Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!
    ललित

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरMarch 25, 2026Updated:March 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मार्था मेसन, मार्था मेसनची जिद्द, मार्थाची जगण्याची उमेद, मार्थाची सकारात्मकता, मार्थाचे पुस्तक, मार्थाचे शिक्षण, मार्थाचे आयुष्य, मार्थाची झुंज, अजिंक्य मार्था, अभेद्य मार्था,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पायाला काच लागल्यानं टीटी इंजेक्शन घ्यायला आलेला एक इसम अत्यंत कावला होता… “ट्रे तुटला तेव्हा काल रात्रीच म्हटलं होतं, नीट साफ करा तर नाही! आता सकाळी सकाळी परेशानी… आधीच पाठ जाम, ॲाफिसचं टेन्शन आणि त्यात आता हा प्रकार… ब्ला… ब्ला…” त्यांचं आपलं सुरू होतं.

    दीड इंचाची जखम, त्यावर दोन रुपयाचं बँडेज आणि पन्नास रुपयांचं टीटी यामुळं इसमानं थेट आयुष्यावर वगैरे टीका करायला सुरुवात केल्याचं पाहून मोठी गंमत वाटली. असे पेशंट भेटले की, मला मार्था आठवते… मार्था मेसन…

    मार्था मेसनचा जन्म यूएसस्थित उत्तर कॅरोलिना इथं झाला. ती बालपणापासूनच तीन ‘ह’ अर्थात हुशार, हसरी आणि हजरजबाबी! ती अकरा वर्षांची असावी, तेव्हा तिचा भाऊ ‘गॅस्टन’ याला पोलिओनं घेरलं, त्वरित उपचार सुरू झाले… पण दुर्देव, प्रारंभी त्रास मग अपंगपणा आणि नंतर थेट मृत्यू.

    गॅस्टनला मूठमाती देऊन दोनच दिवस झाले होते, डोळ्यांतील अश्रू अद्याप सुकलेही नव्हते, तेवढ्यात मार्थालाही तापानं घेरलं…

    “देवाऽऽ आता हे लेकरू? नको रेऽऽ“ मार्थाच्या आईनं हंबरडा फोडला, पण देवानं कदाचित अर्धवटच ऐकलं… मार्था वाचली खरी पण पोलिओनं तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कायमचे जायबंदी केले आणि हळूहळू तिचा श्वासही मंदावू लागला…

    “मार्था कदाचित वाचेलही पण ती स्वत:हून श्वास घेऊ शकणार नाही…” डॅाक्टरांच्या या वाक्यानं तर सगळं वातावरणच सुन्न झालं. मार्थाला एका यंत्रात ठेवण्यात आलं… त्याची सततची घरघर… त्यात बंद झालं तिचं आख्खं आयुष्य… मार्थानं या ‘आयर्न लंग’ नामक तुरुंगरुपी लोखंडी देहात एक दोन नव्हे तब्बल 61 वर्षे काढली पण ती जगली हार न मानता!

    हेही वाचा – Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    बहुतेक लोक तर तिच्याभोवतीचं ते धूड बघूनच गळपटले, पण मार्था म्हणायची, ”शरीर चालत नाही, याचा अर्थ आयुष्य थांबतं असं नव्हे.”

    तिनं घरीच शिक्षण सुरू ठेवलं, समवयस्क शाळकरी मित्र-मैत्रिणी, शिक्षक-नातलग वेळ मिळेल तेव्हा तिला भेटायला येत… तिनं हायस्कूल टॉप केलं, महाविद्यालयीन शिक्षण संपवलं आणि पदवीही मिळवली.

    तिचे हात हलत नव्हते, ती लिहू शकत नव्हती… पण तिचा मेंदू मात्र तल्लख होता. तिची आईच तिची लेखनिक होती. 1990च्या सुमारास संगणकावर व्हॉइस टायपिंग आलं आणि ती या उपकारातूनही मुक्त झाली. तिनं हसत स्क्रीनवर एक वाक्य बोलून टाइप केलं, ते म्हणजे, ”आज माझा स्वातंत्र्य दिन आहे!”

    तिनं आपल्या अनुभवांच्या शिदोरीवर 2003 साली एक पुस्तकच लिहिलं, ”ब्रेथ : लाइफ इन द रिदम ऑफ ॲन आयर्न लंग” हे पुस्तक फक्त तिच्या आजाराबद्दल नव्हे तर, तिच्या जगण्याचा आनंद, शहाणपण आणि विनोद याबद्दल होतं…

    “लोकं म्हणतात मी जगण्यासाठी मशिनवर अवलंबून आहे, पण खरं तर मी प्रेम-ज्ञान आणि जिज्ञासेवर जगते.” या एका वाक्यात तिनं स्वत:चं जीवन परिभाषित केलं…

    हेही वाचा – कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी

    2009 साली वयाच्या 71व्या वर्षी मशीन थकलं तसा तिचा देहही थकला, पण तिची ओळख कमकुवत म्हणून नव्हे तर, अतूट धैर्याचं प्रतीक म्हणूनच राहिली…

    “मर्यादांमध्येही जीवन असू शकतं, शरीर कैद होऊ शकतं… पण मन नाही आणि आनंद हा परिस्थितीत नसतो तर, दृष्टिकोनात असतो…” मार्था हे जाता जाता शिकवून गेली…

    आयुष्य कधी ओझं वाटलं, स्वप्नं धूसर झाली आणि आशा फिकी झाली… तेव्हा फक्त ‘मार्था’ आठवा! आयुष्य 10 टक्के परिस्थितीवर आणि 90 टक्के मात्र आपण तिला कसं उत्तर देतो? यावर अवलंबून असतं!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026 ललित

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026 ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    By रेवती निलेश पांडेMarch 25, 2026

    दोन महिन्यांपूर्वी एकटीने रेल्वेने प्रवास करण्याचा योग आला. प्रवास बराच लांबचा होता. मला ‘साइड अप्पर’…

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!

    March 25, 2026

    Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें…

    March 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 247
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 361
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 511
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn