Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 26, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।   ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥10॥

    तयां मग जें आम्हीं कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं । ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल ॥130॥ कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा । ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥131॥ म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें । परि आम्हीं देयावें हेंहि केलें । तिहींची म्हणियें ॥132॥ आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळें वाढें । आणि काळाची दिठी न पडे । हें आम्हां करणें ॥133॥ लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्‍नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥134॥ तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें ॥135॥ जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें । हे पाळती मज विशेखें । आवडे करूं ॥136॥ पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड । कां जे प्रेमळांचें सांकड । आमते घरीं ॥137॥ पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयांचिये वाहणी केले । आम्हीं आंगही शेषा वेंचिलें । लक्ष्मीयेसीं ॥138॥ परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । सप्रेमळांलागीं देख । ठेविलें जतन ॥139॥ हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं । या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥140॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न

    अर्थ

    याप्रमाणे (माझ्या ठिकाणी) सतत युक्त असलेल्या आणि प्रीतिपूर्वक (माझी) भक्ती करणार्‍या त्यांना, मी अशा प्रकारची बुद्धी देतो की, जिच्या योगाने ते माझ्या समीप येतील ॥10॥

    अर्जुना, असे समज की, मग त्यांना आम्ही जे काही (निरतिशय प्रेम) द्यावयाचे, तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी, आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात. ॥130॥ कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले, त्या मार्गाशी स्वर्ग आणि मोक्ष यांची तुलना केली असता, त्या आडवाटा वाटतात. ॥131॥ म्हणून त्यांनी जे प्रेम धरले, तेच आमचे देणे, त्यांनी आपल्या कमाईने मिळविले. (अशा रीतीने) आमचे काम त्यांनीच केले; पण ते आम्ही दिले, असे त्यांनीच (जगात) प्रसिद्ध केले ॥132॥ आता यानंतर इतके घडेल की, ते प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये, हे आम्हाला करावे लागते. ॥133॥ अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरूण करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे, ते मूल खेळत असताना धावते, ॥134॥ ते बालक जो जो खेळ दाखवील, तो तो खेळ ती आई त्याच्यापुढे सोन्याचा करून ठेवते. त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवीत जातो. ॥135॥ उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने ते भक्त मला अनायासाने प्राप्त होतील, अशा तर्‍हेने पालन करणे मला विशेष आवडते. ॥136॥ अरे, भक्ताला माझे कौतुक असते आणि त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते. कारण की, प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. ॥137॥ अर्जुना पाहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग आणि मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या (स्वर्गेच्छु आणि मुमुक्षु यांच्या) रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले ॥138॥ परंतु ज्यात मी पणाचा लेश नाही, असे जे एक ताजे प्रेमसुख, ते तसेच प्रेमळ भक्तांकरिता जतन करून ठेवले आहे, असे समज. ॥139॥ अर्जुना, येथपर्यंत (वर सांगितल्याप्रमाणे) आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्तांचा अंगीकार करतो. या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात, अशा प्रकारच्या नाहीत. ॥140॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे

    May 29, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    By Team AvaantarMay 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् । व्यपेतभीः…

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे

    May 29, 2026

    Dnyaneshwari : जी कल्पादीलागोनी, आजिची घडी धरुनी

    May 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 314
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 437
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.