Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अमेरिकेला तर जायचंय, पण कसं?
    ललित

    अमेरिकेला तर जायचंय, पण कसं?

    Team AvaantarBy Team AvaantarApril 7, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, दनू, पिदू, अमेरिका,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    बंगलोरला आमची दोन वर्षं अगदी मजेत गेली. हे आमचे घर… हा ओळखीचा परिसर… ओळखीची माणसे… असे सगळे आमचे वाटत असतानाच कहानी में ट्विस्ट आला.. आम्हा सर्वांनाच एका नवीन वळणावर आणून उभे केले… आमच्या पप्पांची बदली अमेरिकेला झाली आणि सगळं चंबूगबाळं उचलून त्या अनोळखी जगात स्थलांतराची तयारी सुरू झाली…

    अमेरिकेला जायचा निर्णय पक्का करण्या आधी आम्ही पण तिथे जाऊ शकतो ना, हे नक्की करणं जरुरी होते. चौकशी करताना कळलं की, अमेरिका किंवा कॅनडा येथे प्राणी घेऊन जाण्याची प्रक्रिया सगळ्यात सोपी आहे. कारण, तिथेही रॅबिज हा रोग आहे त्यामुळे फक्त लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे. युरोपमध्ये प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे, कारण तिथे रॅबिजचे उच्चाटन केले आहे, त्यामुळं नवीन प्राणी घेताना ते खूप काळजी घेतात.

    झाले आता आमची पण तयारी सुरू करण्यात आली. प्रथम भारतीय नियमानुसार देशाबाहेर जाणाऱ्या प्रत्येक प्राण्याला microchipped करणे जरुरी आहे. जसा बारकोड असतो तसा एक युनिक आकडा असणारी मायक्रो चिप खांद्यावरच्या त्वचे खाली inject केली जाते. प्राणी हरवला किंवा हा तुमचाच प्राणी आहे, हे सिद्ध करण्यासाठी ती जरुरी असते. तसेच पुढच्या सर्व प्रमाणपत्रांवर तोच क्रमांक असतो. म्हणजे, हे कागद याच प्राण्यांसाठी आहेत, याची खातरजमा केली जाते.

    लसीकरण करण्याआधी चिप बसवणे जरुरी आहे म्हणजे लसीकरणही याच प्राण्याचे झाले आहे, हे नक्की होतं. सर्व डॉक्टर नेहमीच आम्हाला शहाणी मुले म्हणतात कारण, आम्ही नेहमी तिथे अजिबात मस्ती, चावणे, ओरबाडणे असे करत नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी व्यवस्थित पार पडल्या.

    मार्चच्या सुरवातीला व्हिसा हाती आला आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पप्पांचे जाणे नक्की झाले. आमच्या दादाची परीक्षा कदाचित ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष घेतील असे होते, त्यामुळे आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात जाण्याचे ठरवले. मार्च अखेरपर्यंत थोडा आटोक्यात असलेल्या कोरोनाने हळूहळू उचल खायला सुरुवात केली. दुसऱ्या लाटेचे पडघम वाजू लागले! त्याचवेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन दादाच्या शाळेने पुढचे सर्व वर्ग आणि परीक्षाही घरूनच होईल, असे कळवले. बिघडत असलेल्या परिस्थितीत अडकण्यापेक्षा लवकर निघून जायचा निर्णय आईने घेतला.

    जागतिक महामारीमुळे त्यावेळी जरी विमानसेवा सुरू असली तरी, खूप कमी प्रमाणात. त्यात आम्हाला घेऊन प्रवास करायचा तर, अजूनच कमी पर्याय होते. छोटे प्राणी जसे की ‘माऊ’ यांना परदेश प्रवास करण्याचे तीन पर्याय आहेत. एक म्हणजे विमानात स्वतःबरोबर carry on baggage म्हणून माऊ घेऊन जायची. म्हणजे तुमच्याबरोबर पूर्ण वेळ तुमचं पिल्लू असणार… तुमच्याबरोबर बसणार. काही ठराविक विमान कंपन्या तसा प्रवास करू देतात. बंगलोर ते ह्यूस्टन जाणारी तशी परवानगी देणारी एकमेव प्रवासी विमान सेवा होती Luftansa. पण तेव्हा युरोपमधून अमेरिकेत जाण्याचे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे दुसरा पर्याय ठरवला.

    आपल्याच विमानात माऊ असणार पण check in luggage सारखं त्यांना त्यांच्या ताब्यात द्यायचे. सामनाबरोबर वातावरण नियंत्रित केलेला जो भाग असतो, तिथे पिंजरे ठेवतात आणि विमानातून उतरल्यानंतर सामनाबरोबर आपल्या ताब्यात देतात. असे नजरेआड करणे आईला खूप कठीण वाटत होते; पण दुसरा इलाजच नव्हता. कतार विमान सेवा अशी सोय असलेली एकमेव विमानसेवा तेव्हा बंगलोर ते ह्यूस्टन यासाठी उपलब्ध होती. पण तिकिटे एकदम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचीच उपलब्ध होती. तेव्हा तर तेव्हा, पण आमचा प्रश्न सुटतो आहे ना, मग आम्ही तेव्हाची तिकिटे बुक केली. बरोबर प्राणी घेऊन जायचं असेल तर तशी आगाऊ सूचना विमान कंपनीला देऊन परवानगी पक्की करावी लागते. त्यानुसार आम्ही त्यांच्याकडून परवानगी येण्याची वाट बघत होतो. तसा एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होता, म्हणजे हाताशी भरपूर वेळ आहे हे गृहीत धरून आम्ही आरामात होतो.

