Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 एप्रिल 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेApril 12, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    रागावर नियंत्रण ठेवा

    या आठवड्यात 15 तारखेला रवी मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष मंगळाची रास आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च झाल्याने नोकरदारांची चिडचिड होईल. पैसे कुणाला उसने देऊ नका. तथापि, नोकरीच्या ठिकाणी कामे पटापट होतील. व्यावसायिक वर्गाकडून मोठी गुंतवणूक केली जाऊ शकते. परदेशप्रवास टाळावा; नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक विचारपूर्वक करावी. अक्षय तृतीयेला दानधर्म आणि पितृ तर्पण करावे. महिलांना मुलांच्या विषयीचे प्रश्न सतावतील. तसेच, उष्णतेचे आजार होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल.

    वृषभ

    ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळावा

    या आठवड्याच्या सुरुवातीला लाभ स्थानात बरेच ग्रह आहेत. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या जागेत किंवा कामाच्या स्वरुपात बदल होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तीशी वाद घालू नये. व्यावसायिक वर्गाने मित्राशी व्यवहार करू नये, तसेच प्रवास टाळावा. वाहनाची काळजी घ्यावी. विष्णू उपासना करावी. जुनी येणी वसूल होतील. महिलांना आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी घरात वाद घालू नये. त्याचबरोबर, मिळालेल्या पॉकेट मनीमधून धनसंचय करावा.

    मिथुन

    कार्यक्षेत्रात खूप बदलाची शक्यता

    या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये खूप बदल घडण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाचा खूप ताण जाणवेल, नवीन जबाबदारी अचानक सोपविली जाईल. लग्न स्थानातील गुरू सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल. व्यावसायिक वर्गाने कामाच्या ठिकाणी वाद-विवाद टाळावा. केलेल्या कामाचा जास्त मोबदला मिळत नाही असे वाटेल, पण तुमचे काम करत रहा; नंतर त्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळेल. अक्षय तृतीयेला दान करा. महिलांनी आहारावर लक्ष ठेवावे, वजन वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांचे भावंडांबरोबर वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे; परिणामी सांभाळून बोलावे.

    कर्क

    आत्मविश्वास वाढेल

    या आठवड्यात भाग्यस्थानी जास्त ग्रह येत आहेत. धार्मिक गोष्टीत सहभागी होता येईल. गुरू तसेच मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कर्मस्थानी रवी येत असल्याने नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, पण आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर आरोग्यही जपावे. व्यावसायिक वर्गाला धनस्थानी केतू आणि व्ययस्थानी गुरू आहे, त्यामुळे योग्य माणसाचा सल्ला घेऊन आर्थिक नियोजन करावे. मोठे आर्थिक व्यवहार तूर्तास टाळावेत. या आठवड्यात गोसेवा करावी, नामस्मरण करावे. महिलांनी योगासने करावीत. जास्तीत जास्त मौन बाळगावे आणि विचार करून बोलावे. विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांच्या सहलीला जाण्याची संधी मिळेल.

    सिंह

    नको ते धाडस करू नये

    या आठवड्यात संमिश्र फळ मिळतील. नोकरदारांकरिता कामाचा ताण वाढेल. केतू प्रथम स्थानी आहे, त्यामुळे अलिप्तपणाची भावना निर्माण होईल. अचानक काही घडामोडी घडतील. व्यावसायिक वर्गाने वडील तसेच वरिष्ठ व्यक्तीचा मान ठेवावा. भागीदारीच्या व्यवसायात जसे आहे तसे सुरू ठेवा. नको ते धाडस करू नका. महिलांचा जोडीदाराशी वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे; त्यामुळे जपून बोला. गुरू लाभस्थानी असल्याने विद्यार्थ्यांना मित्रपरिवाराची उत्तम साथ मिळेल.

