धनंजय जोशी
(‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार)
संपर्क – 8850453833
मेष राशी
जोडीदाराला, भागीदाराला अथवा प्रतिस्पर्धी असल्यास त्याला योग्य तो मान द्या. हाताखालच्या माणसांना सांभाळा. छान, सुंदर रुचकर पदार्थ खायचा योग आहे, खाऊन तृप्त व्हा. लहान मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा.
वृषभ रास
सट्टा बाजार, शेअर मार्केट यांच्याकडे मन आकर्षित होत असले तरी, संयम बाळगा. कर्मचारी असल्यास कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्या. स्त्रियांनी तब्येतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. जोडीदाराने याबाबतीत स्त्रीला पूर्ण सहयोग करणे अपेक्षित आहे.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा थकवणारा असू शकतो, पण कष्टाला मागे राहू नका. विवाहित स्त्रियांची माहेर आणि मुले यात थोडी रस्सीखेच झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. लहान मुलांनी आळस झटकून नव्या दमाने अभ्यास सुरू करावा.
कर्क रास
छोटे प्रवास संपवून थोडे स्थैर्य आणणारा हा आठवडा असणार आहे. घरचे वेध लावणारा आठवडा असू शकतो. आईची आठवण आलीच तर, आईला जरूर भेटा अथवा तिच्याशी कॉल करून बोला. लहान मुलांना घरात वेगवेगळे खेळ खेळायला मिळतील. वेळ मिळाल्यास पालकांनी देखील मुलांबरोबर घरी वेळ घालवावा.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा काही छोटे प्रवास घडवू शकतो. रुचकर पदार्थ खावेसे वाटतील. भाऊ अथवा बहिणीची भेट घडू शकते. शेअर मार्केटमध्ये आवड असल्यास त्याचे शास्त्रशुद्ध अध्ययन सुरू करू शकता. लहान मुलांनी वक्तृत्व कलेवर लक्ष केंद्रित करायला, उत्तम ग्रहमान आहे.
कन्या राशी
थोडी काटकसर करून पैसे वाचवायला काहीच हरकत नाही, असे विचार या आठवड्यात मनात आले तर त्यावर अंमल कराल. अडलेली न्यायालयीन कामे मार्गी लागण्यास उत्तम योग आहे. पैश्यांची आवक उत्तम राहील. लहान मुलांनी खाण्यावर ताबा ठेवणे गरजेचे. स्त्रियांना आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करायला सहाय्यभूत असा आठवडा आहे.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांना आठवडा उत्तम जाईल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दूध अथवा दुधापासून बनवलेले पदार्थ सांभाळून खाल्लेले उत्तम. कौटुंबिक गोष्टींमध्ये मन रमेल. लहान मुलांनी हाती पैसे आल्यावर उडवू नयेत.
वृश्चिक राशी
चिंता वाढवणारा हा आठवडा असू शकतो. परदेश गमनाचे मनसुबे असल्यास लवकर तडीस नेणे महत्त्वाचे आहे. स्त्रियांनी पाठ आणि कंबर याची विशेष काळजी घ्यावी. मूळची अबोल रास असली तरी, ‘गरज असेल तिथे बोलणे’ या आठवड्यात महत्त्वाचे ठरणार आहे.
धनू रास
घराबद्दल काही शंका असल्यास आणि तुमचा विश्वास असल्यास वास्तूशास्त्र सल्लागाराकडे नक्की जा. वातुळ पदार्थ खाऊन तब्येतीची हेळसांड करणे योग्य नाही. वैद्याचा सल्ला घेणे कधीही उत्तम.
मकर रास
प्रसिद्धीचे योग घेऊन येणारा हा आठवडा आहे. कार्यालयात म्हणजेच कामाच्या ठिकाणी केलेल्या कष्टाचं चीज होताना दिसेल. आठवड्याच्या उत्तरार्धात काही अडकलेले पैसे येऊ शकतात. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे धोक्याचे ठरू शकते. पूर्ण पडताळणी केल्याशिवाय पुढे पाऊल उचलू नये.
कुंभ रास
संत, गुरु यांच्या दर्शनाचे योग येऊ शकतात. छोटे-मोठे प्रवास होतील. विद्यार्थ्यांनी मनात शंका न बाळगता पाऊल उचलावे. लहान मुलांना उत्तम नवीन अनुभव देणारा हा आठवडा असेल. स्त्रियांनी पायांची विशेष काळजी घ्यावी.
मीन राशी
प्रकृतीला उष्ण असे खाणे टाळावे. भावा, बहिणींना भेटून जुन्या आनंददाययी आठवणींना उजाळा देण्याचे योग येऊ शकतात. राजकारणात अथवा, व्यवसायात प्रतिस्पर्ध्यावर बारीक लक्ष ठेवणे उत्तम आहे. उत्तरार्धात मनाला थोडी काळजी सतावू शकते, पण ध्येयाचा पाठलाग सोडू नका.