Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जिव्हाळा… गुरुसमान बक्षी सरांचा!
    अवांतर

    जिव्हाळा… गुरुसमान बक्षी सरांचा!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 10, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, गुरुसमान बक्षी सर, हरहुन्नरी विजय बक्षी, संगीतकार विजय बक्षी, गीतकार विजय बक्षी, मार्गदर्शक विजय बक्षी, विजय बक्षींचा जिव्हाळा, विजय बक्षींची जिव्हाळा, जिव्हाळा कविता, जिव्हाळा गाणे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्नेहल अ. गोखले

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

    गुरू म्हणजे ज्ञान देणारा, मार्गदर्शक, शिकवणारा… म्हणूनच पंडित विजय बक्षी सरांबद्दल हा लेखप्रपंच…  ते जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी, मी त्यांना गुरूसमान मानते. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी लहानांकडूनही गुरुमंत्र घेतला आहे. (उदाहरणार्थ, मुक्ताबाईंकडून चांगदेवांनी गुरुमंत्र घेतला).

    आपला ‘जिव्हाळा नागरिक संघ’ 2005मध्ये सुरू झाला. तेव्हा असलेल्या लहान रोपट्याला आता वृक्षाचे (70-80 सभासद) रूप आले आहे. तेव्हापासूनच नवनवीन कल्पना घेऊन कार्यक्रम होत असत. त्यामध्ये प्रामुख्याने पंडित बक्षी सर, सुलभाताई कुलकर्णी आणि बाकी सर्वजण कार्यक्रम महिन्यांतील दोन गुरुवारी करत असत. 2007मध्ये पुण्यातील जेष्ठ नागरिकांच्या विविध 36 संघांची देशभक्तीपर गीतांची स्पर्धा झाली. त्यावेळी पंडित बक्षी सरांनी स्वरचित अतिशय जोशपूर्ण असे गीत तयार केले होते, संगीतही त्यांचेच होते. कधीही गाणे न शिकलेल्या आम्हा ज्येष्ठ भागिनींकडून त्यांनी सरगमसहीत हे गीत बसवले आणि आमचा संघ त्या स्पर्धेत पहिला आला. पुढे खूप उत्साहाने 2-3 ठिकणी ते गीत आम्ही सादर केले. 2009मध्ये मी जरा संकोचानेच सरांना आमच्या छोट्याशा महिला मंडळाच्या वासंतिक उत्सवात गाण्याचा कार्यक्रम कराल का? असे विचारल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता (मानधन न विचारता) सुंदर कार्यक्रम केला. इथे त्यांचा मोठेपणा ‘दिसून आला.

    हेही वाचा – सफर… 83 वर्षांच्या आयुष्याची

    त्यांच्या षष्ठ्यब्दीनिमित्त 2008मध्ये त्यांच्या शिष्यांनी गोवा येथे ‘श्रुतिसुधा’ नावाची संस्था स्थापन केली. तेथे त्यांचे रागांवर आधारित गीतांचे कार्यक्रम दरवर्षी होत असत. संगीततज्ज्ञ पंडित अरुण कशाळकर यांनी ‘मेनका’ दिवाळी अंकात त्यांच्यावर फार सुंदर लेख लिहिला होता. अनेकांनी तो वाचला असेलही!

    पंडित विजय बक्षी सरांनी आम्हा काही ज्येष्ठ महिलांना दोन वर्षं शास्त्रीय संगीत शिकवले. वाद्यांची माहिती पण ते बारकाव्यासह सांगत. यमन रागावर आमच्याकडून कार्यक्रमही करून घेतला. पंडित विजय बक्षी सर शीघ्रकवीसुद्धा आहेत. गीत गजानन ही स्वरचित 21 पदांची रचना, एकांकिका, दरवर्षी वर्धापनदिनी होणाऱ्या स्वागतगीतांना संगीतही त्यांचेच! आमचे ‘जिव्हाळा’ हे गीत आणि संगीतही त्यांचेच आहे. ते आम्ही सभेच्या सुरुवातीला म्हणतो. ते मी इथे देत आहे. खूप अर्थपूर्ण असून ते नातेवाईक, मित्रमैत्रिणीमध्ये म्हणायलाही छान आहे.

    हेही वाचा – बालपणीचा काळ सुखाचा…

    जिव्हाळा गीत

    जिव्हाळा जिव्हाळा जिव्हाळा

    असा वाढता राहू दे हा जिव्हाळा ॥धृ.॥

    मिळाली मनाला मने आपुली

    अशी मैत्री, सीमा तिला कोठली

    धरू एकमेकांवरी सावली

    कृपावंत कान्हा निळा सावळा ॥1॥

    युगांची भ्रमंती अनादी अनंती

    अशा कालचक्रास फेरे किती

    सुखाची व्यथेची अम्हा, ना क्षिती

    कधी ये हिवाळा, कधी हा उन्हाळा ॥2॥

    कुणा दुःख काही तया धीर देऊ

    कुणी संकटी सर्व धावून जाऊ

    निराशा कधी ना मनी येऊ देऊ

    सदैव सुखाचा फुलू दे मळा ॥3॥

    पंडित बक्षी सर आणि सुषमाताई त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ निबंध स्पर्धा घेतात, त्याचे बक्षीसही तेच देतात. असे कितीतरी उपक्रम सुरू असल्याने सभासदांनाही उत्साह येतो. या सर्वामध्ये त्यांचे सुपुत्र मयुरेश बक्षी कामात व्यग्र असूनही वेळ काढून साथही करतात. सुषमाताई कायमच त्यांच्या पाठीशी असतात. कुठलीही घरगुती अडचण किंवा इतर कारणे न सांगता दोघेही कार्यरत असतात. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या संपर्कात आम्ही आलो आहोत अन् ते मला गुरूसमान आहेत.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026 अवांतर

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026 अवांतर

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    By हर्षा गुप्तेApril 13, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. गेल्या लेखात मी डॉगी ब्रँडीबद्दल जुजबी…

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 268
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 385
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 556
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026
    Most Popular

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.