    हेही वाचा – योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    कन्या

    प्रामाणिकपणे काम करा

    या आठवड्यात इगो बाजूला ठेवा आणि काम करा. नोकरदारांचे कामात मन लागणार नाही. नोकरी सोडून व्यवसाय करावासा वाटेल, पण हा योग्य काळ नाही, हे लक्षात घ्यावे. नोकरीत प्रामाणिकपणे काम करा. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत जागेत बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यापारातही वाढ होईल. पैशांची निकड असली तरी मार्ग निघेल. अष्टमात रवी 15 तारखेला जात आहे, त्यामुळे महिलांनी पथ्ये पाळावीत आणि आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी प्राण्यांपासून, विशेषत: कुत्र्यापासून सावध राहावे.

    तुळ

    नोकरीत वरिष्ठ त्रास देतील

    या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. व्यायाम नियमित करा. पौष्टिक आहार घ्या. नोकरदारांच्या कामात विविधता पाहायला मिळेल. पडेल ते काम करताना, अगदी मनापासून करा; त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल. नोकरीत वरिष्ठ आणि हितशत्रू त्रास देतील; दुर्लक्ष करा, मौन बाळगा. व्यावसायिक वर्गाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये. तसेच, कुणाला उसने पैसे देऊ नये. उलट, कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करा. महिलांच्या नवीन ओळखी होतील. तर दुसरीकडे, संततीची चिंता वाढेल, मुलांवर लक्ष ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या व्यसनापासून लांब राहावे.

    वृश्चिक

    कामात तोच-तोचपणा जाणवेल

    या आठवड्यात मन स्थिर राहणार नाही. नोकरदारांना कामानिमित्त लांब जावे लागेल. कामाच्या ठिकाणी एकटेपणा जाणवेल. कामात तोच-तोचपणा असल्याचे वाटेल. व्यावसायिक वर्गाने वाहन खरेदी-विक्रीपासून सावधगिरी बाळगा. करार करताना कागदपत्रांचे काळजीपूर्वक वाचन करा. महिलांचे घरात कौतुक होईल, तुमचे विचार पटतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यांनी उन्हात भटकू नये.

    धनु

    भागीदारी व्यवसायात यश मिळेल

    या आठवड्यात आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. नोकरदारांची कामात प्रगती होईल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. व्यावसायिक वर्गाने कोणालाही आश्वासन देऊ नये आणि अति बोलू नये; नुकसान होण्याची शक्यता आहे. महिलांचे भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे; तथापि, जुळवून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना वरिष्ठ आणि गुरुंचे मार्गदर्शन मिळेल.

    मकर

    महिलांनी अनावश्यक खर्च टाळावा

    हा आठवडा संमिश्र घटनांचा काळ आहे. गुरू षष्ठात आणि केतू अष्टमात असल्याने नोकरदारांची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी होण्याची शक्यता आहे, पण त्यातून मार्ग काढू शकाल. व्यावसायिक वर्गाकडून जुने कर्ज फेडले जाऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेची कामे मार्गी लागतील. महिलांनी अनावश्यक खर्च टाळून गुंतवणूक करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून आणि कुसंगतीपासून लांब राहावे.

    कुंभ

    आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल

    या आठवड्यात नवीन गुंतवणूक करावी. शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. नोकरदारांच्या कामाचा वेग चांगला राहील. वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाला निर्णय घेताना भीती वाटेल; आत्मविश्वासाची कमतरता राहील. नवीन ओळखीत सर्व गोष्टी सांगू नका. महिलांना जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासासाठी उत्तम काळ आहे. हनुमान चालीसा वाचावी.

    हेही वाचा – किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    मीन

    नकारात्मक विचार येतील

    या आठवड्यात मनात सतत नकारात्मक विचार येतील; काळजी घ्या. नोकरदारांना हितशत्रूचा त्रास खूप जाणवेल. नोकरी सोडण्यासाठी दबाव येण्याची शक्यता आहे; पण नोकरी सोडू नका. व्यावसायिक वर्गाला जाहिरातीचा अवलंब करावा लागेल. त्याअनुषंगाने नवीन प्रॉडक्ट बाजारात आणू शकाल. महिलांना आई-वडिलांचा आशीर्वाद मिळतील. माहेरील लोकांच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थी मित्रपरिवाराबरोबर सहलीचा बेत आखतील, ते क्षण एन्जॉय करतील.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    September 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 15, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 24…

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    September 14, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 13 ते 19 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 435
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 582
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 919
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.