    पण सर्वत्र पसरलेल्या अनिश्चिततेच्या काळात गोष्टी सरळ व्हाव्यात कशा? कोरोनाची दुसरी लाट वेगाने रौद्र रूप धारण करत होती. आपल्या कराल दाढेखाली वेगाने अनेक जीवने उद्ध्वस्त करत… सामान्य जनजीवन विस्कळीत करत, ती उन्मत्त निघाली होती. तिच्या प्रकोपातून वाचणे जणू अशक्य वाटत होते. आपल्या महाराष्ट्रात दुसरा लॉकडाऊन सुरूही झाला. आता बंगलोरला कोणी मदतीला येणे अशक्य होते. त्याच वेळी आईला ज्या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटत होती ती घडली… आमच्या दादाची तब्येत बिघडली. होता साधा सर्दी, खोकला पण कोरोना काळात तोच सगळ्यात भीतीदायक! शेवटी त्याचा टेस्ट रिपोर्ट ‘कोरोना नाही’ असाच आला; पण ते सर्व सोपास्कार पार पाडताना एकट्या आईची खूप फरफट झाली. त्या परक्या गावात आमचे जवळचे असे कोणीच नाही… काही आणीबाणी झाली तर करायचे काय… आमचे गणगोत सारे महाराष्ट्रात… पप्पा अमेरिकेत पोहचलेले, आणि दिवसेंदिवस बिकट होत जाणारी परिस्थिती!

    आईला सतत एकच चिंता सतावत होती की, जर तिला काही झाले आणि घर सोडून जावे लागले तर, आम्हा चार पोरांचे कसे होणार… आम्ही कुठे जाणार आणि आमच्यापर्यंत कोण पोहचू शकणार? दोन्ही प्रश्नांना उत्तर नव्हते… मग एकच पर्याय होता लवकरात लवकर पप्पांकडे निघून जाणे.

    आम्हाला घेऊन जाऊ शकणारी कुवेत विमान सेवेची तिकिटे त्याआधी उपलब्धच नव्हती… बंगलोरवरून कुठल्याच विमानात जागा नाही, हे बघून दिल्लीवरून United airlinesने दिल्ली ते शिकागो आणि मग ह्यूस्टन असा प्रवास करायचा ठरले. आमचा दिल्ली ते शिकागो, ह्युस्टन प्रवासात काहीच अडचण नव्हती.. पण आम्ही दिल्लीपर्यंत पोहचू शकत नव्हतो.

    भारतात फक्त एअर इंडिया प्राणी घेऊन जाण्याची परवानगी देते, पण विशिष्ट विमानात जागा देणारच, असे खात्रीपूर्वक ते सांगत नाहीत. त्याची निश्चिती तुम्हाला तासभर आधी कळवली जाते… खूप आधी जाऊन वाट बघत बसावं लागेल. मग पुढे दिल्ली ते शिकागो हा 16 ते 17 तासांचा प्रवास… म्हणजे चोविस तासापेक्षा खूप जास्त आम्हाला पिंजऱ्यात बंद करून ठेवावे लागले असते. ते शक्य नसल्याने आईबरोबर प्रवासाचे सारे पर्याय बंद झाले. मग शेवटचा पर्याय नाइलाजाने निवडला…

    हा सर्वात महागडा आणि जास्त वेळ लागणार पर्याय आहे. Cargo विमानाने जसे सामान पाठवतात तसे आम्हाला एकट्याला पाठवणे. सामानाची ने-आण करणाऱ्या विमानातही खास प्राण्यांना ठेवण्यासाठी वातावरण नियंत्रित कप्पा असतो. तिथून प्रवास करायचा… मोठ्या प्राण्यांसाठी हा नेहमीच वापरला जातो. पण त्यासाठी देखील आगाऊ बुकिंग करावे लागते. विस्कळीत झालेल्या सर्व जगात काहीच वेळेवर, सरळ होत नाही… cargo विमानासाठी आम्हाला विमानतळावर संबंधित स्टाफकडे सुपूर्द करून मग आई निघणार, असे ठरले होते. म्हणून, आमचं बुकिंग पक्के झाले की, मग माणसांचे बुकिंग करायचे असे ठरले. पण आमचे बुकिंग काही लवकर नक्की होईना! इथे दिल्लीवरून सुटणाऱ्या विमानाचे बुकिंग पटापट भरत चालले होते… काय करावे काही कळत नव्हते…

    क्रमशः

    (पिदू या मांजराची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    मनावरचा घाव

    August 18, 2026 ललित

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026 ललित

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    August 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मनावरचा घाव

    By दिलीप कजगांवकरAugust 18, 2026

    सदानंद आणि सावित्रीबाई पुण्याला राहात होते. राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा चेन्नईत कामाला होता.…

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    August 18, 2026

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    Kitchen Tips : अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत…

    August 18, 2026

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    August 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 400
    • अवांतर 205
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 540
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 249
    • मैत्रीण 24
    • ललित 859
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.