Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : हिवाळा स्पेशल… बाजरीची खिचडी
    फूड काॅर्नर

    Recipe : हिवाळा स्पेशल… बाजरीची खिचडी

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 18, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, फूड कॉर्नर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, बाजरीची खिचडी, बाजरी खिचडी, मिलेट खिचडी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    माझी आई सुगरण होती. तिने केलेला रोजचा साधा स्वयंपाकही खूप रुचकर असायचा. मसालेदार भाज्यांचे प्रकार असो किंवा नैवेद्याचे कांदा-लसूणविरहित पदार्थ असोत तिच्या हातच्या स्वयंपाकाला कशाचीच सर येत नसे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बाजरीची खिचडी! ही खिचडी करण्यात तिचा हातखंडा होता. ती बाजरीची खिचडी आणि कढी इतकी सुंदर करायची की, खाणाऱ्याने बोटं चाखत राहावी आणि पोटभर खाऊन देखील अतृप्त रहावे!

    साहित्य

    • बाजरीचा भरडा – 2 वाट्या
    • तांदूळ – 1 वाटी (तांदूळ कमी हवे असतील तर भरडा जास्त घ्यावा.)
    • तूरडाळ – अर्धी वाटी
    • शेंगदाणे – 1 वाटी
    • हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट
    • कढीपत्ता – 6 ते 7 पाने
    • लाल तिखट – 2 चमचे
    • हळद – 1 चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • गोडा मसाला – 2 चमचे
    • धणे  – 1 लहान चमचा (हातावर भरडलेले)
    • जिरे – 1 लहान चमचा (हातावर भरडलेले)
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • हिंग – 1 लहान चमचा
    • दालचिनी – 1 छोटा तुकडा
    • तेजपान – 1
    • तेल – 2 पळी
    • तूप – 1 चमचा

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात

    कृती

    1. प्रथम बाजरीचा भरडा, तांदूळ आणि तूरडाळ पाण्याने धुऊन घ्यावी.
    2. एका भांड्यात एक ते दीड पळी तेल गरम करून फोडणी तयार करावी.
    3. मोहरी, जिरं तडतडल्यावर हिंग टाकून कढीपत्ता, धणे, जिऱ्याची भरडपुड टाकावा. नंतर दालचिनीचा तुकडा आणि तेजपान टाकावे
    4. आता त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून शेंगदाणे घालावे व छान परतावे.
    5. एक चमचा हळद टाकून त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकावे आणि थोडे पाणी घालून दोन मिनिटे गॅसच्या मंद आचेवर ठेवावे.
    6. वाफ यायला लागली की, बाजरीचा भरडा, तांदूळ आणि डाळीचे मिश्रण भांड्यात टाकावे.
    7. भांड्यात मीठ टाकून सर्व मिश्रण एकदा छान परतून घ्यावे.
    8. त्यानंतर वरून दोन चमचे गोडा मसाला घालावा आणि चार ते पाच वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर खिचडी छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यावी.
    9. खिचडी शिजली की, कडेने थोडे तूप सोडावे आणि आवडत असेल तर अर्धे लिंबू पिळावे.

    हेही वाचा – Recipe : बटर फणस हंडी

    टीप्स

    • भरडा तयार करण्यासाठी बाजरी आदल्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुऊन रात्रभर पाण्यात भिजत घालावी. बाजरी हा मिलेटचा प्रकार असल्यामुळे ती लवकर फुगत नाही त्यामुळे साधारण 9 तास तरी बाजरी भिजायला हवी. दुसऱ्या दिवशी पाण्यातून बाजरी उपसून स्वच्छ कापडावर वाळवावी. बाजरी वाळली की, तिला खलबत्त्यात अगर मिक्सरवर जाडसर दळावे आणि सुपाने पाखडून त्यातील तूस काढून घ्यावे.
    • खिचडी सरबरीत हवी असेल तर, एखादी वाटी पाणी जास्त घालू शकता.
    • खिचडीवर वरून घ्यायला सुक्या लाल मिर्च्या आणि लसणाची जिरे-मोहरी घालून खमंग अशी फोडणी तयार करावी आणि अशी ही चुरचुरीत लसणाची फोडणी गरमागरम खिचडीवर घेऊन कढी, पापड, लोणचे पानात घेऊन त्याचा आस्वाद घ्यावा.
    • बाजरीच्या खिचडीत आवडत असल्यास फ्लॅावर, गाजर, फरसबी, मटार वापरू शकता.
    • बाजरीची खिचडी नेहमी हिवाळ्यात खाणे कधीही चांगले.

    एकूण कालावधी – साधारणणे एक तास

    पुरवठा संख्या –  चार व्यक्तींसाठी


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn