Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 24, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥7॥

    यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूति । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें विश्व ॥104॥ म्हणोनि गा यापरि । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥105॥ ऐसें जाणे जो साचें । तया चेइरें जाहालें ज्ञानाचें । म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचें । दुःस्वप्न तयां ॥106॥ मी माझिया विभूती । आणि विभूतीं व्यष्टलिया व्यक्ती । हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ॥107॥ म्हणोनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें । एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥108॥ कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचिये नाटीं । सूती मज ॥109॥ म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु । करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं ॥110॥ तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥111॥

    अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते । इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥8॥

    तरी मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासून आघवा । निर्वाहो यांचा ॥112॥ कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा । आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥113॥ ऐसें आघवांचि ठायीं । तया जळचि जेविं पाहीं । तैसा मी वांचूनि नाहीं । विश्वीं इये ॥114॥ ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें । परि साचोकारें उदितें । प्रेमभावें ॥115॥ देशकाळवर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न । जैसा वायु होऊनि गगन । गगनींचि विचरे ॥116॥ ऐसिनि जे निजज्ञानीं । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्रूपा मनीं । सांठवूनि मातें ॥117॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें

    अर्थ

    हा माझा विस्तार (विभूती) आणि (अभेद) योग जो पूर्णपणे जाणतो, तो माझ्या अखंड अशा महा (अभेद) योगाने युक्त होतो, याविषयी संदेह नाही. ॥7॥

    अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्यादिक भाव या माझ्या विभूती आहेत आणि यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे. ॥104॥ म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवट मुंगीपर्यंत, माझ्याचावून दुसरी गोष्टच नाही. ॥105॥ याप्रमाणे जो यथार्थ जाणतो, त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे. म्हणून, त्याला उत्तम आणि मध्यम या भेदाचे स्वप्न पडेल का? (नाही.) ॥106॥ मी आणि माझ्या विभूती आणि विभूतींनी व्यापलेले प्राणी, हे सर्व एकच आहेत, असे ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो, ॥107॥ म्हणून अशा या संशयरहित महायोगाने (ऐक्य भावनेने) तो खरोखर कृतार्थ झाला आहे, यात शंका घेण्याचे कारण नाही. ॥108॥ कारण की, अर्जुना अशा अभेददृष्टीने जो मला भजतो, त्याच्या भजनाच्या छंदात माझा प्रवेश आहे. ॥109॥ म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग, याच्याबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही. शिवाय याचे आचरण करीत असता त्यात जरी थोडाबहुत व्यत्यय आला, तरी त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते, हे तुला सहाव्या अध्यायत (चाळीसाव्या श्लोकात) सांगितलेच आहे. ॥110॥ तेच माझे ऐक्य कसे आहे, हे समजण्याची मनात इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक, ते मी सांगतो. ॥111॥

    मी सर्वांचे आदिकारण आहे, माझ्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती होते, असे जाणून, प्रेमाने युक्त होऊन ज्ञानी माझी भक्ती करतात. ॥8॥

    तरी अर्जुना, सर्व जगाला मीच जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे. ॥112॥ लाटांच्या अनेक परंपरांचा जन्म, अर्जुना, पाण्यातच होतो आणि त्या लाटांना आश्रय पाणीच असते आणि त्यांचे असणे पाण्यावरच अवलंबून आहे. ॥113॥ या प्रमाणे पाहा, सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे, त्याप्रमाणे माझ्याशिवाय या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही. ॥114॥ याप्रमाणे मी व्यापक आहे, असे समजून ते मला वाटेल तेथे भजतात. परंतु हे त्यांचे भजन खरोखरच्या निर्माण झालेल्या अशा प्रेमभावनेने केलेले असते. ॥115॥ वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वावरतो, तसे देश काळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत, असे समजून ते वागतात. ॥116॥ अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत, ते मी जो जगद्रूप, त्या मला अंत:करणात साठवून त्रैलोक्यात सुखाने क्रीडा, व्यवहार करीत असतात. ॥117॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    By Team AvaantarMarch 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा  महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । मद्‍भवा मानसा जाता येषां लोक…

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    March 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn