Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पंखात बळ आणणारी पाठवणी!
    ललित

    पंखात बळ आणणारी पाठवणी!

    प्रणाली मंगेश महाशब्देBy प्रणाली मंगेश महाशब्देMarch 20, 2026Updated:March 22, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, मुलीची पाठवणी, मुलाची पाठवणी, लग्नानंतरची पाठवणी, शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवणी, मुलीचे माहेरपण, मुलाचे घरी परतणे, आईचा हळवेपणा, बाबांचा हळवेपणा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पाठवणी हा शब्द जरी ऐकला तरी किती गोष्टी डोळ्यांसमोर येतात. प्रत्येक स्त्रीवर्गाबरोबरच पुरुषवर्गाचा सुद्धा हळवा कोपरा असतो हा शब्द. बायकोच्या पाठवणीच्या वेळेस तिच्या माहेरच्यांना काय वाटले असेल, हे वडील म्हणून मुलीच्या पाठवणीच्या वेळेस जाणवते. एकूणच काय तर, नको असलेला पण हवाहवासा असा हा शब्द!

    एक छोटा जीव जन्माला येतो. घरातील सगळे जण त्या छोट्या जीवाचे कोडकौतुक करण्यात दंग होतात. हळूहळू हट्ट करून, रडून, कट्टी-बट्टी करून, दिवस-महिने-वर्ष उलटतात. सगळ्यांना एकमेकांची सवय लागलेली असते. अशा या 20-22 वर्षांच्या (आता 30 किंवा त्यापेक्षा जास्त पण) सहवासानंतर त्या छोट्या जीवाला म्हणजेच मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवायचे. किती कठीण आहे ना हे!

    त्यानंतर ती मुलगी परत कधी येणार, याची वाट बघायची. तिच्या आठवणींना रोजच्या जगण्याचा भाग बनवायचे. ती घरी येणार ते 4-8 दिवस काय करू, काय नको, या विचारातच निघून जाणार… आणि परत येणार तो पाठवणीचा दिवस! त्या दिवसाची तयारी पण करायची असते. म्हणजे रिकाम्या हाताने कशी पाठवणी करायची म्हणून काही गोडधोड आवर्जून केले जाते. (आता सगळे विकत पण मिळते, त्यामुळे वेळ वाचतो. पण त्यामधील गोडी ही थोडी वेगळी असते. असो, तो विषय वेगळा…)

    हेही वाचा – मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौन्दर्य संस्कार

    मनामध्ये हुरहूर असते, गोंधळ असतो आणि तो लपवण्यासाठी घरामध्ये पदार्थ करताना डोळ्यांतून भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. फोडणीमुळे, कांदा चिरत असल्यामुळे डोळ्यात पाणी आले, अशी कारणे पण सांगितली जातात. पाठवणी होते. आई-वडील पुन्हा आठवणींच्या जगात रमतात तर, ती मुलगी आपल्या घरच्या-कामाच्या व्यापात. त्या मुलीला पण आठवण येतच असते. पण पुढच्या जबाबदा-यांमुळे त्यामध्ये अडकून रहाणे जमत नाही. म्हणजे काय तर, दोन्हीकडे हा हळवा भाग असतोच.

    आता लग्न झाल्यावरच या सगळ्या गोष्टी घडतात, असे नाही आता, तर शिक्षणामुळे या गोष्टींना लवकरच सामोरे जावे लागते. असं म्हणतात की, मुली या वडिलांच्या जास्त जवळ असतात आणि मुलं आईच्या. पण शेवटी पाठवणीला मुलगा-मुलगी हा फरक कळत नाही ना!

    मुलगी असो नाही तर, मुलगा… आता पाठवणी दोघांचीही करावी लागते. ते त्यांच्या भविष्याच्या तयारीसाठी लांब जात आहेत, याचा आनंद तर असतोच, पण त्याबरोबर काळजीपण असतेच. आशा, विश्वास पण असतो या पाठवणीमधे. यानंतर किती तरी चांगल्या गोष्टी घडणार असतात. त्यामुळेच या गोष्टींसाठी पाठवणीला नेहमीच तयार रहावे लागते.

    हेही वाचा – अलंकार… भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे

    हे लिहिताना असेच एक गाणे मनात रेंगाळले…

    दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो

    ओठांत येई गाणे

    जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू

    जा लाडके सुखाने

    दाटून कंठ येतो…

    हे गाणे मुलीच्या लग्नानंतर वडिलांनी म्हटलेले आपण बघितले आहे. इथे मुलं (मुद्दामच मुलं असे दोघांसाठी म्हटले आहे) शिक्षणासाठी जाताना पण असेच वाटते ना…

    हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा

    रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्री गणेशा

    वळवून अक्षरांना केले तुला शहाणे

    जातो सुखावुनी मी, या गोड आठवाने…

    यासगळ्या गोष्टी मुलगा असो वा मुलगी दोघांसाठी पण तेवढ्याच भावनेने केलेल्या असतात. हो ना?

    बोलात बोबडीच्या संगीत जागविले

    लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले

    एकेक सूर यावा, न्हाऊन अमृताने

    अवघ्याच जीवनाचे, व्हावे सुरेलगाणे

    कुठे मुलगा-मुलगी असा फरकच केला नाही, या सगळ्या गोष्टी करताना..

    घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे

    हा देह दूर जाता, मन राहणार मागे

    (धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे

    परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे)

    खरचं प्रत्येक वेळेस मुलं येणार, 4-8 दिवस राहणार आणि परत आपल्या भविष्याकडे झेप घेणार, असे होतंच राहणार. प्रत्येक वेळेस त्यांचे पाऊल अजून पुढे पडलेले आपल्याला दिसणार. त्यांच्यातील वाढलेला आत्मविश्वास आपल्याला दिसणार… आणि मग खरंच या पाठवणीचा सुद्धा अभिमान वाटायला लागणार. या पाठवणीमुळेच त्यांच्या पंखात आलेले बळ बघून आपण सुखावून जाणार.

    अशी ही सुखद पाठवणी.


     

    प्रणाली महाशब्दे
    प्रणाली मंगेश महाशब्दे

    संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

    Related Posts

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026 ललित

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026 ललित

    श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    June 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    By प्रदीप केळुस्करJune 20, 2026

    पूर्वार्ध साईनाथ नाट्यमंडळाची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. मंडळाचा दिग्दर्शक…

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026

    श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    June 20, 2026

    शर्वाय आणि आराध्याच्या प्रेमात माधवचा अडसर!

    June 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026

    आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन

    June 20, 2026

    श्रीने जुईलीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण…

    June 20, 2026

    Dnyaneshwari : वोखटें कां गोमटें, हें काहींचि तया नुमटे

    June 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 334
    • अवांतर 190
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 461
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 21
    • ललित 720
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    June 20, 2026

    आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    June 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.