Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मॉन्टेसरीतच माझा स्मार्टनेस दाबला गेला…
    ललित

    मॉन्टेसरीतच माझा स्मार्टनेस दाबला गेला…

    Team AvaantarBy Team AvaantarJune 5, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, माँटेसरी, ऐनापुरे, बावळटपणा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय.

    मला माझ्या लहानपणी ओळखणारी आणि आता ओळखणारी वेगवेगळी माणसं, म्हणजे त्यांची माझ्याबद्दलची मतेसुद्धा वेगळी आहेत. एका ठराविक वयानंतर येणारा आत्मविश्वास, एक प्रगल्भता हे माणसाचं आयुष्य, स्वभाव बदलते. मी जरा जास्त कॉन्फिडन्ट आणि मस्तीखोर आहे. मला आता ओळखणारी माणसं मला विचारतात की, तू लहानपणी देखील अशीच होती ना गं? खूप मस्तीखोर… आणि लहानपणी मला ओळखणारे विचारतात की, काय गं काही सुधारणा आहे का तुझ्यात की, अजून तशीच आहेस बावळट!

    मज्जा… खरंच लहानपणी मी बावळट, भित्री भागुबाई होते. पण आता जशी आहे मस्तीखोर, त्याची मुळे खरंतर लहानपणीच रुजली होती… अगदी मी जेव्हा मॉन्टेसारित होते… गिरगावात देशमुख लेनमध्ये ऐनापुरे बाईंकडे दोन वर्षे माँटेसरीमध्ये शिकायचं आणि मग इयत्ता पहिलीसाठी शाळेत ॲडमिशन घ्यायची, अशी साधारण तेव्हाची प्रथा होती.

    बरं, ऐनापुरे बाई म्हणजे त्या माझ्या आजीसारख्या होत्या. प्रचंड तल्लख बुद्धिमत्ता होती. मला त्यांच्या शाळेतून घरी न्यायला कोणीही यायचं. म्हणजे, खेतवाडी आठव्या गल्लीतून दादाकाका, राजूकाका, माईआत्या किंवा सातव्या गल्लीतून चक्क ताई आजी देखील येऊन मला त्यांच्या त्यांच्या घरी घेऊन जायचे. तशी मी संपूर्ण फॅमिलीमध्ये जरा जास्त लाडाची होते. आई जेव्हा मला न्यायला शाळेत यायची, तेव्हा ऐनापुरे बाई सांगायच्य की, ‘ताई नाहीये, राजू येऊन घेऊन गेला.’

    हेही वाचा – Take care… काळजी घे

    बाई माझ्या सगळ्याच फॅमिली मेंबर्सना ओळखायच्या. पण मला कधी कधी त्यांचा खूप राग यायचा. म्हणजे, वर्गात एखाद्या मुलाला किंवा मुलीला झोप आली ना की, त्या त्यांना निजायच्या खोलीत नेऊन झोपवायच्या. अभ्यासाचा कंटाळा आला की, मी पण बसल्या बसल्या डुलक्या द्यायचे. वाटायचं की, बाई मलाही निजायच्या खोलीत पाठवतील. पण नाही, त्या मला, ‘तोंड धुवून ये… थोडावेळ उभी राहा…’ असे सांगायच्या! खूप राग यायचा…

    त्या शाळेत अजून एक सिस्टीम होती. दुपारी डबे खायची सुट्टी व्हायची. डबे खाऊन झाले की, रांगेने सगळेजण ‘सू’ करायला जात असू. ऐनापुरे बाई बाहेर टॉयलेटपाशी उभ्या राहायच्या. सगळी मुले वर्गात आली की, त्या टॉयलेटमध्ये पाणी टाकून, सगळं स्वच्छ करून, मग वर्गात यायच्या. पण त्या आधी शास्त्री बाई किंवा सदावर्ते बाई यांच्यासाठी कोणाकडे तरी निरोप पाठवायच्या की, त्यांनी आता गोष्टी सांगायच्या, गाणी म्हणून घ्यायची की पाट्या (अभ्यास) घ्यायच्या. (तेव्हा आम्ही पाटी-पेन्सिल वापरत होतो.)

    त्या दिवशी मला सांगितलं की, ‘ताई, शास्त्री बाईंना सांग पाट्या घ्यायच्यायत.’ मी ‘हो’ म्हटलं आणि शास्त्री बाईंना सांगितलं की, ‘गोष्ट सांगायचीय.’

    त्याप्रमाणे बाईंनी तशी तयारी केली. ऐनापुरे बाई आल्या आणि म्हणाल्या, ‘हे काय? गोष्ट सांगायची तयारी काय केलीय! पाट्या घ्यायला सांगितलं होतं मी…’ शास्त्री बाई म्हणाल्या की, ‘हिनं सांगितलं गोष्टी सांगायच्यायत म्हणून…’

    हेही वाचा – तो आला, तो बोलला… पण…

    झालं… बाईंनी धोपटलीच मला! वरून आईला नाव सांगितलं. आईनंही धोपटलं. माझा सगळा ‘स्मार्टनेस’ या लोकांनी दाबून टाकला अन् मी एक नंबरची बावळट आणि घाबरट बनले. बावळटपणा अजूनही शिल्लक आहे. भित्रेपणा मात्र काळाच्या ओघात मागे पडला.

    तुम्हाला आठवते का, तुम्ही मॉन्टेसरीमध्ये केलेली अशीच काही करामत. मला कळवली तर वाचायला आवडेल. तुमची तशी आठवण पुढील ईमेलवर कळवा.

    avaantar3103@gmail.com
    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 411
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Most Popular

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.