मेष
या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. अवतीभोवती आनंदी वातावरण असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि दखलही घेतली जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. काम वाढेल, पण समाधान मिळेल. व्यवसायात नवीन कामे मिळण्यासाठी कष्ट करावे लागतील. वातावरणामुळे महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी, पथ्य पाळावे. सर्दी-ताप होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक होईल. मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल.
वृषभ
या आठवड्यात कामाचा सपाटा दाखवावा लागेल. एक काम पूर्ण करेपर्यंत दुसरे हजर असेल. धावपळ होईल. पण वरिष्ठ खूश होतील, प्रमोशनसाठी नाव सुचवले जाईल. व्यावसायिक लोकांना कामासाठी प्रवास करावा लागेल. अनोळखी व्यक्तीची मदत मिळेल. नवीन खरेदी करू शकाल. महिलांना घरी पाहुण्यांचे आगतस्वागत करावे लागेल. घरात दुरुस्तीची कामे निघतील. विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणूनच कोणावरही विसंबून राहू नका.
मिथुन
या आठवड्यात नोकरदारांची कामे पटापट होतील. वरिष्ठ खूश होतील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सहकारीवर्ग नाराज असेल, पण योग्य संवाद साधून मार्ग काढू शकाल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. महिलांना परदेश बघण्याचा योग आहे, प्रवास घडेल. वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे तथापि, विद्यार्थ्यांनी आपल्या मतावर ठाम राहावे.
कर्क
या आठवड्यात कामाचा ताण कमी होईल. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. व्यावसायिक लोकांना नवीन भरती करावी लागेल. काम वाढेल, त्यासाठी योग्य व्यक्ती शोधावी लागेल. मुलांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. महिलांनी घरात शांतता ठेवण्यावर भर द्यावा, वाद न घालता स्वतःचे मत मांडावे. विद्यार्थ्यांना वडिलधाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन मिळेल, प्रगती होईल.
सिंह
या आठवड्यात घरात ताणतणाव राहील. छोट्या कुरबुरी असतील. नोकरदारांना सतत सतर्क राहावे लागेल. काम वेळेत करणे गरजेचे आहे. व्यावसायिक लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. घरात शांतता राहील, याकडे महिलांनी लक्ष ठेवावे; मोठ्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा, यश मिळू शकेल.
हेही वाचा – सुपर मार्केट अन् सुपर खरेदी!
कन्या
या आठवड्यात खूप उत्साह राहील. नवीन योजना आखाल आणि त्या नियोजनानुसार पूर्ण पार पाडू शकाल. नोकरदारांना नवीन जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांनी इतरांवर अवलंबून राहू नये, स्वतः लक्ष देऊन कामे पूर्ण करावीत. घरात धार्मिक कार्य घडेल, त्यासाठी महिलांना नियोजन करावे लागेल. आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी वादविवाद स्पर्धेत भाग घ्यावा, यश मिळेल.
तुळ
या आठवड्यात सगळी कामे शांततेत होतील. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मित्र-मैत्रिणी भेटतील. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. बदल म्हणून इतरांची कामे कराल. व्यावसायिकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, इतरांना दुखवू नका. महिलांनी घरातील लोकांना गृहीत धरू नये, निर्णय घेताना सल्लामसलत करावी. विद्यार्थ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, उगाच वाद घालू नका.
वृश्चिक
या आठवड्यात कामे करताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या, त्यासाठी संबंधित ज्येष्ठांचा सल्ला विचारात घ्या. तब्येत उत्तम राहील. मुलांची काळजी राहील. घरात दुरुस्तीची कामे निघतील, त्यामुळे महिलांना घरात अडकून पडावे लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
धनु
हा आठवडा शांत आणि आरामाचा जाईल. तुमची कामे स्वतः लक्ष घालून पूर्ण करा. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढीसोबत जबाबदारीही वाढेल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळेल, त्या संधीचा उपयोग करून घेऊ शकता. महिलांनी सकारात्मक विचार करावा, मनात नको ते विचार आणू नयेत. कुणाचे न ऐकता स्वतःच्या मनाचा कौल घ्या. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत प्रवास करावा लागेल, वेळ आनंदात घालवाल.
मकर
या आठवड्यात तब्येतीच्या थोड्या कुरबुरी राहतील. कामाचा ताण राहील. वेळ कमी पडेल, इतके काम असेल. तथापि, सहकारी मदत करतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नवीन गुंतवणूक करू शकाल. जुन्या घराच्या दुरुस्तीची कामे निघतील. महिलांना जोडीदाराची साथ मिळेल, नवीन भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी, प्रलोभनाला बळी पडू नका.
कुंभ
हा आठवडा थोडा धावपळीचा जाईल. रखडलेली कामे मार्गी लागू शकतील. आधी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल. नवीन गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. नोकरदारांना कामाचा ताण नसेल. वरिष्ठ खूश राहातील. घरात महिलांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील; भिशी लागू शकते. मैत्रिणी भेटतील. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. मेहनतीशिवाय यश अशक्य आहे, हे लक्षात ठेवावे.
हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!
मीन
या आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक कार्यात सहभागी होता येईल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. तब्येत उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक प्रश्न सुटतील. व्यावसायिकांना आर्थिक वसुली होऊन पुढील कामाचे नियोजन करता येईल. महिलांनी औषध वेळेवर घ्यावे. तथापि, तब्येत ठीक राहील. विद्यार्थ्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अनोळखी लोकांशी बोलायला जाऊ नका.


