचे कारण नाही. (हे पाहा,) तो स्वत: नंदाचे मूल झाला नाही काय? ॥207॥ परंतु सांप्रत हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहो, ते तू ऐक. ॥208॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…

    March 30, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…

    March 29, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    By Team AvaantarMarch 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जिहीं विभूतीं ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहाती अनंता । तिया…

    Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…

    March 30, 2026

    Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…

    March 29, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…

    March 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 एप्रिल 2026

    April 2, 2026

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026

    संध्याकाळ, समुद्र आणि ती…

    April 1, 2026

    लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर

    April 1, 2026

    Bookshelf : सुख आणि आनंद यातला फरक दर्शविणारी ‘ययाती’ कादंबरी

    April 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 254
    • अवांतर 180
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 370
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 527
    • शैक्षणिक 74

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 एप्रिल 2026

    April 2, 2026

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026

    ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    April 1, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 एप्रिल 2026

    April 2, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.