प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. तथापि, शब्दांवर ताबा ठेवावा लागेल. सकारात्मक विचार ठेवा. दुसऱ्यांचे सल्ले घेतले तरी स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवा. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) आसपास कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. महिलांचे जोडीदाराशी मैत्रीचे नाते राहील आणि आठवडाही आनंदी जाईल. विद्यार्थ्यांवर काही कारणाने दडपण राहील, मात्र सकारात्मक विचार करा.
वृषभ
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी उलाढाल चांगली राहील. नवीन योजनेला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. गृहसौख्य उत्तम असेल. आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा होऊन हाताशी पैसे येतील. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) सुमारास भावंडे भेटतील. महिला मनाप्रमाणे खर्च करू शकतील. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. विद्यार्थ्यांना मित्रपरिवारात काही सुखदायक गोष्टी समजतील.
मिथुन
उत्तम मानसिकता आणि चिकाटी याचा या आठवड्यात फायदा होऊ शकेल. आधी केलेल्या मेहनतीचे फळ सकारात्मक मिळू शकेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाचा व्याप वाढेल; योग्य नियोजन महत्त्वाचे ठरेल. संततीसाठी महिलांचा प्रवास होऊ शकतो. जोडीदाराकडून फायदा होऊ शकतो. नियोजन करताना विद्यार्थ्यांनी अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा.
कर्क
या आठवड्यात लाभदायक घटना घडतील. मित्रपरिवाराकडून लाभ संभवतो. कामानिमित्त परदेशी प्रवास संभवतो. कला क्षेत्रातील लोकांना फायदे आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. महिलांना या आठवड्यात मानसिक समाधान मिळू शकेल. त्यांच्यासाठी संमिश्र कालावधी आहे. विद्यार्थ्यांनी कामाला प्राधान्य द्यावे, प्रतिस्पर्धी निष्प्रभ ठरतील.
सिंह
या आठवड्यात भाग्याची साथ मिळेल, आत्मविश्वास उत्तम असेल. इतरांना मदत कराल. कामाच्या ठिकाणी जास्त कामे करावी लागू शकतात. तुमच्याकडील गुणांचा उपयोग करून घेतील, पण मोबदला मिळणार नाही. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. वाद होण्याची शक्यता असल्याने महिलांनी काळजी घ्यावी. दुसऱ्याचे बोलणे आधी ऐकून घ्यावे. रोजच्या दिनक्रमात विद्यार्थी व्यग्र राहतील.
हेही वाचा – भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान
कन्या
या आठवड्यात काही ताण तसेच अनपेक्षित प्रकृतीची तक्रार राहील. त्यामुळे नकारात्मक विचार मनात येतील. पण घरातील वातावरण आणि श्री अंबामातेमुळे सर्व व्यवहार सुरळीत चालू राहतील. संततीबाबत काळजी राहील. कामाचे योग्य नियोजन केल्यास महिलांना समाधान मिळेल. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि खर्चावरही नियंत्रण ठेवा.
तुळ
या आठवड्यात शुभ ग्रहमानाची साथ मिळणार आहे. आधी केलेल्या मेहनतीचा परतावा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी व्याप वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांना नवीन संधी मिळतील. व्यापाराचे क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न कराल. महिलांना कुटुंबात रमतील आणि धार्मिक कार्यातही सहभागी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिक प्रयत्न करावेत, त्यानुसार पुढील नियोजन करावे.
वृश्चिक
या आठवड्यात सतत कामाच्या व्यापात राहाल. कामाचे नियोजन आणि जबाबदारी घेऊन पूर्ण करू शकाल. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ देऊ नका; काळजी घ्या आणि पथ्ये पाळा. जोडीदाराला अचानक लाभदायक संधी मिळतील. महिलांच्या दृष्टीने मुलांबाबत सुखदायक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. विद्यार्थी कामात संतुष्ट राहातील. त्यांना नवीन संधी मिळतील.
धनु
या आठवड्यात पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. वडीलधारी मंडळींची काळजी घ्यावी लागू शकते. महिला कामाचा आनंद घेऊ शकतील. मैत्रिणींबरोबर वेळ घालवाल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत वर्गात ताण वाढण्याची शक्यता आहे; शांत राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे मत कोणासमोर मांडू नका.
मकर
या आठवड्यात सामाजिक स्तरावर ओळखी वाढतील. आपल्या संवाद कौशल्याने नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. वास्तूविषयक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू शकाल. कामाच्या ठिकाणी वेळेत काम पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न करावा लागेल. महिलांना भावंड भेटतील. तसेच, जोडीदाराची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.
कुंभ
या आठवड्यात अनेक आघाड्या सांभाळाव्या लागू शकतात. अडकून पडलेल्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास संभवतो. जुनी येणी वसूल होतील. करमणुकीवर खर्च कराल. महिलांना जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. मानसिक आरोग्य जपा. विद्यार्थ्यांच्या कामाचा व्याप वाढेल. नियोजन करून कामे करा. शुभ ग्रहमान आहे.
हेही वाचा – ऐलमा पैलमा…
मीन
या आठवड्यात आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. खर्च खूप होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना स्वतःची योग्यता सातत्याने सिद्ध करावी लागेल. पौर्णिमा (06 ऑक्टोबर) शुभ आहे, आनंददायी घटना घडतील. महिलांना माहेरच्या लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी आनंदी आठवडा आहे. आर्थिक निर्णय घेताना विद्यार्थ्यांनी अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा.


