Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 25, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 25 मार्च 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 04 चैत्र शके 1948; तिथि : सप्तमी 13:50; नक्षत्र : मृगशीर्ष 17:33;
    • योग : सौभाग्य 27:09; करण : विष्टी 24:47;
    • सूर्य : मीन; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:50;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    लेखक, कथाकथनकार व. पु. काळे

    टीम अवांतर

    आपल्या लेखनातून जगण्याचं तत्वज्ञान सोप्या पण रंजक पद्धतीने सांगणारे साहित्यिक म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म 25 मार्च 1932 रोजी झाला. ‘वपु’ या दोन अक्षरांनी उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले ते पेशाने खरंतर वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट होते. मात्र वपु इमारतींच्या आराखड्याचे आरेखन करण्यापेक्षा लेखनात अधिक रमले आणि मराठी साहित्याला एक थोर साहित्यिक लाभला. वपुंचं लिखाण चौफेर होतं. कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र असे अनेक लेखन प्रकार त्यांनी हाताळले. वपुंनी 60 पेक्षा जास्त पुस्तक लिहिली. त्यांनी आपल्या काही निवडक कथांवर आधारित कथाकथन केलं. या कथाकथनाला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली. त्या कथाकथनाच्या ऑडिओ कॅसेट्स निघाल्या. अशा पद्धतीने घराघरात पोहोचणारे वपु हे मराठीतील पहिलेच लेखक ठरले.

    त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या, स्वैर वेड्या मनाचे विविध कांगोरे अधोरेखित करणाऱ्या असत. वपुंच्या पार्टनर, झोपाळा, आपण सारे अर्जुन, ऐक सखे, चतुर्भुज, काही खरं काही खोटं, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार अशा अनेक पुस्तकांवर, त्यांच्या कादंबऱ्या आणि कथांवर वाचकप्रियतेची मोहोर उमटली आहे. त्यांचे ‘पार्टनर’ हे पुस्तक आजही वाचकप्रिय आहे.

    हेही वाचा – Bookshelf : ‘भुताचा जन्म’…; मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    आजच्या युवकांसाठी वपुचं लिखाण म्हणजे प्रेरणा आहे. हल्लीच्या धावपळीच्या युगात करिअर, पैसा आणि स्पर्धा यामध्ये अडकलेल्या तरुणांना त्यांनी एक महत्त्वाचा धडा दिला – “आयुष्य म्हणजे फक्त धावणं नाही, तर थांबून क्षणांचा आस्वाद घेणं आहे.” तर चाळीशी-पन्नाशीतील वाचकांना त्यांच्या कथांमधून स्वतःचं आयुष्य पुन्हा नव्याने समजून घेण्याची दृष्टी दिली. त्यांचे लेखन वाचकांना पुन्हा एकदा स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करते.

    वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु. भा. भावे’ पुरस्कार, फाय फाऊंडेशनचा पुरस्कार असे गौरव त्यांना प्राप्त झाले. तर, अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अशा या वाचकप्रिय लेखकाचे 26 जून 2001 रोजी निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस कायदेशीर बाबतीत दिलासा देणारा असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र आज इतरांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्तरावर वातावरण खेळीमेळीचे राहील.

    वृषभ – व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरू शकतो. मागील चुकांमधून शिकून पुढे वाटचाल कराल. संततीच्या संगतीबद्दल काळजी वाटू शकते, त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल, कारण लहान आजारदेखील गंभीर होऊ शकतात.

    मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य पण संतुलित असेल. आज व्यवसायात काही नवीन बदल करण्याचा प्रयत्न कराल आणि हे बदल भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आज आईच्या माहेरची मंडळी तिला भेटायला येतील, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याचीही चिन्हे आहेत.

    कर्क – आजचा दिवस उत्तम फलदायी ठरेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर भागीदारांमध्ये चांगला समन्वय दिसून येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नातील सगळे अडथळे आता दूर होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. वडिलांशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मोकळेपणाने चर्चा करावी लागेल.

    सिंह – आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल.  जबाबदाऱ्यांबाबत थोडे सावध राहावे लागेल. नातेसंबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि व्यवसाय नियोजनानुसार पुढे जाईल. मात्र एखादी गोष्ट थोडी चिंता निर्माण करू शकते. इतरांना महत्त्वाची माहिती देणे टाळा. काही जुनी कर्जे देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात, परंतु तुम्ही ती फेडण्यासाठी गंभीरपणे पुढाकार घ्याल.

    हेही वाचा – प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    कन्या – आज आजूबाजूचे वातावरण खूप आनंददायी असेल. एखाद्या कामासाठी कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर आज ते मिळण्याची शक्यता वाढेल. कुटुंबातील जुने प्रश्न एकत्रपणे सोडवणे योग्य ठरेल. त्यासाठी घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. संततीसोबतचे संबंध उत्कृष्ट असतील. त्यांना एखादी अनपेक्षित भेटवस्तूदेखील देऊ शकता.

    तुळ – आज ईश्वरभक्ती आणि आध्यात्मिक कार्यात पूर्णपणे मग्न व्हाल. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने आनंद होईल. घरी पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण अधिकच प्रसन्न होईल. फक्त कोणत्याही बाबतीत संयम आणि धैर्य राखणे महत्त्वाचे ठरेल. काम पुढे ढकलण्याची सवय टाळा. कोणाकडून पैसे उधार घेतले असतील, तर ते परत फेडण्याचा प्रयत्न कराल.

    वृश्चिक – आजचा दिवस तुम्हाला उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखावे लागेल. खर्चाचे प्रमाण थोडे जास्त असू शकते आणि काही तातडीचे खर्चही उद्भवू शकतात. एखादा पुरस्कार किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आज बोलताना शब्दांबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते.

    धनु – आजचा दिवस प्रगतीचा असेल. लहरी स्वभावामुळे तुमच्याकडून काही काही चुका होऊ शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. नवीन प्रकल्पात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.  घर किंवा दुकान विकत घेण्याचाही विचार करू शकता. खर्चाचा स्पष्ट हिशोब ठेवावा लागेल, कारण त्यामुळे आर्थिक संतुलन राखले जाईल. संततीची प्रगती आनंददायी असेल.

    मकर – राहणीमानाचा दर्जाही सुधारेल. आज कोणत्याही प्रतिस्पर्धकाशी व्यवहार करणे टाळा. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा, कारण ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला असेल. त्यांना इच्छित अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन ओळख मिळू शकते.

    कुंभ – आज काही महत्त्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्तींशी भेट होऊ शकते, ही ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचेही संकेत आहेत. बऱ्याच काळानंतर जुन्या मित्राला भेटल्याने तुम्हाला आनंद होईल. आज आईच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वादांपासून दूर रहा.

    मीन – आज आर्थिक बाबींमध्ये थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळणे उत्तम ठरेल. कामासंबंधी नवीन कल्पना पुढे येतील, ज्यामुळे भविष्यात पुढे जाण्यास मदत होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळण्याचीही चिन्हे आहेत. मेहनत आणि प्रयत्न करणे सोडू नका. कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा दाखवा.


     

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 509
    • वास्तू आणि वेध 361
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn